धनु कोष्ठक - २०
धनु कोष्ठक - २०
लेखक: सिर्गेइ नोसव ; भाषांतर: आ. चारुमति रामदास
10.27
“जादुगार-मित्रांनों!” ‘तलाव’ माइक्रोफोनपासून दूर नाही जात, “प्रामाणिकपणे बोलूं या, इथे, आपण सगळे जादुगार आहोत, आपण सगळे मैनिप्युलेटर्स आहोत, ही आपली कला आहे, आणि आपण त्यांत प्रवीण आहोत. पण, तुम्हींच विचार करा, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या: मैनिप्युलेशनच्या विषयाच्या दृष्टीने ‘संख्या’ पत्त्यांहून, रुमालाहून, दोमिनोच्या फास्यांहून आणि अशाच काही इतर आपल्या पसंतीच्या वस्तूंहून कोणत्या गोष्टींत वेगळ्या आहे? जर आपण संख्यांच्या मैनिप्युलेटरला ऑडिट कमिटीचा सदस्य निवडायला नकार देतो, तर त्याच आधारावर मैण्डेट कमिटीतसुद्धां पत्त्यांच्या विशेषज्ञाला, आगपेटीच्या काड्यांच्या माइक्रोमैजिशियनला, आणि स्लीव्ज़-जादुगाराला घ्यायला नको. जर ते अचानक आपल्या वैधतेशी हेरा-फेरी करूं लागले, मैण्डेट्सवर जादू करू लागले तर? जर आपण कपितोनवला ऑडिट कमिटीत ह्या आधारावर नाही निवडंत आहोत, की तो मेथेमैटिशियन आहे, तर आपण एका भयानक परंपरेची सुरुवात करतो आहे, आपण स्वतःच आपल्या पायांखाली टाइम-बॉम्ब ठेवंतोय, स्वतःला पंगुत्वाच्या दिशेने वळवतोय, समस्यांचं जेनेरेटर स्थापित करतोय, ज्या कधी न कधी आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह लावतील! कमीत कमी म्हणूनंच आपल्याला कपितोनवला मत दिलं पाहिजे!”
अनुभवी जादुगार म्शीन्स्की स्टेजवर येतो – तो शांत आहे, त्याच्या चेह-यावर – ज्ञानाचं तेज झळकतंय.
“तुम्हीं मला ओळखता, मी वरिष्ठ जादुगार आहे. मला सांगा, आपल्यामधे कुणी असा आहे का, ज्याला शंभर पर्यंत मोजता नाही येत? आणि दीडशे पर्यंत? उत्तम! सगळ्यांना येतं. मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे स्वीकार करतो, की इंटीग्रल-कैल्कुलस काय असतं, मला माहीत नाही, पण मला हे माहीत आहे, की 62 आणि 67पैकी कोणची संख्या मोठी आहे. माझी खात्री आहे, की तुम्हांलापण माहीत आहे, की 62हून 67 किती जास्त आहे?”
“पाच!” सगळे आपापल्या जागेवरून ओरडले. “बरोब्बर पाच!”
“अगदी बरोबर! तर, मग प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम हा आहे की, कपितोनवला, इंटीग्रल-कैल्कुलसच्या विद्वानाला, ऑडिट कमिटीत घेण्याचा अर्थ आहे – तार्किक बुद्धीचा उपहास करणे! हे म्हणजे, चिमण्यांना मारण्यासाठी तोपेचा प्रयोग करण्यासारखं झालं! हे...तथ्यांना अतिरंजित करणं झालं! आणि, ऑडिट कमिटीचं तथ्य फक्त एक आहे – मोजण्याची योग्यता असणं! – एक, दोन, तीन!...शंभरपर्यंत मोजण्याची योग्यता असणं! जास्तीत जास्त दीडशेपर्यंत!”
वोटिंग होते, कपितोनव ऑडिट कमिटीत नाही निवडून येत. बझ्कोला निवडतांत.
“वाईट नका वाटून घेऊ,” उजवीकडे बसलेला माइक्रोमैजिशियन ज़ाद्नेप्रोव्स्की कुजबुजंत कपितोनवला म्हणतो.
“काय म्हणता, मी तर खूश आहे.”
“तरीपण, अपमान तर वाटतोच.”
“हूँ, ‘अपमान’. अपमान – जेव्हां अपमान होतो, तेव्हां, खरोखरंच – अपमान वाटतो!” कपितोनव सुरुवात करतो.
त्याला आवडंत नाही, की त्याचं सांत्वन करताहेत.
“माफ करा. बस, बराच काळ मीटिंग्समधे गेलेलो नाहीये.”
“ ‘बोर’ होतां आहे का?”
“जास्त नाही.”
चर्चेत फक्त एकंच गोष्ट प्रमुख होती – कॉन्फ्रेन्सच्या डेलिगेट्स द्वारे कपितोनववर जणु दोन बाजूंनी विचार केला जात होता : एकीकडे – फक्त कपितोनव आणि दुसरीकडे – फक्त कपितोनवची उमेदवारी. समजणं कठीण आहे, की ह्यांत कोणच्या बाजूची हार झाली होती – कदाचित दोघांचीही झाली असावी?”
हार ज्याची झाली, तो होता ‘तलाव’. तसं तो हे दाखवंत नव्हता.
“मित्रांनो, आपल्यापुढे बरंच काम आहे. तुमच्याकडून सक्रियतेची आशा करतो!”
अध्यक्षाने घड्याळाकडे बघितलं.
10.41
मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट बोलण्याची परवानगी मागतोय. प्लीज़.
मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट माइक्रोफोनजवळ येतो.
“मित्रांनो, दोन गोष्टींकडे तुमचं लक्ष आकर्षित करू इच्छितो.”
“बोला,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष म्हणतो आणि पुन्हां घड्याळाकडे पाहतो.
10.43
“पहिला मुद्दा. आपण आत्तांच वदीम वदीमविच पिरिदाशला ऑडिट कमिटीतून काढून टाकलं आहे, प्रश्न हा आहे, की काय आपण, सर्वसाधारणपणे, त्याला कॉन्फ्रेन्सचा डेलिगेट समजंत राहू, तो गैरहजर आहे तरीही, आणि ब-याच प्रमाणांत कार्य सक्षम नाहीये तरीही?”
“हा कसला प्रश्न आहे? स्पष्ट आहे, की समजंत राहू!” हॉलमधे ज्युपितेर्स्कीचे लोक ओरडतात.
“नाहीतर कसं?” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष म्हणतो. “ह्यांत पिरिदाशचातर काही दोष नाहीये की पीटरबुर्गच्या रस्त्यांवर चालणं धोकादायक आहे. दुर्घटनातर आपल्यापैकी कोणाहीबरोबर होऊं शकली असती. मला वाटतं की वोटिंगच्या वेळेस पिरिदाशच्या परिस्थितिबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची काही गरज नाहीये. हो, तो गैरहजर आहे. त्याच्या गैरहाजरीने कोरमवर काही परिणाम होणार नाही. कोरम पूर्ण न होण्याची काही भीति नाहीये. आणि शिवाय, तुम्हीं स्वतःचं त्याला कॉन्फ्रेन्सच्या डेलिगेटचा अधिकार दिलेला आहे!”
“तर, त्या परिस्थितीत,” मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट म्हणतो, “जेव्हां गुप्त मतदान होईल, तेव्हां आपल्याला त्याच्यासाठी हॉस्पिटलमधे बैलेट-बॉक्स पाठवावा लागेल.”
“पाठवू! काही हरकत नाही!” ज्युपितेर्स्कीच्या गटातील लोक ओरडतात.
“त्या परिस्थितीत आपण कधीच संपवू शकणार नाही! कधीच इथून जाऊ शकणार नाही!” ‘श्याम-वन’च्या गटाचे लोक ओरडतात.
“हो, हा प्रश्न सोपा नाहीये,” अध्यक्ष पुन्हां घडाळ्यावर नजर टाकतो.
10.45
“चला, वोटींगच्या आधी त्याला सोडवायचा प्रयत्न करू. मित्रांनो, मैण्डेट कमिटी आणि ऑडिट-कमिटीला निवेदन करतो की ह्या प्रश्नावर त्यांनी एकत्र विचार करावा आणि बोर्ड आणि प्रेसिडेंटच्या मतदानापूर्वी आपला सल्ला द्यावा.”
“तर, मी कॉन्फ्रेन्सला सूचित करतो, की कालच्या तुलनेंत कॉन्फ्रेन्सच्या डेलिगेट्सच्या संख्येत अश्याप्रकारे परिवर्तन झालेलं आहे. ‘आउट’ – पिरिदाशच्या संदर्भात काही निर्णय होईपर्यंत हा प्रश्न अनुत्तरित राहील. ‘इन’ – पहिला – आपला परिचित कपितोनव, जोपर्यंत दुस-याचा संबंध आहे, तर माझ्या भाषणाचा संबंध ह्याच गोष्टीशी आहे.”
“प्लीज़, शक्य असल्यास थोडक्यांत सांगा,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष विनंती करतो.
“थोडक्यांत सांगेन. तुम्हांला माहीतंच आहे, की आपल्यामधे तथाकथित रिमोटिस्ट्ससुद्धां आहेत...”
“हे ‘तथाकथित’ कशाला?!” ‘तलाव’ उत्तेजित होतो.
“माफ करा, फक्त ‘रिमोटिस्ट्स. तसं त्यांच्या संदर्भांत सगळंच इतकं सोपं नाहीये. एका रिमोटिस्टने, जो ईवेन्ट्स-आर्किटेक्ट म्हणून ओळखला जातो, काल आपल्याकडे आला होता आणि आज आपल्यामधे आहे, आमच्यावर प्रतिबंध लावलांय की त्याला न केवळ त्याच्या नावाने, वडिलांचा नावाने आणि आडनावाने संबोधित करू नये, तर कोणत्याही ऑफिशियल डॉक्यूमेन्ट्समधे सुद्धा त्याच्या नावाचा, वडिलांच्या नावाचा आणि आडनावाचा उल्लेख करू नये, आणि विशेषकरून मैण्डेट कमिटीच्या मिनिट्समधे. तसंच हे पण सूचित करतो, की दोन इतर रिमोटिस्ट्स, महाशय नेक्रोमैन्सर (ओझा) आणि काळ-भक्षक, बराच वेळ समजावल्यावर ह्या गोष्टीसाठी तयार झाले की ऑफिशियल डॉक्युमेन्ट्समधे त्यांचं आडनाव, नाव आणि वडिलांच नाव पासपोर्टमधे दिलेल्या माहितीप्रमाणे लिहिण्यांत यावं. फक्त ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आपल्याचं म्हणण्यावर अडून आहे. मी कॉन्फ्रेन्सला विनंती करतो की इथे हजर असलेल्या ईवेन्ट्स-आर्किटेक्टवर वजन टाकावं.”
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट दिसायला कसा आहे आणि तो कुठे बसला आहे हे सगळ्यांनाच माहीत नाहीये. जर काळ-भक्षक दुर्बोध असूनही लोकांच्या नजरेंत आलेला आहे, आणि नेक्रोमैन्सर महाशय सगळ्यांच्या डोळ्यांत काट्यासारखा खुपतोय, तर कॉन्फ्रेन्समधे उशीरा पोचल्यामुळे ईवेन्ट्स-आर्किटेक्टचा अजूनपर्यंत कोणाशीही परिचय झालेला नव्हता. लोक डोके फिरवून एकमेकाला विचारतांत की तो कुठे आहे.
पण तो ओठंगून खुर्चीत लपून गेला.
पण मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट त्याला लपून नाही राहू देत.
“हा आहे!” त्याच्याकडे बोटाने खूण करतो.
“तुम्हीं हे काय करतांय, डियर? असं कां करता आहांत? हा फालतूपणा आहे!” त्याच्या बाजूला बसलेले कॉन्फ्रेन्सचे डेलिगेट्स त्याला टोमणे देतात.
कपितोनव आपल्या रांगेतून लक्ष देतो की ह्यावेळेस ईवेन्ट्स-आर्किटेक्ट कालसारखा नाही दिसंत आहे, जसं त्याला रिसेप्शन डेस्क जवळ बघितलं होतं – आज तो अगदी उत्साही वाटतोय आणि आज त्याने अगदी माणसांसारखे कपडे घातले आहेत, तसे हे ही विचित्रंच होते – एखाद्या सहायक कामगाराच्या ‘ओवर-आल’ सारखं, स्वच्छ, निळ्या रंगाचं, पण, असं वाटतंय की दुस-या कोणाचं उतरवलेलंच आहे.
ईवेन्ट्स-आर्किटेक्ट उसळतो आणि म्हणतो:
“मी ‘कोणी’ नाहीये! मी काही नाव-बीव नाहीये! मी ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आहे! मी काल हॉटेलमधेसुद्धां आपलं नाव नव्हतं सांगितलं!”
“हो, खरं सांगतोय,” ‘तलाव’ म्हणतो. “खरंच त्याने हॉटेलमधे राहण्यास नकार दिला होता.”
“कारण की ते रजिस्ट्रेशनसाठी माझ्यावर जोर टाकंत होते – माझ्या ख-या नावासह! पण मी – ना तर सीदरव आहे, ना पित्रोव! ना माइकल जैक्सन, आणि ना राबिनोविच! मी – ईवेन्ट्स-आर्किटेक्ट आहे!”
“तुम्हीं रात्री कुठे होता?” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष विचारतो.
“बाकुनिन एवेन्यूवर बाथ-हाउसमधे!” ईवेन्ट्स-आर्किटेक्ट गर्वाने उत्तर देतो.
हॉलमधे कोणीतरी शिट्टी वाजवली, कोणी ‘आह!’ म्हणालं, कोणी जोराने हसलं.
“तिथे काय एखाद हॉटेल आहे?”
“तिथे जेटी-कामगारांचा मुशाफिरखाना आहे, ते माझे शिष्य आहेत!”
अध्यक्षाच्या चेह-यावर चरम विस्मयाचा भाव आला.
“तुमच्या सिद्धांतांच्या प्रति सम्मानाचा भाव राखंत आम्ही तुम्हांला एखादा फ्लैट देऊं शकलो असतो! तुम्हीं ऑर्गेनाइज़िंग कमिटीला कां नाही भेटलांत?”
“विचित्रंच गोष्ट आहे, की ह्याला पासपोर्ट नसतांना तिकिट कोणी दिलं असेल?” पिवळ्या सूटातला माइक्रोमैजिशियन ओरडतो. “काय तेपण शिष्य आहेत? हा पीटरपर्यंत आला कसा?”
“’लिफ्ट’ घेऊन-घेऊन!”
“ ‘लिफ्ट’ घेऊन-घेऊन?...हिवाळ्यांत?...”
हॉलमधे हल्ला-गुल्ला होऊं लागला. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकूं येतात :
“शाबास!”, “क्लीनिक!”
“पण, तरीही मैण्डेट कमिटीतर्फे,” कमिटीचा प्रेसिडेंट घोषणा करतो, “मी इथे हजर असलेल्या रिमोटिस्ट्सला निवेदन करतो. काळ-भक्षक, महाशय नेक्रोमैन्सर! आपल्या कॉम्रेडला समजावून सांगा!”
“नेक्रोमैन्सर नाहीये! तो कॉन्फ्रेन्सला डावलतोय!” लोक आपापल्या जागेवरून ओरडतात. “नेक्रोमैन्सर कां नाहीये?”
मैण्डेट कमिटीचा प्रेसिडेंट विनंती करतो:
“काळ-भक्षक, कमीतकमी तुम्हीं तरी आपल्या कॉम्रेडला समजवा!”
तो मोठ्या मुश्किलीने उठला. चेह-यावर हिरवळ, पापण्या सुजलेल्या. कपितोनवने आपल्या अनिद्रेबद्दल विचार केला, की ह्याच्या आजारांपुढे तर ती काहीच नाहीये.
“आम्हीं कॉम्रेड्स नाही,” काळ-भक्षक हळूच म्हणतो. “आमच्यापैकी प्रत्येकजण स्वतःत सम्पूर्ण आहे.”
“एक विशेष सूचना,” ‘तलाव’ने हात उचलला. “सगळ्या कार्यकारी कागद-पत्रांत त्याचं नाव तसंच ठेवावं, जशी त्याची इच्छा आहे, पण काही विशेष रिपोर्ट्सचा संदर्भ देत, ज्यांत आडनाव, नाव आणि वडिलांच नाव दर्शवलेलं आहे.”
“ह्या आणखी कोणत्या सीक्रेट रिपोर्ट्स आहेत?” मैण्डेट कमिटीच्या प्रेसिडेंटला ‘तलाव’च्या म्हणण्याचा अर्थ नाही कळंत.
“म्हणजे, ज्या सीक्रेट आहे!” ‘तलाव’ म्हणतो.
“मी विरोध करतो,” ईवेन्ट्स-आर्किटेक्टचा आवाज निघतो.
“तुम्हांलातर त्यांच्याबद्दल कधीच माहीत नाही होणार!”
“ह्यांत काही तथ्य आहे, काहीतरी सकारात्मक,” कॉन्फ्रेन्सचा अध्यक्ष ‘तलाव’चं समर्थन करतो. “मैण्डेट कमिटीने ह्याबद्दल व्यवस्थितपणे विचार करावा. आणि एडिटोरियल बोर्डनेसुद्धां विचार करावा. हा विषय संपला. खूप झालं. अशाने तर आपण कधीही,” त्याने घड्याळीकडे पाहिलं,
