सकाळ
सकाळ
आयुष्याच्या निराशेची सरली रात,
नव्याने जीवनाची आशामय प्रभात
नाविण्याचा ध्यास लागला मनाला,
नवनिर्मितीसाठी जीव लावला पणाला
सोनेरी सकाळचा मनोहर देखावा,
पाहून तो निसर्ग देहभान हरपावा
जीवनात ही पसरावी सोनेरी किरण,
विलोभणीय बनवावा क्षण अन् क्षण
सकाळच्या प्रहरी चैतन्यमय सृष्टी,
नित्यक्रम पाळणारी सर्व जीवसृष्टी
पाळावे निसर्गनियम खोलून ही दृष्टी,
होई आरोग्याची तेंव्हाच कृपादृष्टी
आयुष्याची करावी सुंदर सकाळ,
सदैव ठेवावी इच्छाशक्ती प्रबळ
संकटावर करावी जिद्दीने मात,
हरलो तरीही करावी नव्याने सुरवात
रात्रीनंतर येते नियमित सकाळ,
विचार हाच देई मनाला या बळ
लढावी लागतेच जीवनाची लढाई,
मनगटाच्या बळावर करा रे चढाई.