Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

2  

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

धनु कोष्ठक - ३१

धनु कोष्ठक - ३१

7 mins
51


लेखक: सिर्गेइ नोसव

20.38


तुम्हीं आत जामी नाही जाणार.

पुन्हां तेचलगेच थांबवा! तुम्हीं मला चीड आणतांय.

हॉलमधे – चौकीदार आहेत्याला बघून सांगणं कठीण होतं की तो खरोखरचा सिक्यूरिटी-ऑफिसर आहेकी फक्त दाखवण्यासाठी कोणालाही तिथे उभं केलं होतं.

शोक-सभेचे आपले-आपले आयोजन असतात,” नीनेल समजावते, “परिस्थितीकडे बघताइथे आपला माणूस असायला हवा होता. कदाचितमाझ्या पर्समधे एखादा ग्रेनेड असेलतुमच्या बाहींत – हेरोइनचं पाकिट असेल. पण ही गम्मत करायची वेळ नाहीये.

रेस्टॉरेन्टच्या क्लोक-रूमचा कर्मचारी इतर सफाई कर्मचा-यांसारखा वाटतोय. कदाचितत्याला निर्देश दिलेला होताकी शोक-सभा होणार आहे.

हॉलच्या काचेच्या दारापुढे थांबतात.

बरोबरंच आत जाऊ. लोकांना दिसू देकी तुम्हीं एकटे नाहीये.

आंत आले. U-आकाराचं टेबल. बाटल्याखाण्या-पिण्याची सामग्री. खुर्च्या बाहेर ओढलेल्या. फायरप्लेसमधे आग जळतेय. सगळे लोक भिंतीला लागून उभे आहेतआपला चुपचाप चाललेला कार्यकलाप सोडून नीनेल पिरागवा आणि कपितोनवकडे वळून बघतांत.

कपितोनव आणि नीनेल पिरागवा थांबतातकारण की आत शिरल्यावर थोडा वेळ थांबायचंच असतं. त्यांना दुस-यांशी काही घेणं-देणं नाहीयेआणि दुसरेपणनीनेल पिरागवा आणि कपितोनवकडे नजर टाकून आपापल्या गुपचुप कारभाराला लागलेखरंतरहे एकंच काम होतं : अपरिहार्याची वाट बघणं. 

आतां काही लोकजसंकदाचितआधीपासूनंच करंत होतेदोन-दोन किंवा तीन-तीनच्या गटांमधे आरामांत गोष्टी करू लागतात. बाकीचे लोक एक-एकटे उभे आहेत. माइक्रोमैजिशियन झ्दानवहॉलमधे फिरंत आगपेटीच्या काड्यांची जादू दाखवतो (तलावने नक्कीच तारीफ केली असती). महाशय नेक्रोमैन्सर पाठीच्यामागे हात बांधून बोत्तिचेल्ली30-शैलींत बनवलेलं मोट्ठं पैनल बघतो आहे.

ईवेन्ट्स-आर्किटेक्ट – बाजू-बाजूने – चुपचाप इतक्यांतच आलेल्या माणसांजवळ पोहोचतो. नजरेनेच नीनेलला साक्षीदार व्हायची विनंती करतोकपितोनवला जोरांत कुजबुजंत विचारतो:

माझी इच्छा आहेकी तुम्हांला हे कळावं. नेक्रोमैन्सरने सगळ्यांच्या समोर माझ्यावर आरोप लावला आहेआणि माझी अशी इच्छा आहे की तुम्हीं मला समजून घ्यावे आणि माझ्यावर दोषारोपण करूं नये. सैद्धांतिक रूपांतमी जवळच्या ठिकाणांवर काम नाही करंत. तुम्हीं मैथेमेटिशियन आहांततुम्हांला कदाचित आईन्स्टीनचं समीकरण लक्षांत असेल - e=mc2 नाही, दुसरं – कॉस्मोलॉजिकल स्थिरांकाचं. त्यांत त्याचा रिक्की टेन्सरशी (गणिताशी संबंधित - अनु.) गुणाकार करण्यांत येतो, तुम्हांला माहीतंच आहे, अत्यंत लहान संख्या, जवळ-जवळ – शून्यंच, पण जास्त अंतरावर असे परिणाम देते!...पण, फक्त फार-फार दूरच्या अंतरावरंच! कमी अंतरावर बिल्कुलंच नाही!...माझ्याशी सम्पूर्ण साम्य आहे. मी एखाद्या काळ्या ऊर्जेसारखा आहे, समजतांय नं? मी माइक्रोइफेक्ट देऊं शकतो. ...तो सुद्धां अत्यंत दूर असलेला...सेन्ट्रल अफ्रीकेत होत असलेल्या घटनांवर प्रभाव टाकूं शकतो...आणि न केवळ ‘शकतो’ – तर प्रभाव टाकतो!...आणि भयंकर प्रभाव टाकतो – अमेरिकेत होत असलेल्या निवडणुकांवर, पण ‘तलाव’वर मी, सिद्धांततः, प्रभाव टाकण्यास समर्थ नव्हतो, जरी माझी इच्छा असती, तरीही – तो – जवळ होता, तो इथे होता. आणि एखादी वस्तू जितकी दूर असेल, तिच्यावर माझा प्रभाव तितकांच गंभीर होतो...”

नीनेलने तेवढ्यांत जोराने कुजबुजंत तर्क केला:

“तुमचं म्हणणं समजलंय. आता गप्प व्हा.”

थोडा वेळ गप्प राहून ईवेन्ट्स-आर्किटेक्ट पुन्हां आपलं म्हणणं चालू ठेवतो:

“आणि हा माझ्याशी नेहमी खार कां खातो? त्यालातर चांगलंच माहीत आहे, की मी फक्त दुरूनंच काम करतो... त्याला फक्त माझ्या आयामाचा, विस्ताराचा हेवा वाटतो...तो स्वतःपण, माझ्याचसारखा, फक्त फार लांबून...तुम्हांला वाटतं, की तो सरळ इथेंच करूं शकतो...आपल्या जागेवरून न हालतां? कां नाहीं! हा फक्त बढाईखोरपणा आहे!...मला तर त्याची सीमारेषा आणि योग्यता माहीत आहे, मला सांगायची गरज नाही...हे, त्या ग्रबावोयने त्याला डोक्यावर बसवलंय...ग्रबा ग्रबावोय आठवतो? तीच सिस्टम, तीच पद्धंत...जसे तुम्हीं मॉस्कोत कुणी ऑफिसर आहांत आणि तुम्हीं मेले आहांत, आणि तुम्हांला दूर कुठे फिलीपीन्समधे प्रमाणित करण्यांत येतं – एका स्थानीय भटक्याच्या रूपांत...तुम्हांला कधीही आठवणार नाही, की तुम्हीं मॉस्कोमधे ऑफिसर होते...”

“कृपा करून, लगेच थांबवा,” नीनेल फुफकारते. “कपितोनव तुमचं म्हणणं ऐकंत नाहीये.”

“हो, हो, इथे तुम्हीं प्राचीन, दुर्लभ वस्तूंचा व्यापार करंत होता, पण आता कुठे बांग्लादेशांत कासव पकडता...आणि, लक्षांत ठेवा, त्याचा दर्जा नेहमीच कमी असतो. मला कळतं, की प्रत्येकाला जगावसं वाटतं. पण मी असं नाही करंत. मी उद्देश्यपूर्वक, सम्पूर्ण एकाग्रतेने करतो. ब्राजीलमधे अकरा लोक कारागृहातून पळून गेले...त्याच्यासाठी काय तुम्हीं मला कोर्टांत खेचाल? पण, माझे स्वतःचे सिद्धांत, स्वतःच्या काही मान्यता आहेत...न्यायाबद्दल स्वतःच्या कल्पना आहे...”

नीनेल एक-एक शब्द सांभाळून उच्चारते:

“निघून जा. पीछे मुड – एक पाऊल पुढे – मार्च.”

तो चालला जातो, पण लगेच परंत येतो.

“मी, निःसंदेह, अद्वितीय आहे, कुणीही असं नाही करूं शकंत, जसं मी करतो, पण मला प्रोफेशनल म्हणणं बरोबर आहे कां? आपल्या कामासाठी मी कुणाकडूनही एकसुद्धां कोपेक नाही घेतला. मी इथे कशाला आहे? तुमच्यांत उपरा आहे. पण, जर मी नसतो, तर जगांत सगळंच आणखी वेगळ्या प्रकाराने झालं असतं.”

वळतो आणि हॉलच्या शेवटच्या टोकाकडे जातो.

“ ‘तलाव’चा भाऊ इथे आहे,” नीनेल पिरागवा म्हणते, “आणि तुम्हांला ते नको होतं.”

‘तलाव’च्या भावाच्या हातांत कैप-पिशवी आहे.

हेरा-फेरी, उठाइगिरी करणारा किनीकिन लक्षपूर्वक टेबलाकडे बघतो आहे.

फ्रेममधे ठेवलेल्या ‘तलाव’बरोबर दोन माइक्रोमैजिशियन्स आत येतांत. फोटो आजंच काढला होता. जेव्हां ‘तलाव’ भाषण देत होता.

श्याम-वन आणि ज्युपितेर्स्की आणणा-यांच्या हातांतून पोर्ट्रेट घेतांत आणि फायरप्लेसच्या वरच्या शेल्फवर ठेवतांत.

ह्या कृतीला सगळे सलोख्याचा संकेत समजले.

ह्याचीच वाट बघंत होते.

“कृपा करून टेबलाशी या, महाशय, उभं राहण्यांत काही अर्थ नाहीये,” अध्यक्ष म्हणतो.

सगळे बसतांत.

“तुम्हांला तिकडे,” माइक्रोमैजिशियन बिल्देर्लिंग कपितोनवला म्हणतो. “तिथे कार्यकारिणीचे सदस्य आहेत.”

“तो कोष्ठकांच्या बाहेर आहे,” त्याचा शेजारी, हेरा-फेरीवाला इवानेन्का मधेंच टपकतो. “जर हे खरं नसेल, तर माफ करा,” तो कपितोनवला म्हणतो.

कुठेतरी बसले.

अध्यक्ष उठला.


21.06

“महाशय. सहकारीगण. मित्रांनो. माणूस बरंच काही ठरवतो, पण होतं तेच, जे देवाला मंजूर आहे. काही वेळा पूर्वी मी विचार करंत होतो, की काहीतरी बोलेन, अजूनही बोलेन, दुस-याच कशाबद्दल, ना की त्याबद्दल. मी विचार केला होता, की आपल्या, कदाचित अत्यंत लहान भासणा-या, पण, खरं म्हणजे, आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या, विजयाबद्दल, आणि स्वतःवर मिळवलेल्या विजयाबद्दल बोलेन, त्याबद्दल की शत्रूंनी कितीही अडथळे आणले, तरी आपल्या ‘गिल्ड’ची कॉन्फ़्रेन्स सम्पन्न झाली, आणि त्याबद्दल, की हे अशक्यंच होतं, की तिची मीटिंग होणार नाही, तिची स्थापना होणार नाही, तिची रचना होणार नाही...ती अस्तित्वात न यावी!...कारण की हीच इच्छा होती, आपली स्वतःची. मी विचार केला होता, की त्याबद्दल बोलेन, की आपला प्रमुख शत्रू आपल्यांतच आहे आणि त्याचं नाव आहे – आपल्याच शक्तीवर आणि आपल्याच शक्यतेवर अविश्वास. गिल्डच्या स्थापनेच्या मुहूर्तावर तुमचं अभिनंदन करताना, मी विचार केला होता, की ह्याबद्दलसुद्धां बोलेन, की आज, जेव्हां शेवटी आपल्याला संगठित होण्याची संधी मिळाली आहे, आपल्या विचारधारा आणि मान्यता भिन्न असूनही, कोणालाही, कोणालाही आपल्या एकटेपणाला, निराधारपणाला घाबरण्याची गरंज नाहीये, कारण की आता आपण सगळे एकत्र आहोंत, जसे पूर्वी कधीही नव्हतो, - बस, ह्याबद्दलंच मी बोलणार होतो, आणि, कदाचित, थोड्या वेळाने, वेगळ्या शब्दांत, आणखी काहीपण म्हणेन. पण सध्यां, मला हे म्हणायला नको. वलेन्तीन ल्वोविच ‘तलाव’ आज स्वर्गवासी झालेत, जसं तुम्हांला माहीत आहे, आणि, त्याने स्वतःने नाही, तर त्याच्यासाठी लोकांनी म्हटलं, शेवटच्या क्षणापर्यंत तो आपलं कर्तव्य करंत होता, चिर स्मृति.

जोराने खुर्च्या सरकवंत सगळे लोक उठले, आणि सगळ्यांबरोबर – कपितोनवसुद्धां. पितांत आणि, एकही शब्द न बोलता, डोळे झुकवून, टेबलाच्या चारीकडे आपापल्या जागेवर बसतात. सैलेडकडे, खाण्या-पिण्याच्या व्यंजनांकडे हात वाढले. कपितोनव अर्धा मिनिट रिकाम्या प्लेटकडे बघंत राहिला, मग, मांसाच्या थण्डगार स्लाइसेसच्या प्लेटकडे नजर टाकंत, जणु तिलाच काही सांगायचंय, शांतता भंग करतो: “त्याच्या आत्म्याला शांति मिळो. वेळ झाली. गुड बाय.”

तो हॉलमधून बाहेर निघतो.

जिन्यावर नीनेल त्याला पकडते.

“तुम्हांला असं वाटलं कां, की मी तुम्हांला एकटं जाऊं देईन?”

“माफ करा,” कपितोनव म्हणतो, “मला टॉयलेटला जायचंय.”


21.27


त्याला टॉयलेटला नाही जायचंय, पण जेव्हां आत घुसलाच, तर तो यूरिनल्सकडे जातो.

आता स्वतःला परिस्थितीजन्य प्रक्रियेच्या स्वाधीन करायचंय.

तो करतो.

यूरिनल्सच्यावर टांगलेल्या दोन तक्त्यांकडे न बघणं अशक्य आहे. एकावर जाहिरात आहे आरशांची, दुसरीवर प्रोस्टेटाइटिससाठी औषधाचं नाव लिहिलंय,

नेहमीसारखा सिंककडे जातो, पाणी चालू करतो आणि आरशांत स्वतःला बघतो.

गोंधळतो.

त्याच्याकडे बघतोय – नाही, हा परका चेहरा नाहीये.

असं नाहीये. तर असंच आहे. – जर ह्या गोंधळाकडे त्याला बनवणा-या तिन्हीं घटकांना जोडून बघता आलं असतं, तर ते काळाच्या क्रमबद्ध अंतराळाच्या अनुरूपंच प्रतीत झाले असते, - पहिल्या क्षणाला तो स्वतःला बघतो. दुस-यांत, हृदयाच्या धडधडीच्या समानुपातांत, - समजतोय, की तो – तो नाहीये. तिस-या क्षणांत – की तो (कारण की, निःसंदेह, तोच आहे), पण ह्या क्षणी त्याला ते कळलंय, ज्याने त्याला गोंधळांत टाकलं होतं.

चष्मा!

त्याने कधीही चष्मा लावला नव्हता.

त्याच्या चेह-यावर चष्मा होता, आणि चष्मा बिनकाचांचा.

तो आपल्या नाकावरून त्याला खेचतो आणि फरशीवर आपटतो.

चष्मा उसळतो आणि निळ्या टाईल्सवरून घसरंत – थांबतो आणि रिकाम्या दृष्टीने त्याच्या गुडघ्यांकडे बघूं लागतो.

तो पायांनी तिला – बिनकाचांच्या फ्रेमला – चिरडतो. आणि जेव्हां तो नाकाच्या दांडीवर तुटतो, तेव्हां पायाच्या धक्क्याने पहिल्या अर्ध्या भागाला क्यूबिकलमधे ढकलतो – आणि दृष्टीआड करतो आणि दुस-याला – दुस-या क्यूबिकलमधे.

अचानक असा भास होतो, की क्यूबिकल्समधे कोणीतरी आहे आणि त्याच्यावर नजर ठेवून आहे.

फक्त उपस्थितंच नाहीये, तर त्याच्यावर नजरसुद्धां ठेवून आहे.

सगळे मिळून चार क्यूबिकल्स आहेत, आणि तो प्रत्येकाला उघडतो.

कोणी नाहीये. कोणीच नाही.

कपितोनवला मूखिनची भीति आठवते (पण काय, ती भीति होती?). म्हणजे, तेव्हां, जेव्हां त्याला पहिल्यांदा लक्षांत आलं की त्याच्या प्रत्येक हालचालीवर निरंतर तीक्ष्ण नजर ठेवली जात आहे.

तो चेहरा धुतो.

आणि बाहेर निघतो.

“मी काय चष्मा लावला होता? माझ्या चेह-यावर चष्मा होता कां?”

“माय गॉड, काय झालं?”

“मी विचारतोय, माझ्या चेह-यावर चष्मा होता कां?”

“बिल्कुल होता – चष्मा.”

“बिन काचांचा?”

“बिन काचांचा कां?”

“कारण की माझी नजर चांगली आहे. मी चष्मा लावतंच नाही!”

“तू दिवसभर चष्म्यांत होता.”

“दिवसभर चष्म्यांत? तू मला सकाळी बघितलं होतं?”

“मी तुला लंचच्या आधी पाहिलं होतं. तू चष्मा लावला होता. आणि त्यानंतर, जेव्हां तुझ्या हनुवटीची जखम पुसंत होते. माझ्या मनांत विचारसुद्धां आला: चेह-याला स्पर्श करंत पार्टीशन पडलं होतं, पण चष्म्याला काहीही झालं नाही. घाबरूं नकोस, तू चांगलाच दिसतो – चष्म्यांतपण आणि बिनचष्म्याचापण. ऐक, तुझे ओठ निर्जीव वाटतांत आहेत...हे सगळं थांबव, शुद्धीवर ये, कपितोनव.”


भाषांतर: आ. चारुमति रामदास 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract