Charumati Ramdas

Abstract Thriller

3  

Charumati Ramdas

Abstract Thriller

धनु कोष्ठक - ३४

धनु कोष्ठक - ३४

8 mins
224


लेखक: सिर्गेई नोसव : भाषांतर: आ. चारुमति रामदास 

10.00


ब्रेकफास्ट झोपेमुळे गेला. बाकीच्या गोष्टीपण त्याने झोपेमुळे गमावल्या असत्या.


11.09


कागदावर नजर टाकून कपितोनव खिडकीकडे येतो:

“मला इन्वेस्टिगेटर चोर्नवला भेटायचंय.”

“काय सम्मनवर?”

“नाही, इन्वेस्टिगेशन आहे.”

कपितोनवचं पासपोर्ट बघितल्यावर ड्यूटी-ऑफिसर रिसीवर उचलतो, थोडा वेळ कुणाशीतरी बोलतो.


“रूम नंबर 11.”

इन्वेस्टिगेटर चोर्नोव, मेयर ऑफ जस्टिस, ऑफिसच्या टेबलाशी बसला आहे, त्याच्यासमोर कम्प्यूटर ठेवलेला आहे. इन्वेस्टिगेटरच्या पाठीमागे, खोलीच्या कोप-यांत घाणेरड्या-हिरव्या रंगाची भली मोट्ठी सेफ ठेवलेली आहे, तिच्यावर माइक्रोवेव आणि इलेक्ट्रिक-केटल आहे. इन्वेस्टिगेटरचा चेहरा हायपर टेंशनच्या पेशन्टसारखा सुजलेला आहे.

“बसा, येव्गेनी गेनाद्येविच. हे तर चांगलं झालं की तुम्हीं पळून नाही गेलेत. पण उशीर करणं – चांगलं नाहीये.”

कपितोनव रिकामी खुर्ची टेबलापासून दूर सरकवून तिच्यावर बसून जातो. खोलीत आणखी एक खुर्ची आहे, पण तिच्यावर बैग ठेवली आहे.

“तुम्हीं तर उद्या जाणार आहे नं, टिकिट विकंत घेतलंय कां?”

“उद्या कां? आजंच.”

“आज,” इन्वेस्टिगेटरने निःसंकोच म्हटलं. “हे काही कळंत नाहीये...”

कपितोनव चूप राहतो. हे सांगणं ठीक नाहीये, की फ्लाइट अडीच तासानी आहे, खतरनाक झालं असतं, त्याला धरून बंदसुद्धा करूं शकंत होते.

“आधी मला ह्या गोष्टीचं उत्तर द्या. काय ‘तलाव’शी तुमचे संबंध अप्रिय होते?”

“नाही, आमचे संबंध अप्रिय नव्हते.”

“तर मग सांगा, तुम्हां दोघांमधे तिथे काय चाललं होतं. आणि हेपण, थोडक्यांत, की तुम्हीं दोघंच तिथे, स्टोर-रूममधे, कसे पोहोचले, कोणी प्रत्यक्षदर्शी असल्याशिवाय.”

“माहीत आहे, मी दोन अंकांच्या संख्या ओळखतो.”

“हो, मला त्याबद्दल सांगितलंय.”

“कॉन्फ्रेन्स होती. इंटरवल होता. इंटरवल संपंत आला होता, सेशन सुरू व्हायला फक्त पाच मिनिट शिल्लक होते. ‘तलाव’ माझ्याकडे आला आणि म्हणाला, की अजून बरांच वेळ आहे दाखवण्यासाठी...म्हणजे, ते, ज्याचं मी प्रॉमिस केलं होतं...ह्याआधी...स्क्रीन ठेवून. आणि त्या खोलींत होतं एक पार्टीशन, एक बुलेटिन-बोर्ड, ज्याच्यावर नवीन वर्षाची जाहिरात लटकंत होती...”

“नवीन वर्षाची?”

“हो, जुनी. आणि हे पार्टीशन, ‘तलाव’च्या मते, आमच्यासाठी स्क्रीनचं काम करूं शकंत होतं. ‘तलाव’ला असं वाटायचं, की त्याच्या चेह-यावर, जणु काही, लिहिलेलं असतं, की तो काय विचार करतो आहे...आणि मला हे वाचतां येतं, की त्याने कोणची संख्या मनांत धरलीये. म्हणून स्क्रीनची गरंज होती. म्हणजे, त्या परिस्थितीत, ते पार्टीशन...आम्हीं त्याला सरकवून खोलीच्या मधोमध आणलं. ‘तलाव’ त्याच्या मागे गेला, मी ह्या बाजूला राहिलो. मी त्याला दोन अंकांची संख्या मनांत धरायला सांगितलं, नेहमीसारखीच. त्याने धरली 21. मग त्याने आणखी एक संख्या धरली, आणि मी तीपण ओळखली, आता लक्षांत नाहीये, की ती कोणची होती.”

“आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्हांला लक्षांत नाहीये.”

“पण मी कशाला लक्षांत ठेवूं? 21सुद्धां मला अश्यासाठी लक्षांत राहिली, की ती ‘ब्लैकजैक’32 आहे. आम्हीं त्याबद्दल वाद सुद्धां केला, तो पत्त्यांची जादू करायचा, आणि त्याच्यासाठी ह्या संख्येचं महत्व होतं. पण, त्याला असं वाटंत होतं की तो कोणत्या ना कोणत्या प्रकाराने आपलं गुपित उघड करतो आहे. काही संदर्भांनी, जसं नजरेने, आवाजाने...तिस-यांदा आम्हीं हे ठरवलं, की तो पार्टीशनच्या मागे गप्प राहील, आणि मी बोलंत राहीन, जसं नेहमी करतो. मी त्याला बघंत नाहीये, किंवा ऐकंत नाहीये, असा प्रयोग, समजतां आहांत नं? आणि त्याने धरली : 99.”

“इथे विस्ताराने सांगा,”

“मी पार्टीशनच्या मागून त्याला एखादी संख्या मनांत धरायला सांगतो, दोन अंकांची. तो गप्प राहातो. मग मी त्यांत पाच जोडायला सांगतो. तो गप्पंच आहे, मी थोडा वेळ वाट पाहातो आणि ह्या बेरिजेतून तीन वजा करायला सांगतो. मग मी चूप राहातो आणि म्हणतो : तुम्हीं धरली होती 99. आणि तेवढ्यांत फरशीवर धम्म् असा आवाज ऐकतो.”

“समजलं. एक गोष्ट लक्षांत नाही आली. तुम्हांला कसं माहीत की त्याने 99च धरली होती?”

“माहितीये, बस, येवढंच.”

“म्हणजे, तुम्हांला हे म्हणायचं आहे की त्याला तुमच्या दोन 9ने मारून टाकलं?”

“पहिली गोष्ट, माझे नाही, तर त्याचे, आणि दुसरं, अशी कोणतीही गोष्ट मला म्हणायची नाहीये. तुम्हीं माझ्यावर ते विचार थोपतांय, जे माझे नाहीयेत.”

“ठीक आहे. आणि तुम्हीं कां त्याला आधी पाच जोडायचा आणि मग तीन वजा करायचा हुकूम दिला?”

“हुकूम नाही दिला, तर विनंती केली.”

“हो, कां?”

“मी ह्याचं उत्तर नाही देऊं शकंत.”

“कां नाही देऊं शकंत?”

“ऊफ़, चला, असंच समजा. हा माझा प्रोग्राम आहे. फक्त माझा, लेखकाचा. तो कॉपीराइटच्या नियमाने सुरक्षित आहे. प्लीज़, माझ्यावर हे समजावण्यासाठी दडपण नका आणूं की कां आणि किती जोडायला सांगतो, आणि कां आणि किती वजा करायला सांगतो.”

“तुमचं सीक्रेट आहे.”

“जवळ-जवळ असंच समजा.”

“मलापण एक जादू येते. बघा.”

मेयर पेन्सिल उचलतो आणि दोन्हीं तळहातांना एक एकावर एक ठेवून तिला अंगठ्यांनी दाबतो. नंतर तळहातांना अश्या प्रकारे फिरवतो की एक अंगठा दुस-याचा चक्कर लावतो – ह्या प्रक्रियेंत पेन्सिल 180 डिग्री फिरते आणि ती खालून दोन्हीं अंगठ्यांनी तळहातांच्या मधे दबलेली भासते – टेबलाच्या समांतर पातळीवर आणि कपितोनवकडे ताणलेली.

“तुम्हीं करा.”

कपितोनव इन्वेस्टिगेटरच्या हातांतून पेन्सिल घेतो आणि तीच ट्रिक करूं नाही शकंत. त्याची मनगट वेडे-वाकडे फिरतात.

“ह्याच कारण फक्त हे, की तुमच्या हातांची मूवमेन्ट कोण्या दुस-या तळावर होते आहे,” मेयर आपला आनन्द लपवूं शकत नाही. “तुमची गतिविधि डावीकडे होते, तर माझी – उजवीकडे. हो ना?”

कपितोनवने चुपचाप पेन्सिल टेबलवर ठेवून दिली.

“बघा, तुम्हांला विश्वास नव्हता की आपल्या हातांची गतिविधि वेगवेगळ्या स्तरांवर होत असते, तर मी कां विश्वास करू, की त्याने 99हीच संख्या मनांत धरली होती.”

“त्याने काय फरक पडतो, की त्याने कोणची संख्या धरली होती. भली ही 27 कां नसो.”

“आता तुम्हीं विषयापासून दूर जात आहांत.”

कपितोनव गप्प राहतो, पण इन्वेस्टिगेटरला एखाद्या जोरदार प्रतिक्रियेची अपेक्षा होती.

“दाखवा, प्लीज़.”

“काय दाखवूं?”

“तुमची ट्रिक. तुम्हीं आणखी काय दाखवूं शकता?”

“मी वचन दिलंय, की आता कधीही ती दाखवणार नाही.”

“तुम्हीं मला कोणतंही वचन नाही दिलं. ह्याला इन्वेस्टिगेटिंग एक्सपेरिमेन्ट समजा.”

“मी दाखवण्यासाठी बाध्य आहे कां?”

“ओह, अचानक हे ‘बाध्य’ कशाला? असं केलं तर आपल्या दोघांसाठी जास्त चांगलं होईल. तुमच्यासाठी – विशेषकरून.”

“प्रामाणिकपणे सांगायचं, तर इच्छा नाहीये.”

“समजायचा प्रयत्न करा. ‘इच्छा नाहीये’ला सोडा. आपण काही मुलांचे खेळ तर नाही खेळंत आहोत.”

“कोणतीही संख्या मनांत धरा,” थकलेल्या आवाजांत कपितोनव म्हणतो, “दोन अंकांची.”

“आणि?”

“त्यांत सात जोडा.”

“पाच कां नाही?”

“कारण की सातंच जोडायचे आहेत.”

“जोडले.”

“दोन वजा करा.”

“समजूं या.”

“काय ‘समजूं या? तुम्हीं 99 ही संख्या धरली होती.”

“ह्यांत काय जादू आहे?”

“तुम्हीं 99 धरली होती,” कपितोनव पुन्हां म्हणाला.

“हे तर एक साळूसुद्धां समजूं शकतो. जे काही झालंय, त्यानंतर मी दुसरी कोणची संख्या मनांत धरली असती.”

“जे काही झालं, त्यानंतर तुम्हीं 99चा अंक मनांत धरला, ह्यांत माझा काही दोष नाहीये.”

“मी तुम्हांला दोषी म्हणंतसुद्धां नाहीये.”

हे शेवटचं वाक्य थोडं जास्त कठोरपणे म्हटलं होतं – त्याचा स्वर अर्थाशी विसंगत होता.

“आधी कुणीही 99चा अंक नव्हता धरला. तो पहिला होता.”

पण हे स्वीकारोक्तीसारखंच भासलं. कपितोनवला स्वतःच अश्या स्वराची अपेक्षा नव्हती.

“मी दुसरा आहे,” इन्वेस्टिगेटर म्हणतो. “तर एक लहानशी प्रॉब्लेम आहे. त्याने धरला 99 – आणि तो शवागारांत आहे, आणि मी धरला – 99 – आणि तुम्हीं बघतांय, की मी जिवन्त आहे, धडधाकट आहे, टेबलाशी बसलोय आणि ह्यापुढेही जगायची इच्छा आहे. हे तुम्हांला विचित्र नाही वाटंत?”

“तुम्हांला माझ्या तोंडून काय ऐकायचंय? तुम्हांला काय पाहिजे? तुम्हांला माझ्याकडून काय काढायचंय?”

“नाही, काहीही काढायचं नाहीये. फक्त, ह्याच गोष्टीवर जोर देणं, की त्याने 99च धरला होता – वेडेपणा होईल. तुम्हीं ह्याबद्दल फारंच विचार करतांय.”

“आशा करतो, की तपास पूर्ण झाला असेल. मृत्युच्या कारणाचा पत्ता लागला?”

“मृत्युच्या कारणाचं इथे काय काम आहे? त्याबद्दल तर तुमच्याशिवाय ही निर्णय घेऊं.”

इन्वेस्टिगेटर टेबलाचा खण बाहेर काढतो, तिथून हाइजिनिक नैपकिन्सचा एक पैक काढतो, एक नैपकिन काढून त्यांत नाक शिंकरतो, डस्ट-बिनमधे फेकतो.

“आयडिया असा आहे की तुमच्याकडून ग्यारंटी घ्यायची, की तुम्हीं शहर सोडून नाही जाणार. पण, तुम्हीं इथे, माझ्यासमोर, आलेच कशाला? जा आपल्या...माहीत नाही, कुठे. पण आधी लिहून – सगळं, जसं झालं होतं.”


कपितोनवसमोर कोरा कागद पडला आहे.

“थांबा. मला समजतंय, की तुम्हीं काय लिहिणार आहे. नंतर प्रॉब्लेम सोडवता येणार नाही. तुम्हीं लिहा – थोडक्यांत, ठळकपणे. बोलंत होतो. आणि अचानक त्याची तब्येत बिघडली, तो मेला.”

“बिना जादूचं?”

“अगदी बिना जादूचं,” इन्वेस्टिगेटर म्हणतो.

कपितोनव चार वाक्यांत घटनेचं स्पष्टीकरण देतो – थोडक्यांत, स्पष्टपणे.

“आणि हे कशाला? हे कोष्ठक?” – इन्वेस्टिगेटरने मजकुराच्या आधी आणि मग शेवटीही धनु-कोष्ठक पाहिले. सहीचं काय झालं? तुम्हीं काय नेहमी धनु-कोष्ठकांच्यामधे सही करता? कां?”

“चालतं,” कपितोनव म्हणतो.


13.45


आश्चर्याची गोष्ट ही नव्हती की तो विमानतळावर वेळेच्या आधी पोहोचला, आश्चर्याची गोष्ट ही होती की मेटल-डिटेक्टरच्या स्प्रिंगच्या पलिकडे जाणं शक्य होत नाहीये. त्याने मोबाइल फोन बाहेर काढून ठेवला आहे, आणि खिशांतून सगळी चिल्लरसुद्धां बाहेर काढली आहे, आणि बेल्टपण काढला आहे, पण ही मूर्ख स्प्रिंग वाजतंच आहे, वाजतंच आहे.

“कदाचित तुमच्या शरीरांत एखादा धातु फिक्स केलेला असेल?”


आणि इथे कपितोनव क्षणभरासाठी घाबरला – त्याला शंका वाटली की कुठे हे वेषांतर केलेले माइक्रोमैजिशियन्स त्याला फेस-, मेटल- वगैरे तपासांतून जायला सांगतील: आणि, खरंच, पोटांत वजनदार ‘नट’ शोधून काढतील, ज्याच्याबद्दल एक वाईट विचार त्याला त्रस्त करंत होता.


हातातल्या मेटल-डिटेक्टरमधून जाताना कपितोनवच्या शरीराच्या एकही भाग झणझण नाही करंत – जणु कपितोनवच्या आंत कोणचीतरी प्रतिक्रिया प्रारंभ झाली आहे, जी संदेहास्पद कारणांना निष्क्रिय करंत आहे.

पण सगळ्याच कारणांना नाही.

इन्ट्रोस्कोपतून जातांना पर्स उघडायला सांगण्यांत आलं. त्यांत लहानशी ब्रीफकेस कां ठेवली आहे? कारण, की पूर्णपणे आत आली, आणि कपितोनवने एक लगेज कमी करण्याचा निर्णय घेतला.

हे तर बरं झालं, की ब्रीफकेसमधे अशी काही वस्तू नाहीये – कैबेजचे कटलेट्ससुद्धां नाहीयेत.

कपितोनवला स्वतःलापण माहीत नाहीये, की ही ब्रीफकेस तो मॉस्कोला कां घेऊन जातो आहे. त्याला ह्या ब्रीफकेसची गरंज आहे कां? पण आता हिला विमानतळाच्या बिल्डिंगमधेपण तर नाही सोडता येत.

तो तिथून दूर नाही जाऊ शकला – विचित्रसा यूनिफॉर्म घातलेल्या गस्त घालंत असलेल्या दोघांनी त्याला पासपोर्ट दाखवायला सांगितलं. त्यापैकी एकाच्या हातांत साखळीने बांधलेला कुत्रा होता, जो काहीतरी करूं शकंत होता – कमीतकमी असंख्य पैसेंजर्सचं लक्ष आपल्याकडे नाही खेचलं, तरी पुष्कळ आहे.


“माझ्यांत काही विचित्र दिसतंय का?” कपितोनव स्वतःकडे लक्ष न देण्याचा, आणि आपणहून कुत्र्याचं लक्ष आकर्षित न करण्याच्या प्रयत्नांत विचारतो.

“तुम्हांला खात्री आहे कां, की हा पासपोर्ट तुमचांच आहे?”

“तिथे माझा फोटो आहे!”

“फक्त ह्याच कारणामुळे?”

हे तर बरं आहे, की कुत्रा त्याच्याकडे लक्ष नाही देत आहे.

“आणि सही!”

धारकाला पासपोर्ट परंत करतांत:

“हैप्पी जर्नी, येव्गेनी गेनादेविच.”

रजिस्ट्रेशन काही भानगड न होतां पूर्ण झालं. कॉफी पिण्याइतका वेळ आहे, पण एका फेस-टू-फेस मीटिंगने ह्यापासूनही परावृत्त केलं:

“वॉव! काय योग आहे?”

ज़िनाइदा आणि झेन्या, तिचा ‘डाउन’ मुलगा.

“तुमची मैथेमैटिक्सची कॉन्फ्रेन्स कशी झाली?” ज़िनाइदा उत्सुकता दाखवते.

“चांगली झाली. आणि तुम्हीं इथे काय करतांय?”

“हो, बघा, सगळी गडबड झाली, बहिणीला स्ट्रोक आला, लगेच वरोनेझची फ्लाइट पकडायची आहे. आणि तिथून घरी, जसं शक्य होईल तसं.”

“काय म्हणता! थांबा, तुमची बहीण तर पीटरबुर्गमधे आहे.”

“ही दुसरी आहे.”

“दिलगीर आहे,” कपितोनव म्हणतो. “असं वाटतं की तुम्हीं फक्त एकंच दिवस पीटरबुर्गमधे होत्या?”

“कआब्लिक, कआब्लिक!” त्याच्याच नावाचा येव्गेनी उद्गारतो.

कपितोनव त्याला विचारतो:

“कआब्लिक बघितलं?”

“तू कआब्लिक पाहिलं?” प्रश्न कपितोनवकडे वळतो.

“कसा नाही पाहणार,” कपितोनव म्हणतो.

आठवतंय.

“ही घे. आता ही तुझी झाली.”

छडी घेऊन, लहानगा झेन्या तिला असं झटकतो, जणु ती थर्मामीटर आहे, आणि काही स्वतःचंच, न कळण्यासारखं बडबडूं लागतो.

कपितोनव ज़िनाइदाला सांगतो:

“लिहिलं आहे, की जादूची आहे.”

“मला कळतंय, - ज़िनाइदा हरवल्यासारखी स्मित करते. “पण तुम्हीं ‘फक्त एक दिवस’ कां म्हटलं? आम्हीं तर इथे एका आठवड्यापेक्षां थोडं जास्तंच राहिलो.”

“मी तुमच्या बरोबर इथे परवांच नाही आलो कां – ह्या शनिवारी?”

“ह्या शनिवारी कसे?...ह्या शनिवारी नाही, तर त्या शनिवारी...तुम्हीं गम्मत करतांय कां?”

कपितोनव गंमत नाही करंत. जेव्हां बाकीचे लोक गंमत करतात, त्याने, कदाचित, समजणं बंद केलंय. तो निरोप घेऊन तिथून निघतो.


14.18


कपितोनव डिपार्चर हॉलमधे बसला आहे, मुलीला मैसेज पाठवायचा आहे. माहीत नाही कां, त्याला वाटतं की पोहोचंत असल्याबद्दल तिला कळवायला पाहिजे, काही तरी असं: “फ्लाइटने येत आहे.: किंवा असं: “डिपार्चर हॉल. लवकरंच.”

लवकरंच सगळे इलेक्ट्रिक उपकरण बंद करण्यासंबंधी घोषणा केली जाईल.

डिपार्चर हॉलमधे काही लोकांना लवकर-लवकर, समाधान होईपर्यंत, गोष्टी करायच्या आहे. फुकट वर्तमानपत्राजवळच्या स्टैण्डच्या जवळ मुलं धावताहेत. काचेच्या पलिकडे काळं आकाश आहे. विमान प्रत्येक ऋतूंत टेक-ऑफ करतात.


{{{‘तलाव’ कोण आहे?}}}


ही मरीना आहे.

हिला माहीत आहे की तुमची विकेट कशी डाउन करायची असते. कपितोनव लगेच उत्तर नाही देत.

{{{ तो मेला. तू कां विचारते आहेस?}}}

मरीना – त्याला:

{{{ तो जिवंत आहे.}}}


त्याला पुन्हां असा भास होतो, की पोटांत एक वजनदार ‘नट’ आहे.


{{{ तुला खात्री आहे कां?}}}

वाट बघतो. उत्तर येतं.


{{{तो माझ्या मूखिनचा भाऊ आहे आणि ते दोघं मंगोलियांत राहतांत, खाणीत काम करतांत.}}}


“दैवी क्षेत्र,” कपितोनव जोराने परक्या आवाजांत म्हणतो.

मैसेज येतो:

{{{ थैन्क्यू.}}}

{{{ कशासाठी?}}}


उत्तर येतं:


{{{प्रत्येक गोष्टीसाठी.}}}

 

कपितोनव मोबाइल स्विच ऑफ करतो. काही तरी करायला बघतो. पुन्हां ‘ऑन’ करतो.


आन्काला लिहितो:


{{{तुझ्यावर खूप प्रेम करतो}}}

काय ‘पापा’ शब्द लिहायचा? पण विचार करतो, की तिला कळेल.


फ्लाइट तीस मिनिट उशीराने जाण्याची घोषणा होते.


आता हे आणखी कशाला? काय झालं? काय होतंय?

“आणि मी पण तुझ्यावर खूप खूप.”


फक्त टेक्स्ट – कोष्ठकांशिवाय.


तो उठून हॉलमधे हिंडू लागतो – ह्या डिपार्चर हॉलमधे, वाट पाहतोय. घड्याळीकडे बघतो.


******


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract