STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

यश....!

यश....!

1 min
654


जीवन जगताना

बरीच उठाठेव करावी लागते

स्थिरतेसाठी सुद्धा

आपल्याशीच झगडावे लागते


झगडण्यात जीवन

जगण्याचा आनंद आहे

आनंदाने झगडण्यात

खरे जीवन सामावले आहे


यशस्वी ती असत नाहीत

ज्यांना कधी झगडावे लागले नाही

यशस्वी ती असतात

जी झगडणे सोडून देत नाहीत


यश अपयश काही

प्रयत्नांच्या मोजमापावर नसत

ते आपल्या कर्मावर आधारलेलं

आपलं प्राक्तन असत


जीवन प्रवाही असणं

कधीही चांगलंच असत

पण ते कधीच प्रवाहपतीत

नसणं हेच योग्य असत


म्हणून जीवनाच्या प्रत्येक क्षणी

भान कर्माच ठेवायच असत

धरला मार्ग कधी सोडायचं नसत

यशाला खेचून आणायचं असत

यशाला खेचून आणायचं असत....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational