Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

3  

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

धनु कोष्ठक - २६

धनु कोष्ठक - २६

5 mins
193



15.47


हॉलमधे जादुगार उगीचंच इकडे-तिकडे फिरंत आहेत. काही लोक खुर्च्यांवर बसलेय. आणि, कारण की ते त्या दाराकडे पाठ करून बसले आहेत, ज्यांतून कपितोनव आणि झ्दानव बाहेर निघाले होते, म्हणून कपितोनव हॉलमधे परत आलाय, हे त्यांना फक्त तेव्हांच कळतं, जेव्हां हॉलमधे हिंडत असलेले लोक आपापाल्या जागेवर थिजून जातात. ते, जे बसलेले आहेत, वळले आणि चुपचाप कपितोनवकडे बघूं लागले.

“मी पुन्हां कधीच नाही...कधीच नाही...” कपितोनव जणु स्वतःच्या आवाजांत नाही बोलंत, “कधीच...कोणालाही...नाही म्हणणार...मनांत संख्या धरायला.”

जेवढं त्याला सांगायचं होतं, त्यापेक्षां जास्तच बोलून गेला, आणि जोर देऊन:

“कधीच नाही...” कपितोनव म्हणाला.

पण:

“शांत व्हा, शांत व्हा!” आपल्या समोर नीनेलला बघतो.

त्याने आठ्या चढवल्या – ती हनुवटीच्या जखमेखाली रुमाल ठेवते.

“एकही शब्द नका बोलूं. जे पण तुम्हीं बोलाल, त्याचा तुमच्या विरुद्ध उपयोग होऊ शकतो.”

दोघापैकी एक सहायक – कपितोनवला दोघांमधे फरक करणं जरूरी नाही वाटलं – खोलीतून बाहेर निघून त्याच्याजवळ येतो:

“तुम्हीं साक्षीदार आहांत कां? मला काही प्रश्न विचारायचेत.”

“कशाला?” नीनेल कडकपणे विचारते.

“कॉल-चार्ट भरतो आहे. मृत्युची वेळ, तुमच्या हिशोबाने, पंधरा मिनिटांपूर्वी? नोट केलं होतं कां?”

“हे बरोबर आहे, मी त्याला फक्त संख्या धरायला सांगितलं होतं!”

“हे काय साधारणपणे आहे?”


15.51

मृतकाला खोलींत त्याच्याच भरवशावर सोडलेलं आहे. एम्बुलेन्सची पूर्ण टीम (ड्राइवरला सोडून) हॉलमधे बसली आहे. कुठे जायची घाई नाहीच आहे. कागद-पत्र भरतांत आहे. डॉक्टर कॉल-कार्डवर नजर टाकते, जे सहायकाच्या हातांत आहे. 

“ठीक आहे, सेन्या, स्टेटमेन्टमधे तीन मिनिट आधीची वेळ टाक...तसं, नाही, थांब, आपण केव्हां पोहोचलो होतो?...आणि तुझ्याकडे मृत्यु किती वाजता झाला?…सध्या जे आहे, तेच लिही. आता किती वाजलेत?”

 

 

15.57


मेडिकल टीम आता कपितोनवमधे उत्सुकता नाही दाखवंत आहे. इथे इतर लोकपण आहेत, जे कपितोनवपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात. जादुगार-माइक्रोमैजिशियन डॉक्टरला सूचित करतो की “त्यांच्यांत पुरुषांच्या गोष्टी होत होत्या”, आणि फक्त आतांच कपितिनवला कल्पना येते, की तो झ्दानव होता, जो त्या वेळेस खोलींत डोकावला होता. जर कपितोनवला सोडलं, तर जादुगार-माइक्रोमैजिशियन झ्दानव शेवटचा होता, ज्याने मृत ‘तलाव’ला शेवटचं ऐकलं होतं (पण सान्ताक्लॉज़वाल्या पार्टीशनमुळे बघितलं नव्हतं!).

डॉक्टरला दुस-याच एका गोष्टीबद्दल माहिती हवी होती. कुणी अशी व्यक्ति आहे का, जी अगदी बरोब्बर सांगू शकेल, की ‘तलाव’ एथेरोस्क्लेरोसिसची ट्रीटमेन्ट घेत होता कां. प्रमाण विरोधाभासी आहेत.

“बाइ चान्स, इथे कुणी नातेवाईक आहेत?”

इथे कुठून आले नातेवाईक?

पण त्यांना सूचना दिलेली आहे. भाऊ लवकरंच पोहोचतोय.

ही विनंती करण्यांत येते – आणि ह्या शब्दसमूहाचा सगळ्यांवर फार मोठा प्रभाव पडतो – सर्जिकल-इन्वेस्टिगेशन ग्रुप येईपर्यंत कुणीही खोलींत येऊं नये.

“कुणावर संदेह आहे का? मुद्दा, शेवटी काय आहे?” नीनेल उठून विचारते.

“आकस्मिक मृत्यु, आम्हांला त्यांना बोलवावंच लागेल.”

कपितोनव खिडकीजवळ बसलाय. नीनेल त्याच्याजवळ आली.

“घाबरूं नका, त्यांना बोलवावंच लागतं.”


16.04


डॉक्टर:

“तुमची हनुवटी.”

“हनुवटी – खड्ड्यांत जाऊं द्या, पण झोपेचं औषध आहे कां?”

“तुम्हांला सेडेटिवची गरज आहे.”

नीनेल:

“त्यांना सेडेटिवची काही गरज नाहीये. मी स्वतःच त्यांना शांत करेन.”

त्याच्याजवळ बसून, त्याच्या हातावर हात ठेवते.

“कपितोनव शांत राहा, मी इथे आहे.”

तो उठून पैसेजमधे मागे-पुढे हिंडू लागतो.


16.06 


डॉक्टर आणि सहायक जात आहेत. पोडियमच्या जवळ महाशय नेक्रोमैन्सर उभा आहे, रिमोटिस्टला चुकवून जाणं अशक्य आहे. डॉक्टर आणि सहायक थांबले.

“मित्रांनो,” नेक्रोमैन्सर म्हणतो. “होमिओस्टेसिस (समस्थापन – अनु.). फीडबैक. नाज़ुक, सगळंच अगदी नाज़ुक, मित्रांनो”

डॉक्टर:

“तुम्हीं डॉक्टर आहांत कां?”

“मी नेक्रोमैन्सर आहे.”

ते कडेकडेने त्याच्याजवळून जातात, जातां-जातां त्याला बघंत राहतात.


16.13


“महाशय, असं वाटतंय, की सगळं काही अगदी स्पष्ट आहे. आपण वलेन्तीन ल्वोविचच्या स्मृतींत एका मिनिटाचं मौन ठेऊन मग ऑडिट-कमिटीची रिपोर्ट ऐकूं शकतो कां?”

कपितोनवला हेपण ऐकूं येतं:

“थांबा, शरीर अजून गार नाही झालंय.”

“कमींत कमी शरीर गार होईपर्यंत तरी थांबू या.”

“शरीर – शरीर आहे, आणि काम – काम.” 

“सर्जिकल-इन्वेस्टिगेशन ग्रुप येईपर्यंत तरी थांबलंच पाहिजे आणि ते गेल्यावरंच सेशनचं काम पुढे नेऊं या.”

“वाट बघू. घाई करण्याची गरंज नाहीये.”


16.38


“कपितोनव, ओळखतांय न? मी नीनेल पिरागवा  आहे. घाबरूं नका, सगळं ठीक आहे. तुम्हांला तुमच्या योग्यतेबद्दल सांगावसं वाटतंय. तुम्हांला वाटतंय की तुम्हीं बस, असेच आहांत. विचार करा, संख्या! आणि कदाचित, संख्या – त्या फक्त आइसबर्गचा तो भाग असतील, जो दिसतो, तोसुद्धां तुम्हांला सगळ्यांत जास्त दिसणारा. कदाचित, तुम्हांला...माहीत आहे...जसे प्राचीन हीरो...पर्सियस किंवा हर्क्युलस...किंवा त्यांच्याहीपेक्षा उत्तम! तुम्हीं प्राचीन देवता आहांत, फक्त तुम्हांला स्वतःलाच ह्याबद्दल माहीत नाहीये. कपितोनव, मी गंमत नाही करंत, तुम्हीं देव आहांत. नाहीतर संख्या...विचार करा, संख्या!”

“नीनेल, मी थोडा थकलोय. तुम्हीं मला एकटं सोडूं शकता कां?”

“हो, नक्की, फक्त आपला आत्मविश्वास नका गमावूं.”


16.51


हॉलमधे ‘तलाव’चा भाऊ प्रवेश करतो, जणु खूद्द ‘तलावं’च आहे, पण मोठा. 

काढलेला ओवरकोट खुर्चीवर फेकतो, ओवरकोटच्या खांद्यांवर बर्फाच्या विरघळलेल्या कणांचे डाग आहेत.

विणलेली टोपी तो नाही काढंत.

माहीत नाही कां, सगळेंच, जे त्याच्याकडे बघंत आहेत, अंदाज़ लावतात आहे, की तो नातेवाइक आहे, भाऊंच आहे, जणु ‘तलावं’च आहे, पण – मोठा.

“जर थोडा वेळ इथे थांबायचं असेल,” मृत्यु झालेल्या खोलीचं दार उघडंत ज्युपितेर्स्की म्हणतो, “तर, प्लीज़, या, पण अगदी थोडांच वेळ इथे थांबा, बघून घ्या, म्हणजे, हात नका लावूं. आम्हीं इन्वेस्टिगेशन टीमची वाट बघतोय.”

‘तलाव’चा भाऊ चुपचाप आत जातो.

एक-दोन मिनिट तिथे थांबून बाहेर येऊन जातो.

हेरा-फेरीवाला जादुगार चुबार त्याच्या बाजूलांच होता, तो त्याला काही म्हणतो, हळूंच, डोळ्यांनी इकडे-तिकडे खुणा करंत. ‘तलाव’चा भाऊ तीक्ष्ण नजरेने हॉलकडे बघतो, आणि कपितोनवला वाटतं की त्यालाच शोधताहेत.

जादुगार-माइक्रोमैजिशियन पहिल्या सारखांच कपितोनवपासून दूर नाही होत, म्हणून ‘तलाव’चा भाऊ, जेव्हां जवळ आला, तर त्या दोघांच्याही जवळ आला. कपितोनव ह्या गोष्टीसाठी तयार होता, की त्याला काहीतरी विचारतील, पण तो चुकला – ‘तलाव’चा भाऊ झ्दानवकडे वळतो.

“मला सांगण्यांत आलंय, की तुम्हीं ते शेवटचे व्यक्ति आहांत, ज्याने माझ्या भावाचा आवाज ऐकला होता.”

“शेवटच्या आधीचा,” झ्दानव उत्तर देतो. “मी दार उघडलं, आणि तुमच्या भावाने मला सांगितलं, की त्यांच्यांत ‘पुरुषांची गोष्ट’ होते आहे – ह्याच्यासोबत. मला माहीत नाही की नंतर त्यांने कशाबद्दल गोष्टी केल्या.”

“कशाबद्दल?” ‘तलाव’चा भाऊ कपितोनवच्या डोळ्यांत बघतो.

“जितकं मला आठवतंय,” कपितोनव म्हणतो, “तो चूप होता, आम्ही ठरवलं होतं की बोलेन फक्त मी. आणि ‘पुरुषांची गोष्ट’ – हा फक्त अलंकार आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, त्याहून जास्त काही नाही. त्याने फक्त संख्या मनांत धरली, मी ओळखली, आणि...माझ्या संवेदना स्वीकार करा. मला खरंच अत्यंत दुःख आहे.”

“कोणची संख्या?”

“99.”

“माझ्या भावाने कोणची संख्या मनांत धरली होती?”

कपितोनवने पुन्हां सगळ्याची पुनरावृत्ति नाही केली.

“आणखी कोणची ‘पुरुषांची गोष्ट’ असू शकते? ज़्यूज़्या कुठेय?”

झ्दानवने असं दाखवलं, जणु ऐकलंच नाहीये.

“ज़्यूज़्या कुठेय?” ‘तलाव’च्या भावाने पुन्हां विचारलं.

झ्दानव जायला बघतो, पण तेवढ्यांत कपितोनव म्हणतो:

“झ्दानव, थांबा!”

झ्दानव अनिच्छेनेच पांढरा उंदीर खिशांतून बाहेर काढतो, ‘तलाव’चा भाऊ डाव्या हाताने त्याला घेतो, उजव्या हाताने डोक्यावरची विणलेली टोपी काढतो आणि त्यांत उंदराला ठेवून देतो. राहिला टोपीचा प्रश्न, तर त्याने आता तिला पिशवीसारखं धरलंय. ज़्यूज़्या आता पिशवीत आहे.

‘तलाव’चा भाऊ शेवटच्या रांगेपर्यंत जातो, खुर्चीवर बसतो आणि हातांत टोपी-पिशवी धरून बसून राहतो.


17.22

 

“तो म्हणायचा की एका जिप्सी बाईने त्याला सांगितलं होतं की तो 99 वर्ष जगेल.”

“पण जगला फक्त 58.”

तेव्हां काळ-भक्षक म्हणातो:

“त्याचे हे 41 वर्ष मी खाऊन टाकले.”

अर्धा मिनिट सगळे गप्प राहतात. शेवटी माइक्रोमैजिशियन आस्त्रव उठतो.

“मी नाही राहूं शकंत ह्याच्या बरोबर...ह्याच्या बरोबर...एकाच ठिकाणी!”

त्याच्या पाठोपाठ गिळणारा-जादुगार मैक्सिम निगराज़्दोक आणि दोन अन्य माइक्रोमैजिशियन्सही निघून जातांत.

कपितोनव आणि काळ-भक्षक एकटे राहतात.

कपितोनव ऐकतो:

“स्वतःला दोष नका देऊ. मला अनुभव होतो आहे, की मी त्याला, न की तुम्हीं.”

“ऐका, तुम्हीं इथे कसे आलांत?”

“ ‘तलाव’च्या मध्यस्थीने, तसांच जसे तुम्हींपण आला आहांत.”

“हो, त्याने सांगितलं होतं.”

“मला ‘पागल’ समजलं जाण्याची सवय नाही झालीये. मला माहीत आहे, ते सगळे म्हणतात:

“चार पागल! बघा – हे आहेत चार पागल! पण चार कुठे? चला, असं समजूं या, ईवेन्ट्स आर्किटेक्ट आणि महाशय नेक्रोमैन्सर, ते खरोखरंच सामान्य नाहीयेत. पण ते दोनंच झाले, आणि ते? ते म्हणतात : हे आहेत चार!”

“माफ करा, आणि चौथा कोण आहे?”

“तुम्हीं.”

“मी?”

“तुम्हांला माहीत नाही कां, की तुम्हांला चौथा पागल म्हणतात?”



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract