आभास
आभास


ह्या ऋतूला तुझे नाम आहे
सर्व गंधाळणे काम आहे
संभ्रमाना तुझ्या मान्य आहे ...
तो असा मार्ग मी वाम आहे
स्वैर निश्वास मी बासरीचा
भोवताली तुझ्या शाम आहे!
स्पर्श रात्रीतले मोरपंखी !
मेघ अंधारले जाम आहे
चंद्र भाडेकरी ओढणीचा
तारकांनी दिले दाम आहे...