STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Romance

3  

SURYAKANT MAJALKAR

Romance

विकेट!!

विकेट!!

1 min
29.5K


बर्‍याच वर्षानंतर काल मला ती दिसली,

तेच ओळखीच हसु गाली आणत हसली


कसा आहेस नजरेने तीने विचारले

तोच प्रश्न पुर्वीचा जाणुन मन भारले


अलगद बट बाजुला सारत नजर खाली झुकली

मला आमच्या प्रेमाची जुनी ओळख पटली


पाऊल माझे हळुहळु तिच्याकडे वळले

व्वा ! माझे कोण नशीब उघडले


मागे लपलेली एक चिमुकली 'मम्मी..मम्मी' म्हणली

'बब्बु लडु नकोस बेटा तुझा 'जुना मामा' म्हणताच..

माझी विकेट उडाली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance