आधार देशाला
आधार देशाला
चुली सरपण
सप्पर डोईला
शेण सारवण
कुडाच्या भिंतीला. १
आई बाबा गेले
मोल मजूरीला
उरकले काम
बसे अभ्यासाला. २
ज्योतीबा आदर्श
वंदू सावित्रीला
शिक्षणाचा मार्ग
दावला आम्हाला.३
महापुरूष हो
आदर्श ते मला
विसरू कसे हो
मी त्यांच्या ऋणाला.४
करुन अभ्यास
सांगेल जगाला
मुलीच खंबीर
आधार देशाला. ५
