सांग ना गं आई
सांग ना गं आई
सांग ना गं आई
कोठून येती ढग
निराधार तरीही
धरुन राही तग ।।
सांग ना गं आई
कसा येतो पाऊस
चिंब भिजून माझी
रोज करतो हौस ।।
सांग ना गं आई
कोठून येतो वारा
आणे सोबतीला
पावसाच्या धारा ।।
सांग ना गं आई
ती चंद्राची कला
अंधारल्या राती
नाही दिसत मला ।।
सांग ना गं आई
सूर्य कसा तापतो
कधी पडते छाया
ढगा आड लपतो ।।