दो घडीचा पाव्हणा
दो घडीचा पाव्हणा
वृत्त:- स्त्रग्विनी
लगावली:- गालगा x ४
दो घडीचा इथे पाव्हणा माणसा।
पाव्हण्या सारखा वाग ना माणसा।।
यायचे जायचे काय हाती तुझ्या।
मीपणाच्या कशा वल्गना माणसा।।
पोर गर्भात का मायही मारते।
का तिच्या जीवनी वंचना माणसा।।
कोण जाणे कुठे झोपला देव हा।
मग कशाला तुझी याचना माणसा।।
माय बापास का आश्रमी धाडतो।
बाप तू ही उद्या जाण ना माणसा।।