वजीर ( अभंग रचना )
वजीर ( अभंग रचना )
वजीर
( अभंग रचना )
खेळ बुद्धिबळ I चौसष्ट घराचा I
काळ्या पांढर्याचा | चौकटीत ॥ १ ॥
सैनिक चालतो I एक घर पुढे I
एकटाच लढे I प्राणपणे ॥ २ ॥
हत्ती दोन चाले I ऊभे नि आडवे
शत्रूस लोळवे | पायदळी ॥ ३ ॥
घोडे दुडकत | अडीच ते घर |
ऐटीतच मर I सांगतसे ॥ ४ ॥
उंट चालतात | तिरकी ती चाल I
होतात ते हाल | कधी कधी ॥ ५ ॥
राजाच्या रक्षणा I वजीर ऐटीत |
वार तो करत | मुक्तपणे ॥ ६ ॥
वजीरास असे | असा बहुमान I
राजाची ही शान | हार जीत ॥ ७ ॥