STORYMIRROR

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

2  

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

धनु कोष्ठक - ३०

धनु कोष्ठक - ३०

4 mins
65

लेखक: सिर्गेइ नोसव : भाषांतर: आ. चारुमति रामदास 

20.07


कपितोनव बसला नाहीये, तर उठून उभा राहिला आहे. त्याला, किंवा आणखी कुणालाही नेक्रोमैन्सरकडून कोणत्याही चांगल्या गोष्टीची अपेक्षा नव्हती. पण, ते जे नेक्रोमैन्सरने केलं, त्याने कोणालाही धक्काच बसला असता.

त्याने कपितोनवच्या खांद्याचा मुका घेतला, वळला आणि शीघ्रतेने हॉलच्या बाहेर निघून गेला.

कपितोनवचा जणु जीव गुदमरू लागला, पण अध्यक्ष आणि नीनेलने असं दाखवलं, की नेक्रोमैन्सरच्या वागण्याकडे त्यांचं लक्षंच नव्हतं.

“तुम्हीं फार धीराने वागलांत,” अजूनपर्यंत दाराकडे बघंत नीनेलने त्याची तारीफ करंत म्हटलं, “ठाम राहिले आणि ठाम राहा. मी तुमची प्रशंसक आहे.”

ती त्याचा हात धरते.

“बैन्क्वेटला (भोज) जायची वेळ झाली आहे.”

“मी? बैन्क्वेटला?” कपितोनवच्या तोंडातून उद्गार निघतो.

“नाही, हे बैन्क्वेट नसणार,” नेक्रोमैन्सरच्या अनुपस्थितीने प्रसन्न होऊन अध्यक्ष म्हणतो. “हे आणखी काही असेल. मेमोरियल-ईवनिंग असेल. फ्यूनरल-फीस्ट.” 

“चला, कपितोनव.”

“प्लीज़, मला सोडून द्या.” तो तिच्या हातांतून हात परंत खेचतो. “प्रेत अजून उचललेलं नाहीये, आणि तुम्हीं लोक बैन्क्वेटला जाण्यासाठी तयार झालेत.”

“जर ‘तलाव’ जिवन्त असता, तर तोसुद्धां आपल्या बरोबर आला असता,” अध्यक्ष म्हणतो. “तर, अशा प्रकारे आपण त्याला श्रद्धांजलि वाहंत आहो – सगळे मिळून, माणसांसारखे. सम्पूर्ण इन्डस्ट्री. प्रेत...प्रेतांत काय आहे? प्रेत आपल्या शिवाय घेऊन जातील.”

“तुम्हीं माझ्याशी असं कां वागताय?” नीनेलला कळंत नाही. “तुम्हीं बिल्कुल असे नाहीये, तुम्हीं फार सभ्य, फार चांगले आहांत.” 

“तुम्हांला खरंच असं वाटतंय का, की मी मेमोरियल ईवनिंगमधे येईन?” कपितोनव त्यांच्यापासून दूर सरकतो.

“म्हणतांय काय?” अध्यक्ष त्याला थांबवतो, “उलंट तुमच्या शिवाय तर ह्या मेमोरियल-ईवनिंगची कल्पनाच नाही करूं शकंत! कुणा दुस-याशिवाय तर समजूं शकतो, पण तुमच्या शिवाय नाही. शेवटी, तुम्हीं इथे ‘तलाव’मुळेच आहांत ना? त्यानेचं तुम्हांला नव्हतं का शोधलं? जायला हवं. जर नाही जाणार, तर चांगलं नाही दिसणार, चूकंच होईल. लोकांना वाटेल की तुम्हीं गुन्ह्याच्या ओझ्याखाली वैतागले आहांत, म्हणजे, तुम्हीं गुन्हेगार आहांत. किंवा, ह्याच्यापेक्षांही वाईट असं वाटेल, की तुम्हीं ह्या फुकटच्या गोंधळामुळे रुसले आहांत, आणि खरंच हा फुकटचांच आहे!...पण तुम्हीं तर ह्या गोंधळापासून वर आहांत? आमच्या षडयंत्रांहून वर. आणि महत्वाचा सल्ला, स्वतःला मारेकरी नका समजू. तुम्हीं मारेकरी नाहीं, नाहीये ना?”

“ऐका, मी काहीही नव्हतं केलं. मला माहीत नव्हतं, की त्याने 99 ही संख्या धरली आहे. आणि जर माहीत असतं तर? त्यांत असं काय आहे? नाही. मी तुम्हांला सांगेन. मला आठवतंय. कुणीही आजपर्यंत...ऐकतांय न?...आज पर्यंत कुणीही, कधीही 99ची संख्या मनांत धरली नव्हती. आश्चर्याची गोष्ट आहे. पण आहे असंच!”

“मीपण त्याबद्दलंच म्हणतोय, थोडाच वेळ थांबा, आणि मग निघून या. बस, फक्त गेलं आणि आलंच पाहिजे. वरून हे आयोजन तुमच्या हॉटेलमधेचतर होतंय. तुम्हीं तसेही तिथेच चाललांय ना? फायरप्लेस असलेल्या हॉलमधे पोहोचा, काही वेळ थांबा आणि निघून जा.”

“पोहोचू आणि निघून येऊं, कपितोनव,” नीनेल म्हणते. “पोहोचूं आणि निघून येऊं.”


20.21


“कपितिनव, मूर्खपणा करूं नकोस,” क्लोक-रूममधे त्याला म्हणते.

त्याच्या आधीच कोटाची बटन्स बंद केली, हातमोजे चढवले, आणि तो आठवूंच नाही शकला, की दुसरा हातमोजा कुठे आहे: दोन्हीं डाव्या खिशांतंच होते.

‘सी-9’पासून हॉटेल पर्यंत, कपितोनव अजून विसरला नव्हता, खूपंच जवळ आहे. अध्यक्षतर बाहेर निघाल्याबरोबर सरळ धावला, ज्याने की, जसं त्याने सांगितलं होतं, परिस्थितीवर नजर ठेवता येईल, - सगळे लोक रेस्टॉरेन्टमधे जमलेयंत, फक्त ह्या दोघांना सोडून: कपितोनवला तिथे जायचं नाहीये आणि तिथे तो ह्यासाठी खेचला जातोय, कारण की नीनेल त्याला खेचून नेत आहे.

त्याचा हात धरून आत्मविश्वासाने नेतेय.

कपितोनवच्या डोक्यांत शेवटचा श्वास सोडंत असलेला फ़ेरो ख़ुफू29 झळकला.

पीटरबुर्गचा हिवाळा आइसिकल्स आणि कडक जमलेल्या बर्फामुळे मस्त वाटतो. ह्या रस्त्यावर कडक, जमलेला बर्फ आइसिकल्सपेक्षां जास्त भयानक आहे. 

जराही वाकडा-तिकडा पाय पडला – आणि एकतर मान मोडेल, किंवा कम्बरेचं हाड मोडेल.

“बायका, कपितोनव, फार मोठ्या चेटकिणी असतांत,” नीनेल म्हणते. “स्टेजवर नाही, तिथेतर पुरुषांचं राज्य चालतं, तर जीवनांत, दैनंदिन जीवनांत...हो आणि स्वप्नांतसुद्धां!...जीवन आम्हालां भाग पाडते लबाडी करायला, संख्या बनवण्याला, साध्या-सरळ लोकांना रहस्यमय बनवायला. आता वयाचंच घ्या नं. तुम्हांला काय वाटतं, माझं वय किती असेल?”

“मी ह्याबद्दल विचार नाही करंत आहे,” चालताना – पुढे जाताना (कधी इकडे, कधी तिकडे पाई चालणारे पडतांत आहे) कपितोनव उत्तर देतो.

“कां नाहीं विचार करंत? तुम्हीं विचार करा! विचार करायला त्रास होतोय कां? चला, विचार करा, विचार करा, माझं वय किती आहे?”

कपितोनवच्या डोक्यांत, अचानक, आपणहूनंच, डोक्याच्या मालकाच्या इच्छेवर अवलम्बून न राहून, 36चा अंक येतो. पण जिथे स्वतः कपितोनवचा प्रश्न आहे, तो चूपंच राहतो.

“तुम्हीं विचार केला : 36! फैन्टास्टिक, कपितोनव, मी तुमच्या प्रेमांत पडायला तयार आहे, पण, नाही, घाबरूं नका, कोणत्याही परिस्थितीत मी असं करणार नाही!”

“तुम्हांला कसं माहीत, की मी काय विचार केला होता?”

“मी तुमचा विचार ओळखला! विश्वास करा, हे कठिण नाहीये! तुम्हांला माझा जादू आवडला कां? जर तुमची इच्छा असेल, तर तुम्हांला त्याचं रहस्य सांगून टाकू?”

कपितोनव उत्तर नाही देत.

“कपितोनव, हे अगदी एलिमेन्ट्री आहे! मी अगदी आपल्या वयाचीच दिसते.”

आणि तिला जणु संक्रामक हास्याने पछाडलं, पण इतकं संक्रामक सुद्धां नाही, की कपितोनवला संक्रमित करेल. तो चूपंच आहे. तसेच चालतात.

“कपितोनव, तुम्हांला काय झालंय? शुद्धीवर या! मी नीनेल पिरागवा आहे. आठवलं? मी ट्रिक्स-डाइरेक्टर आहे. आणि तुम्हीं खूब वीर आहांत. तुम्हीं अत्यंत संयमाने वागलांत. पण, जर तुम्हीं ट्रिकला नकार दिला, तर मी तुमच्यासाठी ट्रिकचं आयोजन कसं करेन?”

“नीनेल,” कपितोनव म्हणतो, “पण हे खरंच असंच आहे: तो पहिला होता, ज्याने 99चा अंक मनांत धरला होता. आशा करतो, की तो शेवटचापण असेल.”

“आह!” ती घसरते, पण त्याच्या आधाराने, आपल्या जागेवर जमून राहते. 

“बघा,” कपितोनव म्हणतो. “तिकडे नेक्रोमैन्सर जातो आहे. तो जवळ-जवळ पडलांच होता.”

“म्हणजे, असं करायला हवं. चालंत राहा, चालंत राहा. जर पाय नेताहेत, तर ह्याचा अर्थ असा आहे, की चालायला पाहिजे.”

“पाय पण नेत नाहीयेत, आणि डोक्याची पण इच्छा नाहीये!” कपितोनव तक्रारीच्या सुरांत म्हणतो.

“आणि, काय त्याची इच्छा होती? त्याला मरायचं होतं कां? तुम्हीं त्याला विचारलं नाही?”


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Abstract