Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Naware

Classics

2  

Trupti Naware

Classics

" पुन्हा "

" पुन्हा "

1 min
7.0K



 पुन्हा तीच पायरी दिसते

पुन्हा तीच आशा हसते

पुन्हा त्याच निळसर आकाशात

भरारी घ्यावीशी वाटते ..

पुन्हा तेच दिवस स्मरले

पुन्हा त्याच स्वप्नात विरले

पुन्हा आठवणींचे पांघरूण 

अंगभर घ्यावेशे वाटले ...

पुन्हा मोगर्यासवे अंगण

कोमेजल्यागत बहरले

पुन्हा शिंपण सांत्वनांचे

अश्रुकणही हास्यात भिजले

पुन्हा सावली सुखातली

जुन्या दुःखाच्या उन्हात हलते

पुन्हा हलणारे रिक्त झोके

नव्या वाटेत गीतात भरले

पुन्हा चुकून चुकण्यास चुकले 

क्षमाहीन दोषास भुलले

निस्वार्थ जरी खेळ जिंकण्याचा

जिंकण्यास मग स्वार्थात हरले

पुन्हा जुन्या कथा स्वप्नातल्या

संदर्भ त्याचे सत्यात पाहीले..

पुन्हा त्याच निरागस डोळ्यात पाहीले

हजारो स्वप्नात मी मलाच शोधले

पुन्हा तेच शब्द....

शब्द ही थकले

पुन्हा तेच काव्य,अर्थ हिरमुसले

पुन्हा भाव अंतरीचे

अंतरात मोजले

अंतरातले अंतर कमी होताना दिसले

कां पुन्हा मी उगाच ..प्रेमात पडले

कां पुन्हा मी उगाच तुझ्या प्रेमात पडले..!!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics