52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा
चिंट्या दादाची बायको
करत होती बुंदीचे लाडू,
स्वयंपाकाला झाला उशीर
पोटात लागले कावळे ओरडू.
चिंट्या दादाला लागली भूक
भूकेने लागला तो तडफडू,
इकडे तिकडे मारल्या फे-या
फिरुन फिरुन आले रडू.
स्वयंपाक घरात पळत घुसला
पळता पळता धपकन पडला,
समोर दिसले लाडूचे ताट
लाडू पाहून चटकन उठला.
बायको त्याची खुदकन हसली
हळुच जाऊन जवळ बसली,
लाडू सारखा चिंट्या गोल
वाजवत असतो पोटाचा ढोल.
