Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

3  

Charumati Ramdas

Abstract Horror Thriller

धनु कोष्ठक - २८

धनु कोष्ठक - २८

7 mins
166


“इन्वेस्टिगेशन टीम,” – ‘तलाव’चं मृत शरीर असलेल्या खोलीकड जात असलेल्या लोकांना बघून माइक्रोमैजिशियन आस्त्रव म्हणतो. “म्हणजे ही काही साधारण बाब नाहीये.” 

“काव-काव नका करू,” नीनेल म्हणते. “ह्याचा काही अर्थ नाहीये.” 

“तुम्हांला असं वाटतं? काल काल्पनिक बॉम्ब, आज वास्तविक मृत्यु.”


18.20


“लक्ष द्या, कपितोनव, आता तुम्हांला प्रश्न विचारतील...लक्षांत ठेवा...” नीनेल आपलं म्हणणं पूर्ण करूं शकंत नाही – तो आलासुद्धा:

“तुम्हीं प्रत्यक्षदर्शी आहांत कां?”

“हो, मी साक्षीदार आहे.”

“सध्यां प्रत्यक्षदर्शी.”

“काही फरक आहे कां?” माहीत नाही कां, कपितोनव विचारतो.

“फार मोठा.” 

“आणि तुम्हीं?” नीनेल आपलं नाक खुपसते. “तुम्हीं काय इन्वेस्टिगेटर आहांत?”

“ऑपरेशन्स ऑफिसर.”

“माफ करा, कळलं नाही.”

“ऑपर...” ऑपरेशन्स ऑफिसर म्हणतो.

“आणि इन्वेस्टिगेटर कुठे आहे? इन्वेस्टिगेटर असायला पाहिजे. मला इन्वेस्टिगेटर दाखवा.”

“मी इन्वेस्टिगेटरच्या ऐवजी आलो आहे.”

“आह, तर असं आहे, पूर्ण ग्रुप नाही आला! चला, हो, आज तर रविवार आहे.”

“ते आम्हीं स्वतःच बघून घेऊं.”

“हो, खरंच, मी विसरलेच होते, की रविवारच्या दिवशी मरण्याची सिफारिश करण्यांत येत नाही.”

“कोण नाही करंत सिफारिश? कुणीही अशी सिफारिश केलेली नाहीये!”

“आणि, हे बरोबर आहे कां, की इन्वेस्टिगेटरच्या अभावांत ऑपरेशन्स ऑफिसरने क्रिमिनल केसची सुरुवात करावी?”

“माफ करा, मी क्रिमिनल केस सुरू करंत नाहीये. आणि क्रिमिनल केस सुरू मी नाही करंत.”

“चला, विचारा...”

“मी विचारंत नाहीये, पण तुम्हीं मला खूप डिस्टर्ब करता आहांत.”

“आपलं काम चालू ठेवा. पण मी बरोबर राहीन. कपितोनव, मी इथेच आहे!”

“तुम्हीं एडव्होकेट आहांत कां?”

“मी ट्रिक्स-डाइरेक्टर आहे!”

“नीनेल,” कपितोनव म्हणतो, “प्लीज़, मी स्वतःच सांभाळून घेईन.”

“ठीक आहे. फक्त मी काय म्हटलं ते लक्षांत राहू द्या.”

ती दूर जाते.


18.25


लहान खोलीत.

“मी इथे उभा होतो, तो – इथे. पार्टीशनच्या मागे. मी त्याला बघंत नव्हतो, आणि आम्हीं ठरवलं होतं की तो चूप राहील. त्याने संख्या मनांत धरली, मी त्याला म्हटलं...काही करायला. मग मी म्हटलं: 99. तो पडायला लागला, पार्टीशन माझ्या अंगावर पाडलं, आणि स्वतः मरून गेला.”

“काही करायला – म्हणजे काय करायला?”

“पाच जोडायला, तीन वजा करायला...अगदी बरोब्बर संख्यातर लक्षांत नाहीये, विसरलो.”

“हा जादू आहे कां?”

“माहीत नाही. कदाचित, जादू आहे. इथे सगळेच जादुगार आहेत.”

“सगळ्यांच्याबद्दल जाणून घेणं जरूरी नाहीये. आता आम्हीं तुमच्याबद्दल आणि त्याच्याबद्दल बोलतो आहे. ठीक आहे, सामान्यपणे समजलंय.”


18.29


तो बराच वेळ कुणाशीतरी फोनवर बोलंत होता.


18.35


“राहिला इन्वेस्टिगेटरचा प्रश्न...मी लिहून देतो की काय नाव आहे,” ऑपरेशन्स ऑफिसर फाइलींतून नोट-पैड काढतो. “तुम्हांला उद्या यावं लागेल.”

“उद्या माझी फ्लाइट आहे...जवळ जवळ दोन वाजून काही मिनिटांनी.”

ऑपरेशन्स ऑफिसर वरच्या कागदावर नाव आणि पत्ता लिहितो. पैडमधून तो कागद फाडतो.

“तर, अकरा वाजतां या,” नीनेलकडे नजर टाकंत कागद कपितोनवला देतो.

“हे काय नोटिसच्या ऐवजी आहे? लक्षांत ठेवा, कपितोनव, तुमच्यासाठी तिथे जाणं जरूरी नाहीये!”

“माझा प्रामाणिक सल्ला. येऊन जा, इन्वेस्टिगेटर चोर्नव तुमची वाट बघतील, मी इतक्यांतंच त्यांच्याशी बोललोय. हे तुमच्यासाठी चांगलं राहील.”

कपितोनव विचारतो:

“सम्मनवर?”

“तुम्हांला काय सम्मन लावून पाहिजे?”

“नाही, सम्मन लावाल, तर नाही येणार,” कपितोनव ठामपणे उत्तर देतो.

“ठीक आहे, तुम्हीं फक्त तसेच या.”


18.40


ऑपरेशन्स ऑफिसर्सच्या जाण्याने कॉन्फ्रेन्समधे चैतन्य पसरलं. ‘तलाव’चं प्रेत अजून खोलीतंच पडलं आहे, आणि त्याच्यासाठी शवागारातून कर्मचारी येणार आहेत, आणि डेलिगेट्स काहीही न सांगता हॉलमधे आपापल्या खुर्च्यांवर बसूं लागतात. कपितोनव ह्यातलं काहीही बघंत नाहीये. तो, जसा बसला होता, तसांच बसलाय. तो फक्त तेव्हांच लक्ष देतो, जेव्हां त्याला उठायला सांगतात.

अध्यक्ष ‘तलाव’च्या सम्मानाप्रीत्यर्थ एका मिनिटाचं मौन पाळायचा प्रस्ताव ठेवतो. सगळे उभे राहतात, आणि एक मिनिट मौन राहून ‘तलाव’ला श्रद्धांजली वाहतात.

“कृपया बसा,” अध्यक्ष म्हणतो.

सगळे लोक बसलेसुद्धां नव्हते की माइक्रोफोनजवळ महाशय नेक्रोमैन्सर येतो.

“काही लोक माझ्या प्रोफेशनल योग्यतेवर बोट ठेवतांत. तर, मी तयार आहे. मी आत्ता, ह्याच क्षणी सिद्ध करायला तयार आहे...”

“बसून जा, प्लीज़, मी तुम्हांला बोलायला नाही सांगितलं...”

“मित्रांनो, मी तुमच्या हृदयाला आणि डोक्याला सांगतोय, मृत्यु – ही नेहमी एक अप्रत्याशित घटना असते, आणि तिच्यासाठी कोणतांच नियम नसतो...”

“बसून जा!...पुरे झालं!...आपल्या जागेवर!” हॉलमधून आवाज येतात.

“तर मग, एक ऐतिहासिक त्रुटि-संशोधन!” आरडा-ओरड्याला, टाळ्यांना, हूटिंगला न जुमानतां महाशय नेक्रोमैन्सर आवाज मोठा करतो. “सहाव्या विश्व-परिषदेत...माझ्या पूर्वजांपैकी एकाला...परवानगी दिली होती...एका मृत व्यक्तिला पुनर्जीवित करण्याची...ही पुनर्जन्माची प्रक्रिया कितपत यशस्वी झाली, मला मान्य आहे, की ह्याबद्दल कोणतंही प्रमाण नाहीये...काही स्त्रोतांप्रमाणे, प्रयोग यशस्वी नाही झाला...पण मुद्दा वेगळांच आहे...सहाव्या विश्व-परिषदेने...जी आपल्या नियमांच्या कठोरतेसाठी प्रसिद्ध आहे...पुनर्जीवनाच्या प्रक्रियेला परवानगी देण्याच्या शक्यतेला मान्यता दिली...पण आपण...”

हॉलमधे भयंकर गदारोळ होऊ लागतो, त्यासोबतंच अनेक जादुगार भयानक उद्देश्याने नेक्रोमैन्सरकडे धावतांत – एकाने माइक्रोफोनचा स्टैण्ड पकडला आणि त्याला वक्त्याच्या हातांतून खेचू लागला, दुसरे दोन जादुगार नेक्रोमैन्सरला हातांने थोपवायचा प्रयत्न करतात, आणखी एक जादुगारतर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न प्रयत्न करंत असलेल्या नेक्रोमैन्सरची मान धरून त्याच्या पाठीला लटकला. नेक्रोमैन्सरचा हातांतून माइक्रोफोन सुटून गेला, पण थोडा वेळतर तो आपल्यावर चालून आलेल्या जादुगारांचा प्रतिकार करंत राहिला. पण असमान ताकत असल्यामुळे, आणि हॉलमधे त्याला काहीही समर्थन नसल्यामुळे, आणि, जरी तो दमनकारी लोकांपासून स्वतःला मुक्त करण्यांत सफल झाला, तरी आपलं भाषण चालू ठेवायची त्याची इच्छा नाहीये – तो गर्वाने स्टेजवरून उतरतो आणि हॉलमधे आपल्या खुर्चीकडे जातो.

“मित्रांनो, मला कळतंय की आपला मानसिक ताण पराकाष्ठेला पोहोचलाय, पण चला, आपण सगळे गिल्डच्या बोर्डाच्या निवडणुकांवर आपलं मत देऊन त्यांचं अनुमोदन करूं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे! मी ऑडिट कमिटीच्या प्रेसिडेंटला निवेदन करतो की निवडणुकीच्या परिणामांचे निष्कर्ष सांगावे.

“परिणाम खूप मजेदार आहेत,” ऑडिट कमिटीचा प्रेसिडेण्ट रिपोर्ट प्रस्तुत करतो, “अनेक बाबतींत असाधारण. मला काळजी आहे, की तुम्हीं माझ्यावर विश्वास नाहीं ठेवणार, पण आकड्यांच्या दृष्टीने निष्कर्ष ह्या प्रमाणे आहेत: तेरा उमेदवारांपैकी सात उमेदवारांना एकसारखे मतं मिळाले आहेत, प्रत्येकाला बरोब्बर 51 (त्याने नावं सांगितली). 

हॉलमधे खळबळ सुरूं झाली.

“असं थोडीच होतं!”

“मेन्टलिस्ट कपितोनवला दोन मतं मिळाली आहेत. आणि इतर पाच उमेदवारांना प्रत्येकी एक-एक मत मिळालंय.”

“जादू, जादू!” हॉलमधे लोक ओरडतात.

ऑडिट कमिटीचा प्रेसिडेण्ट घोषणा करतो की हा जादू नाहीये, तर संभावना-सिद्धांतावर आधारित आहे, पण कोणीच त्याच्यावर विश्वास नाही ठेवंत.

“चला, हरणा-यांबद्दल कळतंय,” माइक्रोमैजिशियन पित्रोव कपितोनवला म्हणतो. “त्यांच्यापैकी प्रत्येकाने स्वतःलाच मत दिलेलं आहे. पण तुमच्यासाठी दुसरं मत होतं ‘तलाव’चं. म्हणून दोन मतांबरोबर तुमचं रेकॉर्ड चांगलं आहे.”

“तुम्हांला काय खरंच असं वाटतं, की मी स्वतःला वोट द्यायच्या लायकीचा आहे?” कपितोनव विश्लेषण करणा-या शेजा-याकडे पाहतो.

“असं आहे कां? म्हणजे, आणखी कुणी तरी. कुणी आणखीही तुम्हांला मत दिलंय, अभिनन्दन.”

“मी! मी,” नीनेल म्हणते, “कपितोनवला मत दिलंय. कपितोनव, धीर धरा, ह्याच्यासाठी तुम्हांला क्षमा नाही करणार...”

ह्या दरम्यान कॉन्फ्रेन्समधे ऑडिट कमिटीच्या प्रेसिडेण्टबद्दल तीव्र अप्रसन्नता दिसून येते. असं कळतं, की मतांच्या संख्येचा मतदारांच्या संख्येशी मेळ बसंत नाहीये. 

“इथे कुणी गुन्हेगार नाहीये, असं होतं कधी-कधी,” ऑडिट कमिटीचा प्रेसिडेन्ट स्पष्टीकरण देतो. “आमच्याकडे एक मतपत्र कमी पडंत होतं. ही साधारण बाब आहे.”

“कदाचित तुम्हीं दवाखान्यांत पिरिदाशसाठी बैलेट-बॉक्स नसेल पाठवला,” हॉलमधून काही आवाज येतात.

“दवाखान्यांत आम्हीं त्याच्यासाठी एक जास्तीचा बैलेट-बॉक्स पाठवला होता, आणि त्याने पाय मोडलेला असतानासुद्धां निवडुणकीत भाग घेतला. पण, मला वाटतंय की त्याने मतदानांत भाग नाही घेतला. कारण की, जेव्हां ऑडिट-कमिटीने परंत येऊन जास्तीचा बैलेट-बॉक्स उघडला, तेव्हां तो रिकामा होता...”

“पण, त्याने तर बैलेट-बॉक्समधे मतपत्र टाकलं होतं नं?”

“कदाचित, हो.”

“ह्या ‘कदाचित’चा काय अर्थ आहे?”

“बैलेट-बॉक्समधे कोण, काय टाकतं ही ऑडिट कमिटीच्या सदस्यांची जवाबदारी नाही.”

“चला, पिरिदाशला दवाखान्यांत फोन करू – आणि त्याला विचारूं की त्याने बैलेट-बॉक्समधे मतपत्र टाकलं होतं किंवा नाही.”

“नाही, ह्याची परवानगी नाहीये,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष म्हणतो. “हे गुप्त-मतदान आहे. आपल्याला ह्या बाबतीत उत्सुकता दाखवायला नको, की पिरिदाशने कुणाला मत दिलं.”

“आम्हांला ह्याचाशी काही घेणं देणं नाहीये, की त्याने कुणाला मत दिलं. आम्हांला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे, की मतपत्र कुठे गेलं.”

“जादू, जादू!” हॉलमधे लोक पुन्हां ओरडतात.

“नाही, थांबा,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष प्रतिवाद करतो. “पिरिदाशला मतदानांत भाग न घेण्याचा पूर्ण अधिकार होता. तो मतपत्र बैलेट-बॉक्समधे न टाकायलासुद्धां स्वतंत्र होता. तो असं दाखवू शकला असता, की टाकतोय, जेव्हां की स्वतः मतपत्र टाकण्याबद्दल विचारपण करंत नव्हता. हो, जादू. पण त्याला अधिकार आहे जादू दाखवायचा.”

“ही जादू नाहीये. ही फसवणुक आहे!”

“थांबा, थांबा. पिरिदाशने मतदानांत भाग घेतला, म्हणजे, जर तुम्हांला वाटलं तर असं समजूं शकता, की त्याने सामान्य संख्या पूर्ण केली. मतदानांत भाग घेत असलेल्या लोकांची संख्या – 100%. त्यासाठी पिरिदाशला धन्यवाद. पण काही व्यक्तिगत कारणांमुळे, मतपत्र मिळाल्यानंतर, त्याने ते बैलेट-बॉक्समधे टाकण्यास नकार दिला, म्हणजे, त्याने मतदानांत भाग नाही घेतला. बाइ द वे, असं काही लोक करतांत मोठ्या, सरकारी मतदानांत – असं बहुतकरून मतपत्रांचे संग्रहकर्ता करतात...”

“तुम्हांला असं म्हणायचंय का, की पिरिदाशने मतपत्र आठवण म्हणून ठेवून घेतलंय?” 

“कां नाही? पीटरबुर्गच्या आठवणीबद्दल, आपल्या कॉन्फ्रेन्सच्या आठवणी प्रीत्यर्थ, त्याच्या दवाखान्यांत भरती होण्याबद्दल, पाय मोडल्याबद्दल...”

हे तर्क कॉन्फ्रेन्सला विश्वास ठेवण्यासारखे नाही वाटंत.

“पण, शक्य आहे, की कारण काही दुसरंच असेल,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष विश्लेषण चालू ठेवतो. “शक्य आहे, की सामान्य वाद-विवादापासून बलात् दूर झालेल्या पिरिदाशला असं वाटलं, की त्याला ह्या प्रक्रियेवर प्रभाव टाकायचा काही अधिकार नाहीये, आणि परिणाम काहीही असेल, तरी त्याने ह्या आगामी निवडणुकीला मान्यता दिली – प्रत्यक्ष रूपाने मतदान नाही केलं, म्हणजे, मतपत्र बैलेट-बॉक्समधे नाही टाकलं, पण मतदानांतभाग घेऊन आपल्या सगळ्यांच्याप्रति स्वतःचा सम्मान प्रदर्शित केला.”

हा तर्क ब-याच लोकांना पटला.

“कृपा करून ऑडिट-कमिटीच्या रिपोर्टची पुष्टी करा. कोण- पक्षांत आहे? कोण – विरोधांत? कोणी - भाग नाही घेतला? ऑडिट-कमिटीच्या रिपोर्टची पुष्टी करण्यांत आली. कृपा करून ऑडिट-कमिटीच्या निष्कर्षांना अनुसरून सात सदस्यांच्या बोर्डाच्या कार्यकारिणीचं गठन झाल्याची पुष्टी करा. कोण – पक्षांत आहे?”

“स्टॉप, स्टॉप!...आणि ‘तलाव’?” हॉलमधून लोक ओरडले. “तो बाहेर झाला कां? तो आता बोर्डमधे नाहीये कां?”

“ ‘तलाव’च्या जागेवर ऑटोमेटिकली हरलेल्या उमेदवारांपैकी तो येईल, ज्याला सगळ्यांत जास्त मतं प्राप्त झाले आहेत. आणि असा आहे – कपितोनव.”

कपितोनवने थकव्याने हात वर केला.

“मी आपली उमेदवारी परंत घेतो,” तो म्हणतो.

“काही परंत-बिरंत नाही होणार!” श्याम-वन उद्गारतो. “उमेदवारी परंत घ्यायला फार उशीर झालेला आहे.”

“हो, असंच आहे,” अध्यक्ष म्हणतो. “उमेदवारी परंत घेण्याचं प्रावधान गुप्त मतदान होईपर्यंतंच होतं, आता आपल्याला मतदानाच्या परिणामांना मतांचे गणितीय वितरण आणि ‘तलाव’शी संबंधित घातक घटनांच्या संदर्भात एक तथ्य म्हणून स्वीकार करावं लागणार आहे.” 

माइक्रोमैजिशियन अपेकूनी धावंत माइक्रोफोनजवळ येतो:

“मी विरोध करतो! असल्या ‘घटनां’मुळे कपितोनवला बोर्डांत जागा मिळायला नको! तो ‘तलाव’ला जादू दाखवंत होता. जादू करताना दर्शकाचा मृत्यु होतो – हे अगदी नॉन-प्रोफेशनल आहे! हे तसंच आहे, जसं आपण एका महिलेला आरीने घासतोय, आणि घासतां-घासतां तिचे दोन तुकडे करून टाकतो!”

“इथे कोणी कुण्या महिलेला घासंत नाहीये! आम्ही माइक्रोमैजिकचे उस्ताद आहोत!” हॉलमधे लोक ओरडतात.

“सगळेच माइक्रोमैजिशियन्स नाहीयेत! मी मेक्रोमैजिशियन आहे!” ईवेन्ट्स-आर्किटेक्ट खणखणीत आवाजांत म्हणतो.

“दि ग्रेट मैन्याक!” महाशय नेक्रोमैन्सर, ज्याने आता स्वतःला सावरलं होतं आणि दीर्घ श्वास घेत होता, ओरडून त्याला उत्तर देतो.

“ठीक आहे, ठीक आहे,” अध्यक्ष म्हणतो, “आपण सगळे वेगवेगळे आहोंत, हो, आपल्यांत मेक्रोमैजिशियन्सपण आहेत, आणि, कोण नाहीये आपल्यांत, पण, जर आपल्याला मुश्किलीने पूर्ण केलेल्या – गुप्त! – मतदानाच्या प्रक्रियेला, नव्या उमेदवार इत्यादीमुळे पुन्हां करायचं नसेल, तर माझं म्हणणं ऐका – आपल्याला निवडून आलेल्या, पुन्हां सांगतो, निवडून आलेल्या कार्यकारिणीच्या सदस्यांची पुष्टी करावी लागेल, काही लहान-सहान गोष्टी लक्षांत घेऊन, ज्यांच्याबद्दल मी आधीच सांगितलंय, आणि त्यानंतरंच, जर तुमची इच्छा असेल तर कपितोनवच्या कार्यकलापांबद्दल आपण आपलं मत प्रदर्शित करूं शकतो, पण वैधानिक नाही, तर व्यावसायिक, आणि पूर्णपणे प्रारंभिक, ह्या निष्कर्षांसह की तो त्या कार्यकारिणीचा सदस्य आहे, जिची पुष्टी आपण करंत आहोत, पण हे नका विसरूं की ह्या कार्यकलापांना त्याने, ऐकतांय नं – आधी! – आपल्या कार्यकारिणीचं अनुमोदन करण्यापूर्वी केलेलं होतं. थोडक्यांत – वोटिंगसाठी प्रस्तुत करतो: कोण - पक्षांत आहे, की बोर्डाच्या कार्यकारिणीची पुष्टी करावी? कृपा करून हात उंच करा. कोण – विरोध करतंय? कोण – काहींच म्हणंत नाहीये?”

अध्यक्षने स्वतः वर केलेले हात मोजले. 

बहुमताने बोर्डच्या कार्यकारिणीची पुष्टि झाली आहे. सगळ्यांचं अभिनंदन करतो.”


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract