STORYMIRROR

Vanita Shinde

Inspirational

4  

Vanita Shinde

Inspirational

५२ आठवडे स्पर्धेसाठी (माऊली)

५२ आठवडे स्पर्धेसाठी (माऊली)

1 min
652


*स्पर्धेसाठी*


*- माऊली*



वास्तल्याने भरलेली

मायेची खाण माऊली,

सोसून सा-या दु:खाना

ती देते प्रेमळ सावली.


असते तिच्या मुखी सदा

जिव्हाळ्याची गोड वाणी,

बोचणारे शब्द कधीही

नसतात रे ध्यानी मनी.


देण्यास तत्पर असते

ती ज्ञानदान वेळोवेळी,

आनंद , उत्साह वाहतो

ओसांडून तिच्या भाळी.


जिद्द, चिकाटी रुजवूनी

जीवनाला देते आकार,

आयुष्यातील स्वप्नांना

देते बळ करण्या साकार.


घेत मायेच्या पंखाखाली

देते शिकवण जगण्याची,

हसतमुखाने करते कार्य

रित ही तिची वागण्याची.


उपकार माऊलीचे कधी

फिटता फिटणार नाही,

सौभाग्य लाभले मजला

हे आयुष्य तुज मी वाही.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational