Charumati Ramdas

Abstract Thriller

4  

Charumati Ramdas

Abstract Thriller

धनु कोष्ठक - ३३

धनु कोष्ठक - ३३

7 mins
254


लेखक: सिर्गेइ नोसव : भाषांतर: आ. चारुमति रामदास 

00.00


बर्फ पडूं लागला होता. टैक्सीवाला वाट बघतोय, इंजिन बंद न करतां, आणि विंडस्क्रीनवर वाइपर्स फिरतात आहे.

“तुझ्यासमोर कबूल करतेय, मी, कदाचित, तुझ्यांत अशी बुडाले नसते, जर तू हे नसतं केलं. फक्त मी तुला नीट बघूं शकले नाही. तसा, हा तुझा ‘गेम’ नव्हता, पण त्याच्या नियमांवरपण तू मस्त खेळलास. तू ‘तलाव’ला अजूनही ओळखलं नाहीस? हे सगळं त्याचंच केलेलं होतं. ‘तलाव’ फक्त मिलनसार दिसण्याचा प्रयत्न करंत होता, खरं म्हणजे तो फार वाईट माणूस होता, एकदम पोकळ, दुष्ट, असहनीय. मला ही गोष्ट दुस-यांपेक्षां जास्त चांगली माहीत आहे. त्याने तुझापण उपयोग केला. तुझा पत्ता लावला, मॉस्कोहून इथे खेचून आणलं, त्या स्टोर-रूममधे ओढून घेऊन गेला. तुला काय खरंच काही कळंत नाहीये? ही आत्महत्या होती! तू, त्याच्यासाठी होता...एखाद्या सोन्याच्या पिस्तौल सारखा! तू स्वतःला बिल्कुल दोष नको देऊंस. तू कोणत्याही सोन्याच्या पिस्तौलपेक्षा जास्त चांगला आहेस! तू अतुलनीय होतास, फक्त अतुलनीय! मानवतेच्या दृष्टीने मला ‘तलाव’बद्दल दुःख आहे, पण एका महिलेच्या दृष्टीने – बिल्कुल नाही. आपली काळजी घे, कपितोनव. नीनेलची आठवण ठेव. बाय, कॉम्रेड! मी कधीही मारेक-यासोबत झोपले नव्हते.”


कपितोनव नजरेने जाणा-या कारला बघंत राहिला. हॉटेलमधे परत जाण्याची इच्छा नाहीये. तो बेचैन आहे, जणु त्याने एखादा वजनदार स्क्रू गिळला असावा. तो लैम्पच्याखाली बेंचवर बसून राहिला असता, पण तो भुरभुरणा-या बर्फाने झाकला गेलाय.


त्याच्यावर नजर ठेवली जात आहे.  


तो झर्रकन् वळतो – हळू-हळू येत असलेल्या कारकडे: ही जुनी ‘झिगूली’ होती, हेडलैम्प फुटला होता. त्याने तिला तेव्हांच बघितलं होतं, जेव्हां नीनेल जाताना ‘तलाव’च्या नीचतेबद्दल आपलं स्वगत भाषण देत होती, - तेव्हां कार इथून अशीच हळू-हळू जात होती, जशी आता जाते आहे, पण विरुद्ध दिशेंत, आणि चौरस्त्यावर ‘झिगूली’ परंत वळते.


कपितोनवच्या जवळ येऊन कार थांबते, आणि ड्राइवर वाकून कपितोनवसाठी दार उघडतो.

“मालक, चलायचं! कुठे?”

हे आहे उदाहरण असंगठित कैब्सवर टैक्सी नावाच्या संस्थेच्या विजयाचं.


कपितोनवला फक्त बसायचं आहे.


दार पहिल्या प्रयत्नांत बंद नाही होत – आणखी जोराने बंद करावं लागतं.


पूर्वेकडील माणूस कपितोनवकडे बघून स्मित करतोय, वाट बघतोय.


“एक मिनिट,” कपितोनव म्हणतो. “विचार करून सांगतो,” काही विचार करतो, विचारतो:

“तुझं नाव काय आहे?”

“तुर्गून.”

“तुर्गून, तू काय ब-याच दिवसांपासून आहे पीटरमधे?”

“एक वर्ष आणि पाच महिने झालेंत.”

“कन्स्ट्रक्शन साइटवर काम करायचा कां?”

“नाही, भावाकडे.”

“पहाडांची आठवण येते कां?”

“कुटुम्बाची आठवण येते. बहिणींची. आमच्या तिकडे पहाड नाहीयेत.”

“तुला पीटरबुर्ग आवडतं कां?”

“चांगलं शहर आहे, मोट्ठं. खूप थण्डं. कुठे जायचंय?”

“कुठेच नाही,” कपितोनव दोन नोट काढतो. “तू मला बस, असंच घुमवून आण.”

“नाही, मी नाही! मी दारुड्यांना नाही!”

कपितोनव त्याच्या खिशांत नोट कोंबतो.

“तुर्गून, मी तुझ्याशी माणसासारखा वागतोय. तू माझी गोष्ट ऐकतोयंस कां? मला पीटरबुर्ग बघायचंय. ब-याच काळापासून मी इथे नाही आलो. आठवण यायची. तुला सेन्ट इसाकोव्स्की-कैथेड्रल माहीत आहे? एडमिरैल्टी – चिमुकल्या जहाजासकट? मला फक्त नेशील? नेवा, मोयका, ग्रिबायेदोव-कनाल...जर तुझी एखादी आवडीची जागा असेल, तर तिथेपण घेऊन चल. जिथे वाटेल, तिथे घेऊन चल. माझी फ्लाइट उद्या आहे, माहीत नाही, पुन्हां केव्हां येणं होईल?”

“दूर जातांय कां? अमेरिकेला चालले आहांत?”

“कुठली अमेरिका?” कपितोनव पुटपुटतो, असा अनुभव करंत की त्याने तुर्गूनशी जागा बदलली आहे, आता प्रश्न तो विचारतोय. “जवळंच जायचंय. अमेरिकेलाच कशाला जायला पाहिजे?”

“काय सकाळ पर्यंत जात राहायचंय?”

“जो पर्यंत कंटाळा नाही येत.”


निघाले. तुर्गूनला अजूनपर्यंत आपल्या सफलतेचा विश्वास नव्हता झाला – तो पैसेंजरकडे बघतो: त्याचं मत बदललं तर, पैसे परंत मागू लागला तर...

इथे किंचित ऊब आहे. कपितोनव ओवरकोटाचे बटन काढतो आणि स्कार्फ काढतो. हिवाळ्याच्या बर्फाळ रात्री पीटरबुर्ग बघणं – कपितोनवची हीच सर्वांत मोठी इच्छा होती. कोणच्यातरी गोष्टीची आठवण येऊन, किंवा कशातरीबद्दल कल्पना करून, तो डोळे बंद करतो, आणि लगेच झोपून जातो.


0.41


“मालक, पोहोचलो.”

“आँ? काय?”

“इसाकोव्स्की-कैथेड्रल.”

“कुठे?”

“हे राहिलं. इसाकोव्स्की-कैथेड्रल.”

“तुर्गून, तू – तुर्गून?… तुर्गून, हे इसाकोव्स्की-कैथेड्रल नाहीये, हे ट्रिनिटी-कैथेड्रल आहे, ह्यालांच इज़माइलोव्स्की म्हणतात...आणि मी काय झोपलो होतो?”

“झोपले होते, आपण जात होतो तेव्हां.”

“तू मला कां उठवलंस?”

“इसाकोव्स्की-कैथेड्रल, स्वतःच तर सांगितलं होतं न, दाखवायला.”

“ट्रिनिटी, मी तुला समजावतो. हे पण मोठं आहे, पण इसाकोव्स्कीपेक्षां किंचित कमी. इसाकोव्स्कीच घुमंट सोन्याचं आहे. तू पण काय...जर मला इसाकोव्स्की दाखवायचं आहे, तर लेर्मोंतोव्स्कीवर वळून जा, आणि तिथे रीम्स्की-कर्साकोववर, आणि मग ग्लिन्का स्ट्रीटवर बल्शाया-मोर्स्काया स्ट्रीटपर्यंत...काही असंच, किंवा इज़माइलोव्स्की वर, पण तिथे वज़्नेसेन्स्की प्रॉस्पेक्टवर ट्रैफिन वन-वे आहे, सादोवायावर बल्शाया पोद्याचेस्कायावर निघावं लागेल, आणि फनार्नीपर्यंत...पण जर मी झोपलो, तर मला उठवायची गरंज नाहीये.”

“झोपणार आहेस कां?”

“नाही, तुर्गून, माझ्याकडे झोपायला जागा आहे. मी तुला ह्यासाठी नाही घेतलं. मी तीन रात्री झोपलेलो नाहीये, मी थोडा वेळ झोपूं नाही शकंत कां? कळलं? मी एका माणसाला, म्हणू शकतो, की त्या जगांत पाठवून आलोय. सकाळी इन्वेस्टिगेटर मला वैताग आणेल. कदाचित, मला कुठेही जातांच येणार नाही, कळलं? आणि तू म्हणतो ‘झोपणार आहेस कां’. तू मला ओळखंत नाहीस, तुर्गून,, मला जादू नाही आवडंत. पण फक्त येवढं समजून घे, की जर अचानक मी झोपून गेलो, तर लक्षांत ठेव, की मी सगळं बघतो आहे, मला स्वतःलाच माहीत आहे, की मला कुठे उठायचंय.”

कपितोनव एखाद्या नेविगेटरसारखा लक्षपूर्वक पाहतो, की तुर्गून लेर्मोन्तोव्स्कीवर वळला की नाही. जेव्हां ते पुलावरून जातांत, तेव्हां तो उत्साहाने तुर्गूनला म्हणतो : “कारंज, बघतोय, पूर्णपणे बर्फाखाली आहे...” पण सादोवायाच्या आधी, जेव्हां सिग्नलजवळ थांबतात, तेव्हां कपितोनवचे डोळे पुन्हां बंद होतांत, आणि तो रीम्स्की-कर्साकोव प्रॉस्पेक्टचं वळण नाही बघूं शकंत.

क्यूकोव कैनालच्या वरचा पुल तुर्गून खूप हळू-हळू पार करतो – त्याला वाटतं की पैसेन्जरने उंच घण्टा बघावी, पण त्याला उठवायची हिम्मत नव्हती. हे राहिलं घुमटांचं मंदिर, आणि सगळं झगमगत्या प्रकाशाने आलोकित आहे, पण तुर्गूनला माहीत आहे की हेसुद्धां इसाकोव्स्की-कैथेड्रल नाहीये, - कैथेड्रलबद्दल त्याला सगळं पाठ होतं, पण ट्रिनिटी-कैथेड्रलला इसाकोव्स्की-कैथेड्रल अश्यासाठी समजला की ट्रिनिटी-कैथेड्रलच्या जवळ ट्रिनिटी-मार्केट आहे, जिथे तुर्गून आपल्या भावाची मदत करायचा.

डावीकडे वळून तुर्गून ट्रामचे रूळ पार करतो – कदाचित पैसेंजरला दोन स्मारकं बघायला आवडेल – एक उभं आहे, आणि दुसरं बसलं आहे, विशेषकरून बसलेलं जास्त चांगलं आहे – त्याच्या डोक्यावर मोट्ठी बर्फाची टोपी होती. पण, पुढे आणखी ही मनोरंजक गोष्टी असतील, आणि ह्या रस्त्याला तुर्गून भर्रकन् पार करतो – विरघळंत असलेला बर्फ जितकी परवानगी देईल तितक्या वेगाने.

बल्शाया-मर्स्कायावर बर्फ तोडणारे काम करंत होते. पण इथे समुद्र कुठे आहे, हे तुर्गूनला नाही माहीत. पीटरबुर्गमधे दीड वर्षापासून राहतोय, पण आज पर्यंत समुद्र नाहीं पाहिला.

हे राहिलं ते – इसाकोव्स्की-कैथेड्रल, आणि त्याच्यापुढे घोड्यावर स्वार स्मारक, आणि त्याच्यामागे दुसरं स्मारक – घोड्यावर : तुर्गून हळू-हळू जातोय, जणु पैसेंजरला दाखवतोय ती वस्तू, जी त्याला बघायची होती – पीटरबुर्गचे हे महान दर्शनीय स्थळं. मोठ्या मुश्किलीने तुर्गून स्वतःला थांबवतो, ज्याने कपितोनवची झोप मोडणार नाही. आता त्याच्या समोर आहे नेवा. आकाशाच्या अंधारांत त्याबाजूची मीनार चमचमतेय.

तुर्गून स्वतः थोडा-थोडा कपितोनव झाला आहे – ह्या दृष्टीने नाही, की त्यालाही झोपायचं आहे, तर असा, की हे सगळं त्याच्या नजरेने बघायचा प्रयत्न करतोय, जो बराच काळ ह्या सगळ्यासाठी तडफडला होता. आणि, जेव्हां तो ब्लगाविश्शेन्स्की ब्रिज पार करतो, तर नेवाकडे अशी दृष्टी टाकतो, जणु झोपलेल्या कपितोनवसाठी तिला बघतोय.

तुर्गून खूपंच सुरेख ठिकाणांवर गाडी नेतो, आणि जेवढं सुरेख ते ठिकाण असेल, तितकीच हळूं गाडी चालवतो. बुरूज आहे उजवीकडे, आणि डावीकडे – म्यूजियम, आणि इथे, तोपेच्या फेन्सिंगच्यामागे, आणि, आणखीही इतर काही ठिकाणांवर तो जवळ-जवळ थांबूनंच जातो. विश्वास करणं कठीण आहे, की ह्या पैसेंजरने कुणाला तरी मारून टाकलं आहे, - तुर्गूनला, कदाचित, पैसेंजरचे शब्द बरोबर कळले नसावेत. कदाचित कोणीतरी ह्याच्याच जीवावर टपलं होतं, ह्याने कुणाला नव्हतं मारलं. हे बघा, तो आत्ता झोपलांय.

ह्यानंतर ते मशिदीकडे येतात. तुर्गून थांबतो, आणि दुर्घटनेच्या दिव्यांना ऑन करतो, कारण की इथे पार्किंगची परवानगी नाहीये, आणखी एका मिनिटासाठी इंजनसुद्धां बंद करतो ह्या अपेक्षेने की पैसेंजर जागा होईल, आणि स्वतःच त्याच्यासाठी सम्मानपूर्वक मशिद बघूं लागतो.

बर्फाने झाकलेल्या गल्ल्यांमधून होत तो जुन्या युद्धपोताकडे जातो, जिथून इथे क्रांतीचा प्रारंभ झाला होता. आणि पुन्हां, पुल पार केल्यावर, माहीत नाही कुणीकडे जाऊं लागला. पैसेंजरला इथे आवडलं नसतं, आणि तुर्गून पटकन ह्या इण्डस्ट्रियल एरियातून निघून जातो.

पैसेंजर तरीही नाही उठंत, जेव्हां पेट्रोल पम्पाजवळ तुर्गून गाडी थांबवतो, आणि, जरी कारच्या शैफ्टमधे काही खराबी आहे, तुर्गून पैसेंजरला नेवाच्या किना-यावर घुमवणं आपलं कर्तव्य समजतो. आधी ते नेवाच्या काठाकाठाने पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात (ह्या वेळेस


03.10


नेव्स्की प्रॉस्पेक्टवर फारंच कमी गाड्या जाताहेत आणि पाई जाणारे तर बिल्कूलंच नाहीयेत), आणि मग तो पैसेंजरला नेवाच्या काठा-काठाने पश्चिमेकडून पूर्वेकडे घेऊन जातो. पूर्वी टोकावर त्याला आठवतं, की ह्या रस्त्यावर, ज्याला कोन्नाया स्ट्रीट म्हणतात, एक प्रसिद्ध इमारत आहे. तशी तर ही एखाद्या साधारण इमारतीसारखीच आहे, असल्या इमारती पीटरबुर्गमधे अगणित आहेत, पण त्याच्यासाठी ही खास आहे. तिच्या भिंतीवर ‘स्ट्रा’ने साबणाचे बुडबुडे उडवंत असलेल्या मुलाचं चित्र आहे. पीटरबुर्गमधे तर सगळंच खूप कठोर आहे, पण तुर्गूनला हे चित्र गुदगुल्या करून गेलं आणि आता तो


04.02


हळूच हसतो.


कपितोनव डोळे उघडतो.

तुर्गून बोटाने नक्काशीकडे खूण करतो, पण शब्दांने समजावू शकंत नाही. तो फक्त एकंच शब्द म्हणतो:

“चित्र.”

कपितोनव नजर उचलतो – बघतो – डोकं हालवतो.

आणि म्हणतो:

“चल, घरी घेऊन चल.”

“समर-गार्डन दाखवूं कां?”

“ठीक आहे,” कपितोनव म्हणतो, आणि डोळे बंद करतो.


04.51


“तुर्गून, मी तुला पैसे दिलेत कां?”

“हो, हो, चांगलेच पैसे दिलेत.”

“तुझं नाव खूप भक्कम आहे – तुर्गून. तुला माहीत आहे कां, की ह्याचा काय अर्थ आहे?”

“माहीत आहे,” तुर्गून उत्तर देतो. “जो जिवन्त आहे.”

“फक्त जिवन्त आहे?”

“जो जिवन्त आहे, जमिनीवर चालतो.”

“असंच असायला पाहिजे. आणि मला वाटलं, कुणी लीडर असेल. विजेता.”

“नाही. जो जिवन्त आहे.”

“बरंय, असाच राहा, जो जिवन्त आहे. थैंक्यू.”


कपितोनवला आठवंत नाही की तो आपल्या खोलीपर्यंत कसा पोहोचला आणि, फक्त ओवरकोट काढून बिछान्यांत लपून गेला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract