STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

आधुनिक महाभारत

आधुनिक महाभारत

1 min
2.9K


सोडून मोकळे केस, द्रोपदीही आता फॅशनेबल झाली आहे

दुःशासनाला वस्त्रहरणाची गरज कुठं उरली आहे ?

कॄष्णाची चिंधी तिला कधीच पुरत नाही

द्रोपदीही आता अबला ठरत नाही 

नानाविध झेंडे, वेश  बदलावा तसे नेते पक्षांतर करताहेत

युती अनं समरसतेच्या नावाखाली वाट्टेल तिथे लोळताहेत

सत्तेच्या आणि पैशांच्या जोरावर जो तो आपलेच दळण दळीत आहे

लोकशाहीचा गळा घोटून जो तो आपलाच मळा फुलवतो आहे 

सततची नापिकी, कर्जापायी शेतकरी आत्महत्या करताहेत

महागाई, भ्रष्टाचाराने कामगार हवालदील, तरूण बेकार फिरताहेत

तिजोरीत खणखणाट, नोकरभरती बंद नेते स्वतःचे मानधन चौपट घेताहेत

हाहाकार माजला, भीषण नाट्य घडतांनादेखील सर्व आनंदी आनंद आहे 

संधीसाधू नेते, भ्रष्ट मुजोर नोकरशहा , हक्कांबाबत उदासीन जनता

कोण कॄष्ण? कोण अर्जून? कोण दुर्योधन? काही काही कळत  नसतांना

भाबडी जनता, मुकी बिचारी कुणीही हाका जनावरागत हतबल होवून.

दानशूर कर्णाची, निरागस प्रेक्षकांची भूमिका बखुबी निभावत आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational