Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

2  

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

धनु कोष्ठक - २९

धनु कोष्ठक - २९

6 mins
73


लेखक: सिर्गेई नोसव : भाषांतर: आ. चारुमति रामदास 

माइक्रोफोनजवळ माइक्रोमैजिशियन अदिनोच्नी प्रकट होतो.

मला वाटतंकी आपली कॉन्फ्रेन्स संपंत आलीयेआपण आपल्या वैयक्तिक समस्यांवर फारंच जास्त वेळ दिला. पण आपण राष्ट्रीय स्तरावर कागदपत्रांच्या अत्यधिक प्रवाहाची/ नासाडीची निंदा करण्याचा प्रस्ताव पारित नाही केला...

हॉलमधे टाळ्या वाजू लागल्याआणि त्याच्यासाठीसुद्धां टाळ्या वाजूं लागल्या. माइक्रोमैजिशियन रीख्लीला माइक्रोमैजिशियन अदिनोच्नीला माइक्रोफोनपासून दूर करण्यास जराही प्रयत्न नाही करावा लागला.

आपल्या मेंढ्यांकडे वळतो...हे काय चाललंयमहाशयांनोतुम्हांला हे विचित्र नाही वाटंत कांतपास अजून सुरू झालेला नाहीयेआणि आपल्या कार्यकारिणीत असा सदस्य आहेजो तपासाच्या वर्तुळांत येणार आहे! मी प्रस्ताव ठेवतोकी ही भयानक चूक सुधारण्यांत यावीआणि कपितोनवला आपल्या कार्यकारिणीचा सदस्य मानूं नये. कमींत कमी तपासाचं काम पूर्ण होईपर्यंत!

मानूं नये – म्हणजे कायकाढून टाकावं ?”

काढून टाकावं! काढून टाकावं!” ज्युपितेर्स्कीच्या ग्रुपचे लोक ओरडतांत.

श्याम-वनच्या ग्रुपचे लोकं उत्तरादाखल शिट्ट्या वाजवतांत आणि ‘हूट’ करतात.

प्लीज़मला माझी उमेदवारी परंत घ्यायची परवानगी द्या,” कपितोनव उठतो.

अरेतुम्हीं बसून जा नंहा तुमचा प्रश्न नाही राहिलायइथे सिद्धांताचा प्रश्न आहे!

शांति! शांति!” अध्यक्ष व्यवस्था राखण्याची अपील करतो. “मलापण समजंत नाहीयेकी आपण ‘निर्दोषितेचा अनुमान’ ह्या सिद्धांताकडे कां दुर्लक्ष करतो आहे. त्या खोलींत कपितोनव आणि ‘तलावच्या मधे काहीही झालं असोअजूनपर्यंत कोर्ट-केस झालेली नाहीये आणि आपल्याला फक्त अविश्वासाच्या आधारावर कपितोनवबद्दल मत बनवण्याचा हक्क नाहीये.

आता माइक्रोफोनजवळ व्लदिस्लाव हेर्त्स येतोहा जादुगारांच्या त्या ग्रुपचा लीडर आहेज्याला ‘तलाव’ प्राइवेट वार्तालापांत जुगारी म्हणायचा. 

हे बरोबर आहेआपल्याला कायद्याचा सम्मान करायला हवा. ‘निर्दोषितेचा अनुमान – ही पवित्र गोष्ट आहे. पण ह्या समस्येकडे वेगळ्या दृष्टीनेपण पाहूं या. आपल्या सहयोग्याने सुमारे दोनंच तासांपूर्वी” त्याने घड्याळाकडे नजर टाकली.


19.25


“...ओकेकदाचित तीन...सगळ्या लोकांच्या उपस्थितीत एक गंभीर घोषणा केली होती. त्याने म्हटलं होतं: मी पुन्हां कधीही हा जादू नाही दाखवणार. आणिजर परिस्थिति अशी आहेतर काय हे ‘नॉनसेन्स’ नाहीयेकी तो माणूसज्याने आपलं प्रोफेशन सोडून दिलंयबोर्डाच्या कार्यकारिणीचा सदस्य आहे?”

ह्या तर्काचा ऑडिटोरियमवर प्रभाव पडतो – काही लोक उत्तेजित होतात आणि ओरडूं लागतात : ‘नॉनसेन्स! नॉनसेन्स!’, काही लोक हताश होतात आणि त्यांचे विरोधात्मक ‘नो! नो!’ आधीच्या लोकांच्या आरड्या-ओरड्यांत दबून जातांत. माइक्रोमैजिशियन ज़्वेनिगरद्स्की माइक्रोफोन काबीज करतो:

इथे कायदेशीर तपासाचं आणि त्याच्या परिणामाचं गाणं गात आहेतपणप्लीज़हे सांगासिद्धांततः परिणाममग तो कसाही परिणाम कां न असोआपल्या कॉन्फ्रेसच्या शिवाय तेवढ्यांच स्पष्टतेने ह्या गोष्टीवर प्रकाश टाकू शकतो काजिला आपल्या कॉन्फ्रेन्सने...आपल्या कार्यकलापाच्या दरम्यान...इतक्यांतंच इतकं स्पष्ट केलेलं आहेमी कशाबद्दल बोलतोयह्याबद्दल! कपितोनवकडे कारण होतं!...होहोआपल्या सगळ्यांच्या डोक्यांत तो भयंकर शब्द घुमंत होतापण कोणालातरी त्याचा फक्त उच्चारंच करायचा होता!

इतक्यांत माइक्रोफोनजवळ हेरा-फेरी करणारा जादुगार पित्रोव दिसतो:

शुद्धीवर यामित्रांनो! अमानुष नका होऊं! आपण इतक्यांतच ‘तलावच्या स्मृतीत एका मिनिटाचं मौन पाळलं होतं. कार्यकारिणीसाठी कपितोनवच्या नावाचा प्रस्ताव कुणी आणखी नाहीतर ‘तलावनेच ठेवला होता. ‘तलावच्या आठवणीखातरतुम्हांला विनंती करतोकी हा विषय इथेंच संपवावा! कपितोनव तसला माणूस नाहीयेजो कार्यकारिणींत जाण्यासाठी ‘तलावचं प्रेत ओलांडून जाईल!

माइक्रोमैजिशियन पाव्लेन्का ने लगेच ह्याचा विरोध केला:

मीपण ‘निर्दोषितेचा अनुमान” ह्या सिद्धांताचा सम्मान करतोपण त्याबद्दल माझ्या मनांत प्रेम असूनहीमला वाटतंय की तुम्हीं आतां जे म्हटलंयते फक्त चिथवणारं आहेआणि असं सांगून तुम्हीं ‘तलावच्या स्मृतिचा अपमान करतांय!” 

कुठूनतरी एक पांढरं कबुतर प्रकट होतंते एका भिंतीकडून दुस-या भिंतीकडे उडतंय.

अध्यक्ष उठून उभा राहतो:

आता जर एकही ससामिट्ठू किंवा आणखी असलीच वस्तू दिसलीतर मी कॉन्फ्रेन्स संपवून टाकेन!

कबुतर उडून त्याच्याकडे जातो आणि खांद्यावर बसतो. अध्यक्षाला कबुतराला पळवायचं नाहीयेतो त्याच्यासकट सावधानीने आपल्या खुर्चीवर बसतो.

त्याचा बहिष्कार करण्याच्या प्रस्तावावर मतदान केलं पाहिजे!” हॉलमधून लोक ओरडून म्हणतात.

नाहीनका करूं!” 

बहिष्कार! बहिष्कार!

खांद्यावर कबुतर घेऊन अध्यक्ष म्हणतो:

कार्यकारिणीतूंन कपितोनवच्या बहिष्काराच्या प्रस्तावावर मतदान करण्यास माझं काहीच जात नाहीपण मला पूर्ण विश्वास आहेकी कार्यकारिणीतूंन – जिचं अनुमोदन आपण इतक्यांतच झालेल्या निवडणुकीच्या परिणामांच्या आधारावर केलेलं आहे – कुणाच्याही बहिष्काराचा प्रस्ताव आपल्या राजनैतिक अपरिपक्वतेचं प्रमाण आहे. चलाआधी एक कमिटी बनवूं याआचार संहितेवरहे कठीण नाहीये आणि हे आवश्यक आहेतिलाचं...

त्याला आपलं म्हणणं पूर्ण करूं देत नाही:

कमिटीची काही गरज नाहीये!

चांगलं ओळखतो आम्ही ह्या कमिटींना!

कबुतर अध्यक्षाच्या खांद्यावरून फडफडंत उडालंआणि दोनदा हॉलचा चक्कर मारून कपितोनवपासून दोनशे मीटर्सदूर खिडकीच्या चौकटीवर बसलं. 

कपितोनव गहि-या नजरेने कबुतराच्या नजरेंत अडकला. ते कपितोनवकडे तिरपं उभं राहून एका डोळ्याने बघतंय. कपितोनव बरांच वेळापासून कॉन्फ्रेन्सच्या कारभारावर लक्ष नाही देत आहे. जर कबुतराच्या ऐवजी तिथे प्लैपिटस कबुतर जरी आलं असतंतरी कपितोनवला आश्चर्य झालं नसतं. 

ह्या वेळेस 


19.48


दोन माइक्रोमैजिशियन्स माइक्रोफोनजवळ जागा धरण्यासाठी भांडताहेत. 

खिडकीच्या चौकटीवर कबुतर जणु डान्स करतोय: कधी एक पंजा उचलतोतर कधी दुसरा – जणु त्याला काहीतरी म्हणायचंय.

त्याला काहीतरी म्हणायचंय,” कपितोनव म्हणतोपण त्याचं म्हणणं कुणीच ऐकंत नाही. 

आणि तोसुद्धां ऐकंत नाहीये (होत्या दोन माइक्रोमैजिशियन्समुळे काही ऐकणं शक्य नव्हतं) इतक्यांत अध्यक्ष भुंकतो: “तुम्हीं कोण?” – त्याच्याकडे बघंतजो तीरासारखा हॉलमधे घुसला होता. आणि तो होता – एक लिलिपुट. त्याच्या अप्रत्याशित आगमनाला काही लोक बघतांततेव्हां पणजेव्हां खुर्च्यांच्या मधली वाट पार करूनतो रांगांच्या मधून खिडकीकडे जाऊं लागतो. कपितोनवचं लक्ष लिलिपुटकडे तेव्हांच जातंजेव्हां तो आपल्या मुठीने कपितोनवचा गुडघा दूर करतो आणि खिडकीच्या चौकटीजवळ दिसतो. पायांच्या बोटांवर उभा राहूनलिलिपुट कबुतर हातात घेतोम्हणतो : “हे माझं आहे,” आणि परंत जायला लागतो. 

आता तर सगळ्यांनीच त्याला बघितलं. धावंत जाणा-याला बघण्यासाठी कॉन्फ्रेन्सचे डेलिगेट्स किंचित उचकतांत. माइक्रोफोनच्या जवळचे दोघंपण आपलं भांडण सोडून खालच्या बाजूला बघूं लागतात.

तुम्हांला विश्वास आहे कांकी हे तुमचं आहे?” अध्यक्ष विचारतो.

नक्कीच!” जाता-जाता लिलिपुट उत्तर देतो आणि दाराच्या मागे गायब होतो.

हा कोण आहेहे काय आहे?” हॉलमधे लोक चिव-चिव करूं लागतात. “तो आपल्याबरोबर कां नाहीये?”

बसून जा!” अध्यक्ष दोन्हीं माइक्रोमैजिशियन्सला हुकूम देतोआणि ते, ‘सॉरी’ म्हणंत स्टेजवरून चालले जातांत. “मी चर्चा थांबवतोय. बसपुरे झालं. अजून आपल्या समोर अनौपचारिक कामं सुद्धां पडली आहेत. शांति! कृपा करून शांत राहा!

तो स्वतःसुद्धां चूप होतो – उभा आहे आणि चूप आहेजणु उदाहरण प्रस्तुत करतो आहे. ह्या कृतीचा लोकांवर असर झाला: मौनाची शक्ति हळूहळू गदारोळाच्या राक्षसाला काबीज करते.

जेव्हां पर्याप्त शांतता पसरलीतेव्हां एक नम्र पण धीट आवाज ऐकूं येतो:

डॉक्यूमेन्ट्सचा प्रवाह...

चूप राहा!” अध्यक्ष टेबलवर हात मारंत म्हणतो.

आणि पूर्ण शांतता पसरते.

एक पर्याय आहे,” अध्यक्ष म्हणतो. “कपितोनवला कार्यकारिणीतून बाहेर न काढतांकार्यकारिणीची त्याची सदस्यता तोपर्यंत निलम्बित ठेवावीजोपर्यंत ह्या दुर्दैवी घटनेचा तपास सगळ्याच दृष्टिकोनांतून पूर्ण नाही होतज्यांत हेपण निहित आहेकी आपल्या सहयोग्याने ह्या प्रोफेशनमधून निघून जाण्याची घोषणा केलेली होतीत्याबद्दल योग्य वेळेवर आपण आपलं मत प्रदर्शित करूं शकू. माझ्यामते हा फारंच चांगला पर्याय आहे. आपण ह्यावर लगेच मतदान करून घेऊं. जणुआपण आपल्या सहयोग्याला कोष्ठकांच्या बाहेर काढून आणू.

असं नाहीतर ह्याचा उलंट,” आपल्या जागेवरून कोणीतरी दुरुस्त करतो, “कोष्ठकांमधे बंद करून टाकूं.

पण आपण त्याला बाहेर नाही काढणार!” अध्यक्ष आपल्या आवाजांत जास्तीत जास्त गांभीर्य आणंत विवाद आटोपायचा प्रयत्न करतो.

पण नेक्रोमैन्सर मधेच टपकतो:

कोष्ठकांमधे तर ह्याला ठेवायला पाहिजे!” तो ईवेन्ट्स-आर्किटेक्टकडे तर्जनीने खूण करंत म्हणतो. “की तो काही कामाचा नाहीयेआणिजर तो काही कामाचा नाहीयेतर तो इथे काय करतोय?”

ईवेन्ट्स-आर्किटेक्ट लाल होऊन ताणलेल्या तर्जनीच्या दिशेने फुफकारतो: 

आणि तू स्वतः तर...आणि तू त्याला जिवंत कर...कर जिवंत!...आम्हीं पण बघूं की कसा जिवंत करतोस.

मी तर तयार आहे! मला करूंच नाही देत आहेत!

ह्या पागलांना इथून काढून टाका!” शेवटच्या रांगांमधून लोक ओरडले.

इथे कुणी पागल नाहीये!

प्लीज़अपमान नका करूं!

बस! बस! बस! मी प्रस्ताव मतदानासाठी ठेवतोय! कोण ह्याच्या पक्षांत आहेकी कोष्ठकांतून बाहेर काढावंकोण विरोधांत आहेकोण काहीच नाही म्हणंत आहे?”

अधिकांश लोकांनी ‘ह्याच्या’ – “कोष्ठकांतून बाहेरच्या – पक्षांत मत दिलं.

अध्यक्षाने सगळ्यांचं अभिनंदन केलं. सगळे लोक उठतात आणि बाहेर जातात. कारण की त्यांना माहीत आहेकी कुठे जायचंय.


20.01


कपितोनव सगळ्यांच्या निघायची वाट पाहतो, - क्लोकरूममधे त्यांच्या डोळ्यांत खुपायची इच्छा नाहीये. भर्त्सनेच्या आणि सहानुभूतिच्या नजरांकडे दुर्लक्ष करंत आपल्या समोर बघतोय. ह्यापणआणि त्यापण – आहेत तर खरंपण त्यांना कितपत महत्व द्यायचंयहा एक मोठा प्रश्न आहेकारण की ज्याच्यावर त्या रोखल्या आहेततो त्यांच्याकडे लक्षंच नाही देत आहेतसं जवळून जाताना काहीतरी बडबडून तर जातंच आहेत: ज्युपितेर्स्कीच्या पार्टीचे अशुभचिंतक लोक त्याच्यावर कठोर दृष्टि टाकतांतकिंवा फक्त तोंड फिरवून घेतांतआणि ‘श्याम-वनच्या पार्टीचे सहयोगीत्यांना सोडूनजे कपितोनवला ‘तलावच्या मृत्युसाठी जवाबदार ठरवतांत आहेत (आपल्यांमधे सुद्धां असे काही लोक आहेत)जे जर कपितोनवशी दृष्टिभेट झाली असतीतर त्याच्याकडे मान हालवून अभिवादन करायला किंवा बोटांने ‘विक्टरीची खूण करायला तत्पर आहेत. 

थोडक्यांततो वाट बघतोते निघून जातांत.

फक्त नीनेल त्याच्याजवळ आली:

तुम्हीं फार संयम दाखवला.

होआणि कॉन्फ्रेन्सचा अध्यक्षपणजो कामाचे कागदपत्र संभाळण्यांत इतरांपेक्षा मागे राहिला होताआपली ब्रीफकेस घेऊन त्याच्याजवळ येतो. होमहाशय नेक्रोमैन्सरलापण यावसं वाटंत होतंकारण की तो आपल्या जागेवर उभा आहेआणि हॉलमधून बाहेर नाही जात आहे.

माझ्या सामर्थ्यांत जेवढं होतंते सगळं मी केलं,” अध्यक्ष म्हणतो. “परिस्थिति अत्यंत वाईटपण होऊं शकली असती. पुन्हां कधीही घाईगर्दींत कोणची घोषणा नका करूं.

कदाचित त्याला आभार प्रदर्शन करणा-या शब्दांची अपेक्षा होती. कपितोनव चूप राहातो.

आणिजे मी तेव्हां कोष्ठकांबद्दल बोललो होतोत्याच्यावर लक्ष देऊं नका,” अध्यक्ष सल्ला देतो आणिआपल्या पाठीच्यामागेजवळ येत असलेल्या नेक्रोमैन्सरला अनुभवंततो आपल्या जागेवरंच इकडे-तिकडे हलूं लागतोज्याने नेक्रोमैन्सर पाठीच्या मागे नाही राहाणार. “कोष्ठक – एक प्रतीक आहे...

पण धनु-कोष्ठक नाही!” पुढे येताना नेक्रोमैन्सर म्हणतो.


आता


20.07


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract