विश्वास
विश्वास
एक छोटेसे काचेचे
भांडे असते विश्वास
तडा जाताच तयाला
जाई क्षणात लयास
खूप जपोनी तयाला
केले प्रेमे संगोपन
मोहरले बहरले
डुले मनाचे अंगण
वारा संकटाचा येता
उडे भावना प्रक्षोभ
तडा तत्क्षणी तयाला
येई वियोगाचा भोग
जपा नित्य विश्वासाला
पात्र असे अनमोल
तडा नको तयाला
जपा ठेव बहुमोल