मृत्यूच्या दारात ( अभंग रचना )
मृत्यूच्या दारात ( अभंग रचना )
मृत्यूच्या दारात
मृत्यूच्या दारात I वाटले थांबावे |
क्षण ते पहावे | सुटलेले ॥ १ ॥
एकटा प्रवास I आता अखेरचा |
आणि सोडायचा | मोहपाश ॥ २ ॥
मोह माया सारे I सोडून तू देरे |
यात्रेस त्या जारे I अनंताच्या ॥ ३ ॥
माझे माझे सारे I इथेच राहते I
रिकामे हात ते। अधांतरी ॥ ४ ॥
मृत्यू हेच सत्य | अंतिम असते I
जीवन राहते I क्षणभर ॥ ५ ॥