Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rohit Khamkar

Abstract Comedy

3  

Rohit Khamkar

Abstract Comedy

आगाऊ लेक

आगाऊ लेक

1 min
4


आयुष्य जगताना, मोजका वेळ मी निवडतो.

थोडा राग येतो, पण तुझा आगाऊपणा मला आवडतो.


कधी राघवतो ओरडतो, कधी मी चिडतो.

मनवायला तुला मी, कित्येक सोंग रंगवतो.

तुझ्याच साठी मी, सारी गर्दी अलगद पांगवतो.

थोडा राग येतो, पण तुझा आगाऊपणा मला आवडतो.


कित्येकदा मुद्दाम, मिच तुला असा चिडवतो.

रागावून तुझ्याच खेळण्याला, बेदम असा बडवतो.

तू हसण्यासाठी, मलाच लागलं मारताना भासवतो.

थोडा राग येतो, पण तुझा आगाऊपणा मला आवडतो.


माझ्या बाळा काय सांगू, तुला मी कसं जपतो.

हल्ली तुझ्या विचारात, डोळे उघडे ठेऊन झोपतो.

त्रास होतो तुला तेव्हा, मी मुद्दामून लपतो.

थोडा राग येतो, पण तुझा आगाऊपणा मला आवडतो.


तू हसण्यासाठी मी, प्रत्येक तो खेळ खेळतो.

फक्त तू जिंकण्यासाठी, सारा डाव असा हरतो.

आज जाणवलं, बाळासाठी बापाचा स्वाभिमान केव्हाच मरतो.

थोडा राग येतो, पण तुझा आगाऊपणा मला आवडतो.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract