Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Arun V Deshpande

Abstract Tragedy

2  

Arun V Deshpande

Abstract Tragedy

बाकी काही नाही

बाकी काही नाही

1 min
6.7K

विषम हवामानाचा परिणाम 

होतो शरीरावर ,आजारी पडतो 

बरेही होऊन जातो यथावकाश 

शरीराने हिंडू-फिरू लागतो 

या आजारपणात मन आजारी पडते 

पण मनाचा आजार लक्षात येत नाही 

काही तरी बिनसलंय त्याचं,

इतकेच कळते 

अदलुन - बदलून डॉक्टर देतात औषधी 

तरी पण आजाराचे निदान होत नाही 

असा कसा विचित्र आजार हा ? ..!

काहीच कसे कळत नाही ?

सुरु ठेवावी लागते लढाई जगण्याची 

पोटात ढकलावे लागतात चार घास 

नि पुरवावे लागतात चोचले शरीराचे 

गेलोत विसरून मन नि त्याची आस 

जाऊ द्या , लक्ष देऊ नये या सेंटी -मनाकडे 

काही तरी बिनसलंय त्याचं बाकी काही नाही 

होईल आपोआप बरं ,त्याचे काही नाही .

शरीर धावतंय न यंत्रागत ..तेव्हढे पुरे ...!

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract