STORYMIRROR

Rohit Khamkar

Drama Inspirational Others

2  

Rohit Khamkar

Drama Inspirational Others

वर्षे

वर्षे

1 min
42

पाहता पाहता संपून गेलास, समजलंही नाही अगदी

एक एक दिवस हिशोब केलास, असा काय तो नगदी


जाणवलं नाही कधी, रास सणांचिं तू अशी केलीस

पाहता पाहता ते काय शेवटची ती रात्र झालीस


स्वागताला तयार सगळे, त्या नव्याच्या नव्यापणाला

जुन्याच जूणेपण सारं हरवलं, काय अर्थ त्या विसरण्याला


तूझ्या सारखे कित्येक मिळूनी, वय आम्ही गाठीले

आठवणींच्या इतिहासामध्ये, आता तुझेही नाव साठीले


महत्व तुझं कालही होतं, उद्याही कायम राहणारच

तूझ्या सारखी तुझीच रूपे, कायम अशी ती येणारच


दुखः नाही तूझ्या संपण्याचा, पण नव्याचा आहे तो हर्ष

तूझ्याच सारखे स्वागत त्याचे, तयार आहे नवे वर्षे


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Drama