STORYMIRROR

kishor chalakh

Inspirational

3  

kishor chalakh

Inspirational

आई सावित्री

आई सावित्री

1 min
1.2K



आई सावित्री शिकली

घेतला वसा शिक्षणाचा

अख्या जगाने मानली

आई सावित्री शिकली!!धृ!!


शेण मातीचे गोळ

तिच्या हातामंदी बळ

अन् लोकांचा रोष

तिच्या मनामध्ये हर्ष

अहो उचललं पाऊल

झालं जीवन सफल

शिक्षण बीज रोवली

आई सावित्री शिकली !!१!!


साथ दिल ज्योतीबांनी

जाणीव केली स्त्रीमनी

अन् मोडला विरोध

शिक्षणाचे बांधले बंध

अहो करून सहन

प्रथा,रुढीचे बंधन

नाही मागे सरली

आई सावित्री शिकली !!२!!


स्वतः झेलून अन्याय

स्त्री जीवन केले धन्य

अन् घडवून समाज मन

केली शाळा स्थापन

अहो देऊन प्रकाश

ठेवला नवा आदर्श

स्त्री मन जिंकली

आई सावित्री शिकली!!३!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational