STORYMIRROR

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

वंशवृक्ष...

वंशवृक्ष...

1 min
210

लेक जन्माला येता

मी खचलो मुळीच नाही..

जगावेगळा आनंद झाला

तिचं ओझं वाटलं नाही..


       मुलासम पुरवून लाड

       लेक सानूली वाढवतो..

      "आनंदी बालिका- भविष्य देशाचं"

        वास्तव समोर मांडतो..


लेक जगवून उमलणाऱ्या

कळ्यांचा व्हावा जन्मसोहळा..

लेक आहे "वंशवृक्ष"

छाया देई दोन्ही कुळा..


         सकारात्मक विचारांचा

         पेटवू मनी दिपस्तंभ..

         आधुनिक- प्रगत भारताचा

         मुलगीच खरा आधारस्तंभ..


म्हणणं माझं एवढं ऐका

स्त्री भ्रूणहत्या थांबवा बरे..!

मुलासम मुलीलाही

जगण्याचा हक्क आहे रे..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational