STORYMIRROR

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

2  

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

धनु कोष्ठक - २७

धनु कोष्ठक - २७

3 mins
47

लेखक: सिर्गइ नोसव ; भाषांतर: आ, चारुमति रामदास 


17.30


“हो, मला नेहमी मळमळ होत असते. आधी असं नव्हतं. पण, काळंच असा आहे, ह्यांत माझा काही दोष आहे कां? हे भयंकर आहे. काळ खराब झालाय. हा काळ नाहीये. सैतानंच जाणे हे काय आहे.”


17.35


“झोपूं नका.”

“तुम्हांला असं वाटतंय का, की मी झोपलोय?’

“मी असं तर नाही म्हटलं.”

“तुम्हीं असंच म्हटलं: झोपूं नका.”

“कपितोनव, तुमच्या लक्षांत आलं का, की माझ्या उपस्थितीत तुमचा वेळ आणखी वेगळ्या प्रकाराने चाललाय?”


17.39


“तुला तर मारून टाकणंपण कमी आहे.” कुणी तरी म्हणतंय.


17.40


कपितोनव अंदाज़ लावतो की हे काळ-भक्षकासाठी म्हटलंय आणि म्हणणारा नेक्रोमैन्सर आहे.


17.45


काल-भक्षक गायब झाला, आणि महाशय नेक्रोमैन्सर कपितोनवच्या बाजूला बसला.


17.47


काळ पुढे-पुढे चालला आहे.

ह्या दृष्टीने सगळं ठीक आहे.

नीनेल पुन्हां आली.

“तुम्हीं इथे काय करतांय?” ती नेक्रोमैन्सरला विचारते.


17.54

महाशय नेक्रोमैन्सर:

“मी फक्त दिवंगत आणि मृतकांबरोबरंच काम करतो, आणि तेसुद्धां रशियन बोलणा-या, पण प्रेतांबरोबर कधीच नाही.”

“ही काय बडबड आहे?” नीनेल वैतागते. “कसले रशियन बोलणारे? प्रेत, दिवंगत आणि मृतकाहून प्रेत कसं वेगळं आहे?”

“फक्त रशियन भाषेंतच दिवंगत आणि मृतक – सजीव वस्तू आहेत, पण प्रेत – निर्जीव वस्तू आहे.”

“काय बकवास आहे!”

“बिल्कुल बकवास नाहीये. पुल्लिंगी शब्द, ज्यांच्या शेवटी स्वर असतात, कर्मकारकांत शेवटी ‘आ’ लावतात (हा रशियन व्याकरणाचा नियम आहे – अनु.), जर ते सजीव असले तर; आणि त्याच कर्मकारकांत शेवटी काहीच नाही लावंत, जर ते निर्जीव असले तर. कोणाला बघतो? जसं बैल, जंगली उंदीर, पायलट. सजीव आहेत. कोणाला बघतो? बैला-ला, उंदरा-ला, पायलेटा-ला, आणि हे बघा : खांब, मशरूम, छिद्रक - निर्जीव आहेत. काय बघतो? खांब, मशरूम, छिद्रक. शेवटी काही व्यंजन नाहीये.”

“तुम्हांला दिसंत नाहीये का, की कपितोनवची तब्येत तुमच्याशिवायसुद्धां खराब आहे? हे सगळं कशासाठी?”

“म्हणूनंच. काय बघतो? प्रेत बघतो. पण हे नाही म्हणू शकंत, की ‘प्रेता-ला’ बघतो. म्हणजे, निर्जीव. दुसरीकडे: कोणाला बघतो? मृतका-ला, दिवंगता-ला बघतो. पण असं नाही म्हणू शकंत की ‘मृतक बघतो’, ‘दिवंगत बघतो’. म्हणजे सजीव वस्तू आहेत. कळतंय ना तुम्हांला? प्रेत – जसं टेबल आणि वीट, निर्जीव वस्तू आहे. पण दिवंगत आणि मृतक – जसं बढई आणि गरुड, सजीव वस्तू आहेत. दिवंगत आणि मृतकाबरोबर तरीही काम करता येतं.”

“दिवंगत आणि मृतकांत काय फरक आहे?”

“सूक्ष्म अंतर आहे. पण जास्त महत्वपूर्ण ते आहे, जे ह्यांना एका श्रेणीत ठेवतं. सजीवता. हो, ते सगळे निष्प्राण आहेत – प्रेतपण, दिवंगतपण, मृतकपण; तरीही दिवंगत आणि मृतक सजीव आहेत. प्रेत – निर्जीव आहे. आणि ही मुख्य गोष्ट आहे. निर्जीवाला जिवन्त करता येत नाही, कारण की ती अपरिहार्यपणे निर्जीव आहे. आणि निष्प्राणाला, जर तो सजीव आहे, तर जिवन्त करता येतं. प्रेताला – नाही, आणि दिवंगत आणि मृतकाला – शक्य आहे.”

“बकवास.”

“लक्ष द्या, की हे रशियन भाषेच्या प्रकृतिला अनुसरून आहे, म्हणूनंच मी विशेषकरून फक्त रशियन-भाषिकांसोबतंच काम करतो...फक्त ह्याचसाठी, राष्ट्रभक्तिच्या भावनेने नाही, कोणीही असा विचार करूं शकतो, आणि महत्वपूर्ण गोष्ट: पुनर्जीवित, म्हणजे जे आता मृतक किंवा दिवंगत नाहीत, त्यांना रशियन भाषा विस्मृतीत ढकलते आणि तो दुस-या एखाद्या भाषेंत चालला जातो. जर तो रशियन-भाषिकंच राहिला, आणि जर तो पुन्हां कधी मृतक किंवा दिवंगत झाला तर त्याला पुन्हां जिवन्त करणं शक्य आहे,, आणि असं अगणित वेळा होऊं शकतं. पण, दुर्दैवाने, असं शक्य नाहीये. दिवंगत आणि मृतकाला फक्त एकदांच जिवन्त करणं शक्य आहे, आणि मग तो पुन्हां कधीही रशियन नाही बोलणार.” 

“बकवास, बकवास, बकवास.”

“तर, मूखिनचा प्रॉब्लेम मी जवळ-जवळ सोडवला आहे.”

“मूखिन – तो कोण आहे?” नीनेल सतर्क झाली.

“हा तो आहे, ज्याच्यापुढे आता काहीही प्रॉब्लेम नाहीये,” कपितोनव म्हणतो, जो आतापर्यंत संभाषणांत भाग घेत नव्हता.

“वाद नाही घालणार,” महाशय नेक्रोमैन्सर म्हणतो. “पण ‘तलाव’चा प्रॉब्लेमपण अशाच प्रकारे सोडवला जात आहे.”

“तुम्हीं खरोखरंच वाद घालतांय,” कपितोनव तोंड फिरवतो.

“मी आणखी काय म्हणतेय!” नीनेल उद्गारली.

“नाही, मित्रांनो, बकवास तुम्ही लोक करताय, मी नाही, आणि तुम्ही, कपितोनव, दुस-यांपेक्षा जास्त.”


18.09


डोळे आपणहून बंद होताहेत, आणि नजरेसमोर येतो आहे मूखिन, जसा की, कदाचित, अठरा मजल्याच्या बिल्डिंगच्या टैरेसवर सापडला होता. हिंसक मृत्यचं कोणतंच लक्षण नाहीये. त्याच्या अंगावर नवीन सूट आहे, ज्याच्या अस्तित्वाबद्दल मरीनाला पत्ताचं नव्हता. कपितोनवला दिसतंय, की मूखिन पाठीवर पडलाय आणि त्याचे हात पसरलेले आहेत.

‘बोलेरो’ गरजंत होता.

“पापा, नमस्ते. सगळं ठीक आहे नं? व्यवस्थित एडजस्ट झाले कां?”

“हो, सगळं ठीक आहे. काही सांगायचंय कां?”

“पहिली गोष्ट, तुम्हीं किल्ल्या विसरले.”

“आशा करतो, की मला कोणीतरी फ्लैटमधे येऊं देईल...”

“अफ़कोर्स, कोणीतरी नक्कीच. पण तुम्हीं किल्ल्या बाहेरून की-होलमधे सोडल्यांत. मला आंतून दारंच उघडतां आलं नाही. शेजा-यांच्या चांगुलपणामुळे...”

त्याला मोठा धक्काच बसला. तो म्हणतो:

“चूक झाली.”

फोन ‘कट’ झाला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract