याच आठवणींच्या बळावरती ...!
याच आठवणींच्या बळावरती ...!
विखुरलेल्या साऱ्या आठवणी
आकाशी जशी चमके चांदणी
वादळे-वावटळी शमुनी जाती
याच आठवणींच्या बळावरती ...!
लुटुनी नेता कफल्लक होणे
हेची नशिबात होते लिहिलेले
विसरू म्हणता नाही विसरत
आठवणींचे कल्लोळ माजलेले
स्वैर होता मन अचानक हे
आठवणीच त्याजला सावरती
वादळे-वावटळी शमुनी जाती
याच आठवणींच्या बळावरती ...!
आठवणी येती कधी ओठावरी
होती दर्दभ्रया गीतांच्या ओळी
याच आठवणी मग कधी कधी
गाती मधुर गाण्यांच्याही ओळी ...!
वादळे-वावटळी शमुनी जाती
याच आठवणींच्या बळावरती ...!
