वंशिका..
वंशिका..
घरोघरी-गावोगावी
स्त्रीशक्तीचा जागर व्हावा..
वंशाच्या दिव्यासम
वंशिकेला सन्मान मिळावा..
संस्कार- संस्कृतीची वंशिका
आपली आन-बाण-शान..
स्वतःच्या आई- बहिणीसम
द्यावा तिजला मान..
मोकळ्या आकाशी तिजला
स्वैर विहारु द्यावे..
नसत्या बंधनाचे जोखड
तिला कशाला हवे..?
नवरात्रीचे नऊ रंग
आपणांस भक्तिभाव सांगतात..
चंडिका-दुर्गा-भवानीच्या
रुपात मुली जन्म घेतात...
"स्त्रीभ्रूण हत्या" त्यागून
घालू नवा आदर्श..
"मुलगा-मुलगी एकसमान"
बिरुदाला करू कृतीस्पर्श..
