आजी आजोबा सांगा ना
आजी आजोबा सांगा ना
आजी आजोबा सांगा ना
होमवर्क का तुम्ही करायचे?
ट्युशनचा कंटाळा आला तर
आई बाबा का ओरडायचे?
आजी आजोबा सांगा ना
गेम कशावर खेळायचे?
मोबाईल नव्हता तर
कँडी क्रश कसे करायचे?
आजी आजोबा सांगा ना
कार्टुन कोणते बघायचे?
टीव्ही नव्हता म्हणता तर
रिमोट कुठे तुम्ही लपवायचे?
आजी आजोबा सांगा ना
दिवसभर तुम्ही काय करायचे?
आई बाबा तुमचे नाही का
दिवसभर कामासाठी बाहेर जायचे?
