STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Children

2  

Abasaheb Mhaske

Children

आई म्हणजे

आई म्हणजे

1 min
14.2K


आई म्हणजे वात्सल्यरुपी 

अखंड  खळाळणारा झरा 

अवघ्या विश्वातील अढळ

शाश्वत  शब्द हाच  खरा .

जिथं  क्षणभर विसावण्यास

असते एक  शीतल  छाया 

चिरंतन  प्रेमातनं साकारलेली

एक  वेडी  माया

आई म्हणजे ममत्वाची 

असते  साक्षात  मुर्ती

सृष्टी निर्मात्याची एक

अप्रतिम  कलाकृती

निस्वार्थ  प्रेमाचीच

 एक श्रुती 

शब्दचि अपुरे पडतात

वर्णिता तिची महती

आई म्हणजे असते

एक  जीवनशाळा.

अनुभवाया मिळतो तिथे

दुखाचा कळवळा  हास्याचा उमाळा

आई असतं एक हक्काचं स्थळ

धाय मोकलून  रडण्याचं खळाळून हसण्याचं

आई कसा होवू  तुझा उत्तराई

कशी फेडावी तुझी ॠणाई.

 

    

 

 

 

 

 

 

 

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children