Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

3  

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

धनु कोष्ठक - २५

धनु कोष्ठक - २५

3 mins
200


लेखक: सिर्गेइ नोसव : भाषांतर: आ. चारुमति रामदास 


15.21 


इंटरवल संपला. हॉलमधे लोक खुर्च्यांवर बसूं लागले आहेत. कपितोनवपण एका रिकाम्या खुर्चीकडे जातंच होता की ‘तलावने त्याला थांबवलं:

तुम्हीं काल पार्टीशन बरोबर आपल्या कार्यक्रम दाखवायचं कबूल केलं होतं. चलाहोऊन जाईल. अजून पाच मिनिट आहेत.

तलावबरोबर हॉलच्या शेवटापर्यंत जावंच लागतं. एक दार प्रकाश व्यवस्था करायच्या खोलीकडे जात आहेआणि दुसरं त्या खोलींत जिथे माइक्रोफोन्सफालतूच्या खुर्च्या आणि सगळ्या प्रकारचं भंगार पडून आहे, - दार उघडून ‘तलाव’ कपितोनवला इथेच आणतो.

तुम्हीं थोडे नाराज दिसताय. तुम्हांला खूश करूं कातर ऐकाजशी तुमची इच्छा होतीबोर्डसाठी तुमची निवड झालेली नाहीये. आत्ताच रिजल्ट्स ऐकून आलोय. पणहे सीक्रेट आहे. चलाआत्ता घोषणा करतीलंच.

खरंचही गुड-न्यूज़ आहे,” कपितोनव सहमति दाखवतो.

भिंतीपासून थोडी दूरदोन पायांवर आणि क्रॉसच्या आधारावर प्लायवुडची एक फ्रेम उभी आहे – त्यावर नवीन वर्षाच्या क्रिसमस ट्रीची जाहिरात चिटकली आहे: सांता क्लॉज़डावा हात छडीवर टेकवून आणि उजवा हात लेनिनच्या स्टाइलमधे पसरून उभा आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे विचित्र वाटतं.

हे पार्टीशन नाहीयेपण चालेल,” ‘तलाव’ म्हणतो आणि त्या फ्रेमचा पाय उचलतो.

कपितोनव दुसरा पाय उचलतो.

तुमच्या पक्षांत फक्त दोन मत होते. एक माझं होतं.

दोघं मिळून पार्टीशन सरकावतात.

पणतुम्हांलाआशा आहेकी निवडलंय?”

प्रश्नंच नाही. प्लीज़ परवानगी द्यामी हे नाही सांगणार की माझ्या पक्षांत किती मतं पडले. लवकरंच माहीत होईल. तुम्हीं इथे उभे राहाआणि मी तिकडे राहीन – ‘तलाव’ निर्देश देतो आणि पार्टीशनच्या पलिकडे कपितोनवपासून लपून जातो.

मला अजूनही समजंत नाहीयेकी माझं नाव कशाला द्यायचं होतं,” कपितोनव म्हणतो.

आम्हीं सगळं बरोबरंच केलं होतं. आणि तुम्हीं आमची मदद अश्याप्रकारे केलीकी आपल्या उमेदवारीचा विरोध नाही केला. समजावण्याला खूप वेळ लागेल. पण तुम्हांला – थैन्क्स.

दार किंचित उघडून कोणीतरी हॉलमधून डोकावलं. 

प्लीज़डिस्टर्ब नका करू! आमच्यांत पुरुषांची गोष्ट चालली आहे!” पार्टीशनच्या मागून ‘तलाव’ ओरडतोआणि लगेच दार बंद होतं.

तुम्हीं तयार आहांत?” कपितोनव विचारतो.

मी नेहमीच तयार असतो. मला काय करायचंय. पण तुम्हीं तयार आहांत कांलक्ष केंद्रित कराल कां?”

नाही करणार.

कपितोनव दीर्घ श्वास घेतो.

दोन अंकांची संख्या मनांत धरा,” कपितोनव नेहमीसारखं म्हणतो.

धरली.

त्यांत 13 जोडा.

जोडले.

अकरा वजा करा.

तुम्हीं 21 धरले होते.

ब्लैक जैक.(पत्त्यांचा एक खेळ – अनु.) 

काय ब्लैक जैक?”

पुन्हां पत्ते.

तुम्हीं समजतांय की माझ्याकडे सुपर-इन्ट्यूशन आहे.

ठीक आहे. धरली.

त्यांत जोडा.

आणि जर नाही जोडले तर?”

तुम्हीं जोडा नं!

ठीक आहेजोडले.

“4 वजा करा.

हेंच तरकशालाकशालाठीक आहेवजा केले.

“73”.

तलाव’ अर्धा मिनट चुप राहतोमग निर्णयात्मक घोषणा करतो:

सगळं स्पष्ट आहे. तुम्हीं चेहरा नाही बघंतपण आवाज ऐकता. हेआवाजाने. पुन्हांपण ह्यावेळेस मी चूप राहीन.

संख्या धरा,” कपितोनव म्हणतो, “दोन अंकांची.

तलाव’ उत्तर नाही देत. मग कपितोनव म्हणतो:

त्यांत जोडा.

तलाव’ चूपंच राहतो.

“3 वजा करा,” 

त्याला उत्तर नाही मिळंत.

तुम्हीं धरली होती 99.”

त्याबाजूने पार्टीशनवर प्रचण्ड धक्का बसला. हा ‘तलाव’ खाली पडतोय. कमकुवंत आधारामुळे एका कोप-याने कपितोनवच्या चेह-याला स्पर्श करंत पार्टीशन उसळतंय.

पार्टीशनसोबत ‘तलावपण धप्पकन फरशीवर पडतो.

कपितोनव तिकडे धावतोआणि भीतीने थिजून जातो. ‘तलाव’ पाठीवर पडला आहे. त्याचा चेहरा विकृत होत आहे. त्याचे डोळे उघडे आहेत. तो अजूनही श्वास घेतो आहे (की कपितोनवला असं वाटतं की तो अजूनही श्वास घेतोय).

एम्बुलेन्स! एम्बुलेन्स!” कपितोनव ओरडतोआणि हाताच्या झटक्यामुळे खिशांत ठेवलेला मोबाइल छताकडे उसळतो. 

दार धाडकन् उघडतंआणि कोणीतरी फरशीवरून मोबाइल उचलणा-या कपितोनवला टक्कर मारतो. आणखी दोन जादुगार धावतंच खोलीत येतात.

आणिकपितोनवच्या हातांतून मोबाइल पुन्हां बेडका सारखा उडी मारतो.

त्याने संख्या धरली होती...99...मला वाटलं नव्हतं...मला असं वाटंत नव्हतं...कोणीतरी एम्बुलेन्स बोलवा.

तिला बोलावलेलं होतं.

आवाज ऐकू येतात:

त्याने त्याला काय केलं?”

तुम्हीं त्याला काय केलं?”

हा तर मेलाय.

कोणी हृदयाची ‘मसाज’ करू शकतं कां?”

नेक्रोमैन्सरला बोलवा!

तो नेक्रोमैन्सर (ओझा) आहेजीवनरक्षक नाही!

बघाइथे रक्त आहे!

रक्त कपितोनवच्या चेह-यावर आहे – पार्टीशनच्या कोप-यामुळे त्याची हनुवटी खरचटली होती.

अंधार होऊं लागलाधुकं दाट झालंधुंध पसरलीप्रत्येक गोष्ट तरंगत असलेली वाटू लागली – हे सगळं त्याच्या डोळ्यांत आहेतो ग्लासेससारख्याएकांत एक ठेवलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्यांच्या टॉवरचा आधार घेऊन उभा आहे. ‘तलावच्या उघड्या डोळ्यांबद्दल फक्त येवढंच सांगता येतं: डोळ्यांची बुब्बुळं स्थिर आहेत. 

खोलींत लोकांची गर्दी वाढू लागलीय. सगळ्यांना एकच काळजी आहे कि कपितोनव कसा वागतो आहे, ‘तलाव’ कसा पडला आहे.

आपसांत विचार-विमर्श करतात:

काय भांडण झालं होतं?”

“ ‘तलाव’ ने म्हटलं होतं की त्यांच्यांत पुरुषांच्या गोष्टी होणार आहेत!

ज्युपितेर्स्की सगळ्यांना बाहेर काढण्याची जवाबदारी घेतो.

एडमिनिस्ट्रेटर येतोतो पुनरावृत्ति करतो: “हे भयंकर आहे! हे भयंकर आहे!

ही गोष्ट सगळ्यांना कळलीये की ‘तलावने 99 संख्या धरली होती.


15.42


लिओन्ती करासड्राइंगरूम-मैजिक मास्टरज्याने अंगणांत एम्बुलेन्सच्या टीमचं स्वागत केलं होतंतिला घेऊन मृत देहाजवळ येतो: एक महिला डॉक्टर आणि दोन उत्साही सहायक झर्रकन खोलींत येतातत्यांना अजूनही काही आशा आहे.

खोली रिकामी करा,” डॉक्टरने हुकुम सोडला.

खोली फक्त दोनंच लोक रिकामी करूं शकतात (बाकी लोक निघून गेले होते) – कपितोनवजो जसा उभा होतातसांच उभा आहेआणि जादुगार-माइक्रोमैजिशियन झ्दानवज्याला चौकस ज्युपितेर्स्कीने स्वतः कपितोनवकडे लक्ष ठेवण्याचा निर्देश दिला होता.

दोघं दाराकडे जातंच होतेकी त्यांच्यामागे डॉक्टर ओरडली. मागे वळले.

हे काय आहे???”

तलावच्या कोटाच्या बाहीतून पांढरा उंदीर बाहेर निघाला. तो ‘तलावच्या गार पडलेल्या हातावर नाकाने टक-टक करतोय.

तलाव’ फक्त पत्त्यांच्या जादूचाच स्पेशलिस्ट नव्हतात्याला आणखीही अनेक प्रकारचे जादू येत होते.

ज़्यूज़्या,” झ्दानव म्हणतो.

झ्दानव ज़्यूज़्याला उचतो आणि आपल्या रेघांच्या कोटाच्या चौड्या खिशांत ठेऊन घेतोकपितोनवला रस्ता देऊन स्वतः त्याच्या मागे-मागे बाहेर निघतो.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract