STORYMIRROR

Charumati Ramdas

Abstract Crime Thriller

3  

Charumati Ramdas

Abstract Crime Thriller

धनु कोष्ठक - ३

धनु कोष्ठक - ३

4 mins
149

“ओह-हो-हो” मुलगी पुटपुटते. 

“मी दिलगीर आहे,” कपितोनव फॉर्म भरता-भरता म्हणतो. “कोणी साम्प्रदायी वाटतो.”

“कॉन्फ्रेन्सचा सदस्य आहे,” रिसेप्शनिस्टने उत्तर दिलं.

“मीसुद्धां सदस्य आहे.”

कधी-कधी ढंगाचे लोकही येतांत.”

“माझ्याकडे माझं आडनाव आहे, लपवण्यासारखं काहीच नाहीये.”

“आत्ता बघते, काय आहे ते,” रिसेप्शनिस्ट कपितोनवचं पासपोर्ट उघडते आणि म्हणते, “कपितोनव.”

“कपितोनव,” कपितोनव डोकं हालवतो.

“एव्गेनी गेनादेविच,” मुलगी म्हणते.

“जर वडिलांच्या नावाबरोबर म्हणाल, तर हो,” कपितोनव ह्यावर म्हणतो. 

“आहे!” तिला लिस्टमधे त्याचं आडनाव सापडलं होतं. “आणि माझी काय चूक होती?...तुम्ही तर स्वतःच सगळं बघितलंय नं?...कारण की आम्हीं कोणत्याही टोपणनावाने रजिस्ट्रेशन करून घेतो, आणि मग...”

“लिस्टमधे काय त्याचं हेच नाव आहे...ईवेन्ट्स-आर्किटेक्ट?”

“हो. तसले तिघं आहेत – टोपणनाव असलेले. त्या दोघांकडे कमीत कमी पासपोर्ट तरी होते...” 

ऑर्ग-कमिटीची प्रतिनिधि जिन्याकडून लवकर-लवकर हॉलमधे येते. बैजकडे बघतां – ओल्गा मात्वेयेवा.

“नमस्ते. हे तुम्हीं आहांत?” ती ए.गे.कपितोनवशी एका अश्या प्रतिनिधीच्या थाटांत बोलूं लागली, जो कोणतीही समस्या सोडवूं शकतो. “कसे आलांत? काही समस्या आहे कां? काळजी नका करूं, आपण सगळं व्यवस्थित करू...”

“नमस्ते, ओल्गा, पण...”

“तो आत्तांच निघून गेला,” काउन्टरच्या मागून सोनेरी केस वाली मधेच टपकली.

“कुणीकडे?”

“तिकडे. म्हणाला की आपल्या सगळ्यांना भोगावं लागेल.”

“ओह, हेल!” आणि ऑर्ग-कमिटीची ओल्गा जशी आहे तशीच, म्हणजे गरम कपडे न चढवतां बाहेर, बर्फांत जाऊ लागते, पण लगेच परंत येते. “कमीत कमी, तो दिसायला कसा आहे?”

“तुम्हीं लगेच ओळखाल,” रिसेप्शनिस्ट उत्तर देते.

“पिवळा डगला,” कपितोनव ओरडून सांगतो, पण ओल्गा मात्वेयेवाने, जी दाराच्या बाहेर निघून गेली होती, खचितंच त्याचं म्हणणं ऐकलं असावं.

“फक्त, तो डगला नव्हता,” विचारांत गढलेली रिसेप्शनिस्ट प्रतिवाद करते, “त्याला काहीही म्हणा, पण डगला नको...सही करा, प्लीज़. (कपितोनवने फॉर्म तर भरला होता पण सही करायला विसरून गेला होता.) रूम नं, 32, तिसरा मजला. ब्रेकफास्ट साडे सहा ते दहा पर्यंत. खोलींत धूम्रपान करायची मनाही आहे.”

“आणखी कोणच्या गोष्टीची तर मनाही नाहीये नं?”

“नियम वाचून घ्या, तुम्हीं सही केलीये ना, की नियमांची ओळख झाली.”

“म्हणतांत की आज तुमच्याकडे काहीतरी उडवून देणार होते?” किल्ली घेऊन कपितोनव उत्सुकता दाखवतो. 

“तुम्हीं आपल्या लोकांनाच विचारलं असतं, ते जास्त चांगलं सांगू शकतील. आमच्याकडे उन्हाळ्यांत फुटबॉल-फैन्स थांबले होते, ते असताना जास्त शांति होती.”

ओल्गा बाहेरून परंत येते, ब्लाउज़वर हिमकण होते, तिने स्वतःच आपले खांदे धरलेयंत.

“मी काही त्याच्यामागे धावणार नाहीये! जेव्हां परंत येईल, तेव्हां लगेच मला फोन करं. जास्तीत जास्त, त्याला कोणाच्यातरी फ्लैटमधे थांबवून देऊं.”

“हूँ, काहीतरी असंच करावं लागेल,” काउन्टरच्या मागची मुलगी म्हणते.

“आणि तुम्हीं – कपितोनव?” ओल्गा कयास लावते. “एव्गेनी...गेनादेविच? चला, शेवटी...ट्रेनच्या बाबतीत गडबडंच झाली, तो, मी तुम्हांला फोन केला होता. आठवलंय?”

कपितानोवला केव्हांच समजलं होतं, की ती दोघी ओल्यांपैकी एक आहे, आणि त्याला कळलंय की ही कोणची आहे. जिने त्याला आर्किटेक्ट म्हटलं होतं, जेव्हां ट्रेन पुलावरून जात होती.

“तुम्हीं मला ‘हा’ समजल्या?” 

“कठीण दिवस आहे,” ओल्याने म्हटलं. “गोष्ट फक्त येवढीच होती, की तुम्हीं दोघं शेवटचे होता आणि दोघेही एकांच वेळी आलांत...”

“तुम्हीं काय सगळ्यांनाच रिसीव्ह करतां?”

“ओह, नाही. ‘तलाव’ने4 सांगितलं होतं की तुम्हांला नक्कीच रिसीव्ह करायचंय” 

“मला?”

“आणि हा आहे पित्रोज़वोद्स्कचा. तोच आहे. त्याच्याबरोबर नेहमी काही न काही प्रॉब्लमच होत असते...हो! तुम्हांला ब्रीफकेस द्यायचीय...” ती काउन्टरच्या मागे शोधते आणि काळी ब्रीफकेस काढते, साधारण ब्रीफकेसपेक्षा लहान. “तुम्हांला, सदस्य म्हणून. कॉन्फ्रेन्सचे कागद पत्र वगैरे, बघून घ्या...”

“आर्किटेक्टनेपण मागितली होती, मी नाही दिली.” सोनेरी केसवाली काउन्टरच्यामागून सांगते.

ओल्गा मात्वेयेवा काचेच्या भांड्यातून चॉकलेट काढते:

“छान वाटतं. मला तर अगदी वेड लागलंय. तुम्हांला कोणच्या? तिस-या? चला, आपला रस्ता एकंच आहे,” कपितोनवला लिफ्टकडे घेऊन जाते.

कपितोनवच्या डाव्या खांद्यावर झोळा आहे, उजव्या हातांत – ब्रीफकेस, ती वजनदार नाहीये. कपितोनव वळून बघतो, पण सोनेरी केस वाली रिसेप्शनिस्ट त्याच्याकडे बघंत नसून कागदांमधे काहीतरी बघतेय. तिरप्या नजरेने कपितोनवला आपल्या गाइडच्या ओठांवर हसू दिसतं.

त्यांनी बोलावल्याबरोबर लगेच लिफ्ट नाही येत. वाट बघतात.

ओल्गा मात्वेयेव्नाची उंची त्याच्यापेक्षा अर्ध डोकं कमी आहे, ती किंचित वाकून चालते, तिच्या चेह-याच्या भावांत पक्ष्यांसारखं काहीतरी आहे, - तिच्याकडे नुसतं बघण्यापेक्षा कपितोनव तिला विचारतो:

“आणि ही बॉम्बची भानगड काय आहे?”

“कोण्या डुकराच्या पिल्लाने पोलिसमधे फोन केला आणि सांगितलं की हॉलमधे बॉम्ब लपवलेला आहे. बस, येवढंच. सेशन खड्ड्यांत गेलं. पूर्ण दिवस बेकार गेला. म्हणजे, तुमचं काही नुकसान नाही झालं. सगळं – उद्यांच होईल.”

“ह्यामागे कोणाचा स्वार्थ आहे?”

“म्हणजेच, कोणाचातरी नक्कीच आहे,” ओल्गा म्हणाली. “हा ईवेन्ट्स-आर्किटेक्ट जर सकाळी आला असतां, तर सगळ्यांना असंच वाटलं असतं, की हे त्यानेच केलंय. भाग्यवान आहे.”

“मीपण,” कपितोनव म्हणतो. 

“नाही, तुमच्यावर कोणी शंका घेतली नसती.”

“आणि, तो कोणत्या ईवेन्ट्सचा आर्किटेक्ट आहे?”

“हे पहा, मी तर त्याला बोलावलं नाहीये. माझ काम फक्त पाहुण्यांना रिसीव्ह करायचं आहे.”

लिफ्ट खाली आली : आरामांत दारं उघडते, मग विचार करते, की त्यांना बंद करायचं का. तसंही लिफ्ट एक पवित्र जागा आहे – इथे बोलंत नाहींत, आणि बटन्स, बघण्याची परंपरागत वस्तु असल्यामुळे, आपल्या दररोजच्या चेह-याने, दररोजच्या विचारांना बाहेरंच ठेवतात. जोपर्यंत तिस-या मजल्यावर बाहेर नाही निघंत, दोघंही चुपंच राहतात आणि विचारसुद्धां करंत नाही.

“तुम्हांला इकडे, आणि मला कॉरीडोरच्या त्या कोप-यापर्यंत जायचंय. जर ऑपेरा बघायचा असेल – तर सात वाजता दुस-या मजल्यावर, खास करून डेलिगेट्ससाठी. कॉन्सर्ट. पण मला वाटतं, की तुम्हीं डुलक्या घेऊं लागाल. नीट झोप नाही झाली, हो ना?”

“हो, इथे मेडिकल स्टोअर कुठे आहे?”

“अनिद्रा? तुम्हांला मेडिकल स्टोअरची गरंज कां पडली?”

“मॉस्कोत माझी तब्येत बिगडली होती.”

“आणि मला वाटलं की ट्रेनमुळे...थोडीशी ‘रम’ घ्या, जास्त चांगलं राहील, ‘मिनिबार’मधे असेल...आणखी एक : ब्रीफकेसबद्दल...त्यांत इतर गोष्टींसोबत एक ‘सुवेनीर’पण आहे – जादूची छडी, फक्त छडी, लाकडी, ताईतासारखी, बघा...घाबरूं नका, ही फक्त गम्मत आहे. इथे, असं वाटतं की सगळ्याच लोकांना विनोद कळंत नाही, म्हणूनंच मी तुम्हांला सांगून ठेवते. नाहीतर तुम्हीं काही-बाही विचार करूं लागाल...” 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract