Charumati Ramdas

Abstract Thriller

3  

Charumati Ramdas

Abstract Thriller

धनु कोष्ठक - ३२

धनु कोष्ठक - ३२

7 mins
172


लेखक: सिर्गेई नोसव : भाषांतर: आ. चारुमति रामदास 

21.43

“स्वर्गातील क्षेत्रांनो, तो किती गोड ‘किस’ करतो, कपितोनव!”

“कोण?”

“तू, कपितोनव! मी तुझ्याबद्दल बोलतेय!”

त्याने तिच्या ‘किस’ला बस, झिडकारलंच नव्हतं – जेव्हां ती लिफ्टमधे त्याला बिलगली होती – ओठांसकट सम्पूर्ण अंगानिशी. त्याला वाटलं की तो तिला प्रतिसाद देतोय.

आणि पुन्हां प्रतिसाद देतो.

लिफ्टची दारं आपली कसरत करंत राहतात ‘उघडले – बंद झाले’. तिस-या प्रयत्नांत दोघं बाहेर निघतात.


21.48


“…कपितोनव, तुला खरंच असं वाटतंय का, की अश्या वेळेस मी तुला सोडून देईन?...तेव्हां, जेव्हां सगळ्यांनी तुला वाळींत टाकलं आहे?...मी तशी नाहीये...मी बघतेय की तुला कशाची गरंज आहे...तुला ‘बाई’ची गरंज आहे, तुला उष्णतेची गरंज आहे, तुला आपल्या विलक्षण जादूसाठी डाइरेक्टरची गरंज आहे!...मी ठरवलंय : तू चांदीसारख्या चमचमत्या सूटमधे आपला कार्यक्रम प्रस्तुत करशील...नाही? कां?...तुला आपली किंमत कळतंच नाहीये...तुझा स्वाभिमान ढासळलाय...कपितोनव, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू एकदम दोन-दोन दोन अंकांच्या संख्या ओळखूं शकतो!...आणि चारसुद्धा!...आणि आठसुद्धां!...

“...आणि फक्त एका नजरेने कुलूप उघडणं?...खोटं, तू करू शकतोस! चल, प्लीज़ – नजरेने! फक्त नजरेने...चल, त्याच्याकडे बघ, चल ना, प्लीज़...इथे पाठीवर...

“...व्वा! उघडला!...तू! फक्त तू!...नाही, ते स्वतः नाही उघडलं!...’स्वतः’चा काय अर्थ आहे? आणि मीपण नाही!...कपितोनव, पुरे कर, माझा अपमान करायची गरंज नाहीये! तू नजरेनेच उघडूं शकतो!...ही तुझी जादू आहे! माझी नाही!...सीक्रेट जाणून घ्यायचं नाहीये...

“...स्वर्गीय क्षेत्रांनो, आह, शांत-प्रकृतिचे लोक मला कित्ती आवडतांत! मला तुझ्यासमोर कबूल करावं लागेल, कपितोनव...मी कधीही, कुणालाही ह्याबद्दल सांगितलेलं नाहीये...माझा कधीही तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांशी संबंध नाही आला...प्रामाणिकपणे!...मी नेहमी, अशा, तुझ्यासारख्या पुरुषाचं स्वप्न बघंत होते, कपितोनव!...

“...कपितोनव! तू – बुद्धि आहे, तू – शक्ति आहे. तू – सामर्थ्य आहे. तू – पायथन (अजगर-अनु.)आहे.

“...कपितोनव, आपण कुठे आहोत?...मला कळंत नाहीये, तू मला आपल्या हॉटेलच्या खोलींत घेऊन आलास?

“...कपितोनव, मी, फक्त, तुला आधीच सांगून ठेवते...मी ओरडेन...परवानगी आहे?...तू घाबरंततर नाहीयेस ना की मी तुला लफड्यांत ओढेन?”


..... ...... ......


जेव्हां ती आपल्या पायांचा त्याच्याभोवती वेढा घालते, जवळ-जवळ त्याला आपल्या आत दाबंत, आणि आधी गुरगुरते, मग ओरडते : “कपितोनव!”, तो आपल्या विचारांवर परंत येतो. तो कपितोनवंच आहे कां, की दुसरा कुणी आहे, ज्याने कपितोनवला प्रतिस्थापित केलंय?

ह्याच्या आधी इतक्या कळकळीने त्याला कुणीही ठासून नव्हतं सांगितलं, की तो कपितोनव आहे, आणि ह्याच्या आधी, त्याच्या मनांत ही शंकापण कधीही उद्भवली नव्हती.

काळे केस एखाद्या डागासारखे विखुरले होते. कुठे ही मेदूसा31 गॉर्गोन तर नाही? ‘गॉड्स, सेव मी, - मेदूसा गॉर्गोनच्या सुंदरतेचा आकस्मिक विचार कपितोनवच्या मनांत रुतला! तिच्या सौंदर्याची कुणी ग्वाही दिली असती, जर सगळ्या पाहणाऱ्यांचा मृत्यु होत होता, आणि, तो, जो सुखरूप वाचला होता, बिनाकिल्ल्याचा, काय नाव होतं त्याचं...हर्क्युलस, नाही...पेर्सेई...तोपण दयनीय प्रतिबिम्बाशिवाय काय बघूं शकला होता?...

[बस, तो त्याला आधीच हरवून बसला होता (कपितोनव - आकस्मिक विचाराला).]

तिच्या कानांत मोठे-मोठे इयर-रिंग्स आहेत – पातळ, चौडे, लेससारख्या प्लेट्स असलेले, अल्टारच्या दाराची आठवण देणारे. हे इयर-रिंग्स आहेत कां? कवचाचे उरले-सुरले तुकडे – पोषाकाची शेवटची वस्तू, जी तिच्या शरीरावर शिल्लक होती.

“क-पि-तो-नव!...क-पि-तो-नव!...” जणु ती घाबरतेय की पूर्ण नाही तरी कपितोनवच्या अस्तित्वाचा एक भाग हरवून जाईल – क, किंवा, पि, किंवा तो, किंवा नव.

कपितोनव, फक्त असंच, दुस-या प्रकाराने नाही.


........ ......... .......


ह्यानंतर त्याला असं वाटतं, की हीच शांतता आहे – ती, जिला ऐकावं, ती खरं म्हणजे साधारण प्रकारच्या बारीक आवाजांनी ओथंबलेली आहे – खिडकीच्या पलिकडची, दाराच्या पलिकडची आणि बस, ह्यांच खोल्यांची : कुठे श्च्श्च्श्श्च, कुठे प्त्स्क, कुठे करकर, कुठे ब्रूम, कुठे टाक-टिक-टाक-टिक, कुठे “तिसरा, तुला सांगतेय” (कॉरीडोरच्या शेवटी).

एकदुस-याच्या बाजूला झोपायला पुरेशी जागा आहे. तो, तिच्याकडे तोंड वळवून, थोडा दूर सरकतो, ज्याने एका बाजूने तिला व्यवस्थित बघूं शकेल. तिचं तोंड किंचित उघडं आहे, पापण्या झुकल्या आहेत. त्याने उशी घेतली नाहीये, आणि नीनेलचं डोकं उशीत खुपसलं आहे, ज्याने तिची टोकदार हनुवटी, छताकडे झाली आहे, आणि अल्टारचं दार न्यून कोण बनवंत कपितोनवकडे आहे. चांदी? पण ती तर वजनदार असते...म्हणजे हे कवच नाहीये, तर – साखळ्यासुद्धां नाहीये.

कपितोनव धातुच्या ह्या दागिन्याला बोटाने स्पर्श करतो – सावधपणे, ज्याने तिची झोपमोड होऊं नये, कारण की त्याला खात्री आहे, की ही बाई दूर, एखाद्या दुस-या जगांत पोहोचली आहे: ती इथे नाहीये, ती काळ आणि स्थानाच्या वेगळ्याच परिधीत आहे.

तो तिच्या श्वासाची लय न्याहाळतो, जी तिच्या पोटाच्या माध्यमाने प्रकट होत आहे आणि वक्षस्थळ अगदी स्थिर आहे.

एका बाजूने बघितल्याने तिचं वक्षस्थळ धनु-कोष्ठकांसारख दिसतंय,

कपितोनव दुसरीकडे तोंड फिरवतो – त्याच्यापासून दोन मीटर्सच्या अंतरावर भिंतीत आरसा लावलेला आहे. तर्कसंगत आहे : निर्वस्त्र, हाडं निघालेला, आणि त्याच्यामागे ती, धनु-कोष्ठकवाली.

ते चौघं आहेत.

जर दोन्हीं कपितोनवांना एक समजलं, तर कपितोनव धनु-कोष्ठकांच्यामधे दबलाय.

तो – जणू घरट्यांत आहे.

तो उठतो आणि स्वतःला कोष्ठकांमधून काढून मिनिबारकडे जातो.

ती लगेच शुद्धीवर येते, आणि जणु काही झालंच नाही, खांद्यापर्यंत ब्लैन्केटखाली लपून जाते – आता कोणतेच कोष्ठक नाहीयेत.

“कपितोनव, तुला मुलं-बाळं आहेत का?”

“मुलगी. एकोणीसची.”

“आणि मला एक मुलगा आहे. अकराचा. तुला काय झालंय कपितोनव?”

“इथे...माशी आहे,” कपितोनव म्हणतो.

“फ्रिजमधे?”

“हो.”

“मेलेली?”

“नाही.”

“तू उभा होतास आणि तू लक्ष नाही दिलंस, कपितोनव?” कोपरांवर थोडंसं उठते. “तू इतका घाबरलास कां? असं काय झालंय?...हिवाळ्याची माशी. हॉटेलच्या मिनिबारमधून...अरे, तुला झालं काय आहे, कपितोनव? तू माशांना भितोस कां? ही काही झुरळ नाहीये.”

“सगळं ठीक आहे,” कपितोनव स्वतःवर ताबा ठेवतो. “वाइन घेशील कां? की, इथे आणखी काय आहे? श्नेप्स – दोन घोट...वोद्का ‘रशियन स्टैण्डर्ड’…ओहो, पूर्ण शंभर ग्राम्स!”

“चला, अर्धी अर्धी. नाही, बाटलीनेच पिउया. म्हणजे ग्लास भिडवायला नकोत.”

आधी ती घोट घेते, पण बाटलीतून पूर्ण घोट तिच्या तोंडांत नाही जात – बाटलीचं तोंड खूप अरुंद आहे. तो आपला घोट घेतो.

“आणि, तुझे तिच्याशी संबंध कसे आहेत, सगळं ठीक आहे?”

“कोणाबरोबर ठीक आहे?”

“मुलीबरोबर – सगळं ठीक आहे ना?”

“हो, ठीक आहे. वाईट कां असेल?”

“नाही, बस, असंच विचारलं. प्रेमाने राहता नं?”

“नकीच, प्रेमाने.”

“हे, ‘नक्कीच’ पण? हो, नक्कीच – ती मोठी आहे...अजून लग्न नाही झालं?”

“एंगेजमेन्ट झालीय.”

“काय मजा आहे! व्हायलाच पाहिजे...आणि तू? तुझं तर लग्न झालेलं आहे?”

“सध्यां आम्ही,” कपितोनव म्हणतो – “बिल्कुल बरोबर नाहीये. तुझ्या कानांत हे काय आहे – चांदीचं आहे?”

“इयर-रिंग्स आवडतांत?”

“कदाचित, वजनदार आहेत?”

“मला वाटतं, माझ्यावर चांगले दिसतात.”

“हो, नक्कीच, छानंच दिसतात.”

ती वस्तू, जिच्याशिवाय आजचा माणसाची, कुठेही असला तरी, फार गैरसोय होते, तिच्या हातांत दिसली. ती लहानश्या स्क्रीनवर बघते:

“विचारतांत आहे, की मी कोणाच्या पक्षांत आहे – स्मेत्किनच्या की चिचूगिनच्या? टु हेल!... वॉव!...गिल्डच्या प्रेसिडेंटबद्दल विसरले. हे सगळं तुझ्यामुळे झालं, कपितोनव! बोर्डची तर पुष्टी केली, पण प्रेसिडेन्टंच नाहीये. आत्ता तिथे, रेस्टॉरेन्टमधे मतदान करतात आहेत...आणि, तुला मैसेज नाही आला कां? तू काय फोन बंद करून ठेवलाय?”

“ते कुणालाही निवडोत – मला काही फरक पडंत नाही.”

“जर तुला निवडलं असतं, तर मस्त झालं असतं.”

“उहूँ,” कपितोनव म्हणाला.

“काय ‘उहूँ’, कपितोनव? तू एक सर्वोत्तम प्रेसिडेन्ट झाला असतास.”

“पण, काय मतदान गुप्त नाहीये?”

“बघितलंस, तुला फरक पडतोय!”

“आज कोणची तारीख आहे?” कपितोनवने विचारलं.

“ओह, ही आहे न गम्मत! ओळख.”

“ठीक आहे, जरूरी नाहीये.”

“नाही ओळखू शकंत? कारण की ती दोन अंकांची नाहीये, म्हणूनंच तू नाही ओळखू शकंत!...पण, मी माझी ओळखली, तू माझी ओळख...हूँ? गप्प कां आहेस? मी दोन अंकांची मनांत धरली.”

“पुरे कर, मी हे नाही करणार.”

“ओह, प्लीज़, मी धरली आहे.”

“सांगितलं न, की नाही करणार.”

“बरं, मी त्यांत काही तरी जोडू...किती जोडू?...चार?”

“मला काही फरक नाही पडंत.”

“आणि किती वजा करूं…दोन?”

“मला काही फरक नाही पडंत.”

“तर? मी जोडले आणि वजासुद्धां केले. बोल ना रे!...गप्प आहेस?...चोवीस!”

“खोटं बोलतोयस! तू ओळखलीस! चोवीस!”

“मी काहीही ओळखलं नाहीये. हे तू मला उत्तेजित करते आहेस. मला नाही माहीत, की तू काय धरलं होतं.”

“कपितोनव, तू वाईट आहेस. आणि, तुला काय वाटतं, मी रोज हे घालते?...बरं सांग, कपितोनव, मी तुला कां ‘कपितोनव, कपितोनव!’ म्हणून बोलावते, पण तू एकदाही मला माझ्या नावाने नाही बोलावलं? तू काय बिछान्यांत सगळ्यांसोबत असांच असतोस? हा तुझा सिद्धांत आहे कां?”

“नाही, कां...”

“पूर्ण कपडे काढायला हवे होते, म्हणजे तू माझ्यावर इयर रिंग्स बघितले असते.”

“मी ते आधीही बघितले आहेत.”

“केव्हां? आपण तर काही तासांपूर्वीच भेटलो आहोत.”

“बस, बघितलेंत.”

“हो, तू स्वतःवर चष्मा नाही बघूं शकलास? तू माझे इयर-रिंग्स कसे बघितले? कपितोनव, ब्लैन्केटखाली ये, प्लीज़, वोद्का गर्मी नाही देत आहे. मला थंडी वाजतेय.”


23.16


ह्याच्यानंतर ती “कपितोनव!” म्हणून नाही ओरडली, आणि ओरडतंच नाही.

आणि मग


23.28

ती म्हणते (कारण की कॉरीडोरमधे काही लोक हल्ला करतात आहेत:

“हे आपले लोक, बैन्क्वेटहून.”

‘आपले लोक, बैन्क्वेटहून’ चालताना कोणच्यातरी मह्त्वपूर्ण विषयावर बोलंत आहेत – कोणाला निवडलंय आणि जेवणाबद्दल...

ती टैक्सी बोलावते.

“आर यू श्यूअर?”

“अगदी. मी रात्री घरींच झोपते.”

तेवढ्यांत


23.32


भिंतीच्या पलिकडचा शेजारी – तोपण बैन्क्वेटहून परतलांय.

“काळ-भक्षक, तो सारखा ओका-या काढंत असतो,” कपितोनव म्हणतो.

“माहितीये, माहितीये...अरे, माझे टाइट्स फाटले आहेत.”

कपितोनवनेपण कपडे घातले, कपितोनवला तिला सोडायला जायचंय.

“मला इथे कोणीतरी थर्मल्स विकलेत, बेलारशियन प्रॉडक्शन. ग्यारंटी देतात की चालतांना हे घर्षण कमी करतांत. मी तर तपासून नाही बघितलं.”

“आठवणीसाठी देशील?”

“ओके, गुड लक. चालतांना घर्षण कमी करतात – ही तर चांगली गोष्ट आहे.”

“पुरुषांचे. म्हणजे, आठवणीखातर...दे.”


23.56


जिना उतरताना ती त्याला म्हणते:


“तुला कधी असं नाही वाटंत का, की खरोखरंच त्याला कुणी खातंय, किंवा, माहीत नाही, पूर्ण खाऊन टाकेल कां?”

“तू काळाबद्दल म्हणते आहेस कां?”

“हो, वैयक्तिक काळाबद्दल, जो आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. कोणी त्याचा सपूर्ण गर खातोय, रसाळ गर, आणि शिल्लक उरतो भुसा. फक्त भुसा, घटनांचा भुसा. आणि बस.”

“जर तू त्याच्याबद्दल बोलते आहेस, जो माझ्या भिंतीच्या पलिकडे आहे, तर मला वाटतं की त्याचं असं नाहीये. असं नाही वाटंत की तो चविष्ठ वस्तू खात असेल. तू तर ऐकलंस की तो कसा ओका-या काढतो...”

“नाहीं, मी सामान्यपणे बोलंत होते.”

“आणि माझ्यासाठी हे दोन दिवस अंतहीन होते. ते कदाचित अश्यासाठी, की, कदाचित, मी झोपंत नाही. किंवा, कुणास ठाऊक, कदाचित, हे त्याने माझ्या आतड्यांना इतकं पिळून टाकलं असावं...”

“माफ कर, कपितोनव, पण तुझ्या चेह-यावर फार थकवा दिसतोय.”

“दिवस संपता संपत नाहीये.”

“सगळं संपेल, घाबरू नको.”

आणि खरोखरंच हे त्यादिवसाचे शेवटचे शब्द होते.

आगमन झालं


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract