Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Classics

4  

Pandit Warade

Classics

मीरा दंग झाली

मीरा दंग झाली

1 min
521

मारवाड देशी । राजपुता घरी ।।

जन्म घेते परी । मीरा राणी ।।१।।

बालपणी तिने । पाहिली वरात ।।

पुसते घरात । पती कोण? ।।२।।

आई उत्तरली । कृष्ण तुझा पती ।।

मीरा अल्पमती । ध्यानी ठेवी ।।३।।

लग्न झाल्यावर । सासरला गेली ।।

मूर्ती संगे नेली । कन्हैयाची ।।४।।

पतीशी ना कधी । झाली रममाण ।।

केले समर्पण । कृष्णापायी ।।५।।

जहराचा प्याला । राणाजीने दिला ।।

तिने पचविला । हरी कृपे ।।६।।

कृष्ण भजनाचा । लागलासे छंद ।।

गोविंद गोविंद । मुखी सदा ।।७।।

हातामध्ये वीणा । पायात पैंजण ।।

मुखात भजन । श्रीकृष्णाचे ।।८।।

आदर्श प्रमाण । तिचे आचरण । 

भक्तीचे दर्शन । भक्तांसाठी ।।९।।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics