आई
आई
आई माझी मायेची घागर
ओसंडून वाहते निर्मळ जलापरी
घेते सर्वांची काळजी प्रत्येक क्षण
मला वाटते ती जणु कथेतील परी
आई माझी करुणेची मूर्ती
अहोरात्र करीते कष्ट कुटुंबासाठी
जपते सर्वांचे मन आणि मनातील भावना
मला वाटते ती जणु अन्नपूर्णा घरासाठी
आई माझी प्रेमळ ममतामयी
प्रांजळ तिचा निर्णय आणि विचारविमर्श
घराच्या सुखासाठी करते रात्रीचा दिवस
मला वाटते ती जणू परिसाचा स्पर्श
आई माझी सुखाची सावली
घेते मायेच्या उबदार कुशीत
जानवु देत नाही उन्हाची झळ
मला वाटते ती जणु कापुस लुसलुशित
आई माझी गार पाण्याचा हो घड़ा
जीव कधीच तळमळु देत नाही
करते प्रत्येक गोष्टींवर रामबाण उपाय
मला वाटते ती जणु पतंलजीची ग्वाही
आई माझी हो आहे आमराईचा मळा
गोड गोड निम्बाची कौसम्बी
चुका घालते पोटात वात्सल्याची खान
मला वाटते ती जणु वडाची पारंबी
आई विना कल्पनाच नाही जगन्याला
दुधारी प्रेमळ वाहता सागर करुणेचा
पदराचा तिचा आडोसा जशी मजबुत भिंत
मला वाटते ती जणु नक्षत्र आकाशगंगेचा
