Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Inspirational Classics

3  

Abasaheb Mhaske

Inspirational Classics

साहित्य म्हणजे ...

साहित्य म्हणजे ...

1 min
14K


साहित्य म्हणजे ...

चिंतन , मनन , संप्रेषण  

भाव नि भक्तीचा सुरेख संगम 

समाजमनाचा आरसा अनुपम  

साहित्य म्हणजे ...

उठता - बसता , हसता - खेळता 

भांडता कांडता सुचावी कविता 

नाही तर एखादी छानशी कथा 

साहित्य म्हणजे ...

लिहावं असं कि ते आतून यावं 

मनाचे तार अलगद  छेडावे

कधी वेदनेची फुंकर व्हावे 

साहित्य म्हणजे ...

अलंकार नसो कि छंद कुठला नसेल भलेही

दुःखालाही वाचा फुटावी ,तर कधी ...

थकल्या - भागल्या जीवाला मिळावी उभारी  

साहित्य म्हणजे ...

लिहावं असं की , कुणीही मंत्रमुग्ध व्हावं

समरसता अशी की दुधात साखर मिसळावी 

टिपावं दुःख की वाचकानेही सैरभैर व्हावं ...

साहित्य म्हणजे ...

नसे पोरखेळ , कुणी उठावं , काहीही लिहावं 

ना आशय , ना काव्यत्मकता , यमकाची भाऊगर्दी 

लिहणार्याची नसती उठाठेव नि वाचकाची फजिती 

साहित्य म्हणजे ...

ना समाजभान , ना प्रसाद , ओज ,माधुर्य

माहितीही नाही का लिहावं , कशासाठी ?

कशाचा कशाला ताळमेळ नाही ...

साहित्य म्हणजे ...

अंतर्मनातून उमटलेली भावोत्कट साद 

वाचक - लेखकानं इतकं एकरूप व्हावं 

ठेच याला लागता त्यानं कळवळावं 

साहित्य म्हणजे ...

लेखकाच दुःखाशी तादात्म पावन 

सभोतालच दुःख शब्दात टिपण

अवघाचि जीवन साहित्यमय होणं 

साहित्य म्हणजे ...

संवेदनेतून चिंब - चिंब व्हावे ....

समाधी अवस्थेतून उत्कट भाव असे की 

त्वचेलाही फुटेल वाटावं शब्दांची धुमारे...

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational