STORYMIRROR

Shila Ambhure

Children

4  

Shila Ambhure

Children

व्याकरणाचा तास

व्याकरणाचा तास

1 min
297

हसतच आल्या आज

बाई आमच्या वर्गात

शिकू हसत खेळत

बोलल्या गोड सुरात


कुसुम नि सुमनच्या

फूल एक दिले हाती

मग हसून म्हणाल्या

पुष्प आहे गोड किती


दिनकर व रवीला

दिले सूर्याचेच चित्र

हळू बोलल्या कानात

हाही तुमचाच मित्र


अंबर आणि गगन

आकाशही सोबतीला

आभाळाच्या चित्रासाठी

व्योम दिला मदतीला


गट करुनि आमचे

मॅडमनी केले स्पष्ट

गटामध्ये दडलेली

समान अर्थाची गोष्ट


डोलविल्या आम्ही माना

सगळ्यांनी होकारार्थी

समजलो आम्ही सारे

शब्द कसे समानार्थी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children