आई माझी आई
आई माझी आई
होवू नको तु आपुल्या बाळाचा काळ.......
इवलासा ग माझा जीव आहे अती छोटा
अस्र शस्रंचा ग तु रचु नको घाट....... कशी खेळु आनंदात तुझ्या गर्भात तन मन घायल माझे रक्ताच्या पाटात
करू नको ग आई माझ्या जीवनाशी खेळ.......
पंचप्राण नियतीचा येवु दे घरात
तुझ्या प्रेमा साठी जीव तळपते आत
माय लेकीची ग माया उंत्तुग महान
ऐकु येते का ग माझे आर्त क्रंदन.........
येवु दे की तु मजला या धरतीवर पाहु दे की एकदा हे अप्रतिम नगर क्षमया धरतीची उपमा तुज आहे ग जगात
असे भयंकर पाप करू नको घात........
छिन्न विछिन्न अवस्थेत पाहु नको बाळ तोडु नको ही वेल लागु दे फळ.........
