Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
वास्तव आणि अवास्तव
वास्तव आणि अवास्तव
★★★★★

© Raosaheb Jadhav

Inspirational Tragedy

2 Minutes   13.0K    17


Content Ranking

तो नाकारतो

आणि कदाचित नाकारते तीही

अपत्यप्राप्तीच्या सोहळ्यातून

गर्भ मुलीचा साकारण्यापूर्वीच...


शोधल्या जातात युक्त्या त्यासाठी

तंत्रस्नेही जाणिवांच्या सोबत

मांडत गणिते

गर्भगळीत भावनांना सावरणाऱ्या प्रपंचाची...


त्याचवेळी नेमकी त्यांना ऐकू येते,

कावकाव चिवचिव...

किंवा मग

बेंबीच्या देठापासून ठोकलेल्या आरोळ्या

घशातून मुक्तपणे

ओसंडून वाहणाऱ्या पुस्तकी तत्त्वज्ञानाच्या नद्यांसारख्या

---ज्या करू पाहतात पवित्र

एका डुबकीत मानवजन्माला

पवित्रतेच्या दावत स्वर्गसंकल्पना---


किंवा कदाचित

अवतरत राहतात समाजचिंता वाहकांच्या

लेखणीतून चार सुविचार, सुभाषिते, चारोळ्या

किंवा काव्ये, महाकाव्येही मुक्तपणे

'मुलगी वाचवण्याचे सल्ले देणारी...'


मात्र तरीही

वाचतच नाही मुलगी

मुलगी दिनाच्या दिवशीही...


जागाच उरलेली नसते

रुजण्यासाठी तिला

पुरुषीमुळजटाने घेरलेल्या मातीत...


ज्या मातीने उगवून आणल्यात जनकमेंदूंच्या तळाशी

पाझरणाऱ्या ग्रंथी

ज्यांच्यातून पाझरली मुक्तपणे

तिला वगळण्याची डावपेची संप्रेरके

त्याच संप्रेरकी समाजधुरीनांनी

उगवून आणल्यात कित्येक पिढ्या

तिला ठरवत दुय्यम

पिकात वाढलेल्या तनभडागत...

आणि दिली लावून वाळवी हुंड्याची

तिच्या वाढत्या वयासोबत

मेंदू पोखरणारी... जन्माआधीच

आणि शिकवली कला त्यांनीच

तिला कोपऱ्यात ढकलण्याची

रुजवत मानापमानाच्या

सुसंस्कृत धर्मसंकल्पना...


आणि आता

सुरू झाली त्यांचीच पोपटपंची

अस्तित्व धोक्यात आल्यावर स्वत:चेच,

'तिचा जन्म नाकारू नये' च्या ठळक थापा...

तेव्हा कुठे मग,

घातली गेली यंत्रतंत्रावर बंदी

पोटदुखीचे औषध चोळत माथ्यावर...

पण तरीही वाचतच नाही मुलगी...


हे पोकळ 'पोपटपंच'

'पंच' होऊन बदलू शकत नाहीत

इथली समाजव्यवस्था...

हे वास्तव कळून चुकलेले असते

त्याला आणि तिलाही

म्हणून त्यांनी घेतलेला असतो सावध पवित्रा...


कारण कायद्यातले कलम रुजले नसल्याची वास्तव जाणीव

झालेली असते त्यांना

त्यांच्या अनुभवातून...


आणि हेही कळलेले असते त्यांना

फुकटात... सल्ले देणारेही

देणार नाहीत तिला

समान हक्क मुलाच्या संपत्तीत

आणि गुंताही नाही सोडवणार

वास्तविक परंपरांनी

तिला देवी बनवणाऱ्या काल्पनिक कथानकांचा

म्हणूनच कदाचित नाकारते आईही

बाईचा जन्म...

आणि वाचतच नाही मुलगी...


अखेर मिळवलेले असते त्यांनी

तिला नाकारण्याचे जीवघेणे बळ;

जेव्हा तिने पाहिलेले असते

आई होण्याआधीच

बाईपणाच्या ओझ्याखाली

खुजी झालेली तिची आई

आणि त्यानेही पाहिलेले असतात

बहिणीसाठी स्थळं शोधताना

बापाचे झिजलेले जोडे

सोबतच असते अनुभलेली

मुलगा म्हणून जगल्याची महानता

लग्नाआधीच स्वतःच्या...

आणि पाहिलेले असते

तरुण्यसुलभ सुंदरतेला तिच्या

मखरात बसवून सजवत केलेले कोरीव काम

तिच्या पापण्यांवर

आणि काळ्या गोऱ्या त्वचेला उजळत ठेवण्यात

खर्ची घातलेले तिने

स्वतःचे शहाणपण

'उडदामाजी काळे गोरे' म्हणत

भेद करणाऱ्या समुहासमोर

ह्या गोऱ्या मुखवट्यातल्या काळेपणापुढे

करत राहावी तिने

जाहिरातीसाठी सजवलेल्या बाहुलीची भूमिका

हतबल होत खेळण्यासाठी बनवलेल्या वस्तूगत


आजच्या त्या जनकांना नसेल मान्य कदाचित

बाहुली होऊन पडावा आपला पोटचा गोळा

कोणाच्या हाती...

म्हणूनच नाकारत आहेत ते, अस्तित्व तिचे...

आणि नाकारली जाते मुलगी

जन्माआधीच...


आता तर

त्यांनी जुंपून घेतलेत स्वतःला

संसार दोघांचा म्हणत

घराच्या माथ्यावर

बंद दरवाजाचा मारत शिक्का

वगळत प्रश्न मुलीच्या सुरक्षेचा

आणि घोटला जातो गळा

प्रश्नांचाच मग

उत्तरांच्या आधी

आणि वाचत नाही मुलगी...


आणि का नाकारू नये त्यांनी

सम्मतीने समाजाच्या

झुगारत सगळे पोकळ सल्ले.?

जोवर नाही होत तजवीज

‘मुलगा’ वाचवण्याची

हिकमती ‘पुरुषीपणातून’

टाळून सल्ले पोकळ कल्पकतेचे

येऊन 'ग्राउंडलेव्हलवर'...?


तेव्हा मग जागले असते शब्द

आणि जगली असती मुलगी

जेव्हा वाटली जात होती अक्षरे

पाट्या-वरवंट्यावर वाचण्याऐवजी...

नसत्या ठरल्या भळभळत्या लेखण्याही

बिनकामाचे हत्यार

आणि मग कदाचित

नसते द्यावे लागले सल्ले, ‘मुलगी वाचवण्याचे.’

आणि वाचले असते आपसूकच

कागद, शाई आणि काही कलमही कायद्याचे...


हल्ली तर माझी कविताही

नाकारू लागलीय 'मेकअप'

कदाचित ही लढाई तर नसेल

तिच्या अस्तिवहीनतेला

आव्हान देणाऱ्या जनकपेशीशी?


वास्तव अवास्तव मुलगी वाचवा स्त्रीभ्रूणहत्या भयावह

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..