STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

3  

Abasaheb Mhaske

Inspirational

आभाळ ठेंगणं...

आभाळ ठेंगणं...

1 min
28.1K


अलिखित संकेत जगाचे कुठवर पाळशील

मनातल्या मनात मांडे कुठवर भाजशील ?

होईल ते होऊ देत, प्रेम कर ध्येयाप्रती पाखरासारखं ..

जीवन उधळून मनसोक्त, बिनधास्त ...

अंगवळणी पडलेल्या वाटेवर कुठवर चालशील

मनातलं आभाळ केव्हा पेलशील ...

अरे ! घरटं काय कधीही बांधता येईल...

कवेत घे आभाळ सारं ,मार उंच भरारी ...

अरे अडवतील तुला पावला - पावलावर

चिडवातीलही तुला अपयश आल्यावर

पण जेव्हा घेशील तू गरुड भरारी तेव्हा

तेच होतील फितूर अन तव स्वागतास असतील आतूर....

अरे ! चारचौघांसारखं आयुष्य तर सारेच जगतात

उगवत्या सूर्याला नमस्कारहि सर्वच करतात

पीक भरात आलं म्हणजे सर्वच पक्षी गातात गाणी

रिवाज इथला, अपयशाचा वाली नसतो कुणी ?

अरे ! चिंता कसली करतोस लढ बिनधास्त

मनातलं सारं ठरवलेलं करून टाक एकदाचं...

यशोशिखरं केव्हाची आतुरतेनं वाट बघतेय तुझी

कर्तृत्वाला आता लावू नकोस लगाम होऊ दे आभाळ ठेंगणं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational