विकास देशाचा व्हायाला पाहिजे
विकास देशाचा व्हायाला पाहिजे
. मला देशाचा विकास पाहिजे. . नको काहीच भकास पाहिजे. . हवा देशाचा मजबूत खांदा.. नको कसलाच व्हायला वांदा... कसा झकास दिसायाला पाहिजे. . विकास देशाचा व्हायाला पाहिजे. .॥धृ॥
रस्ता चकचक करावा भारी.. गाडी त्याच्यावर सुसाट मी मारी.. कचरा उचलणार मी नाही.. उल्टा अजून टाकीत राही.. मला पचकन थुकायाला पाहिजे विकास देशाचा व्हायाला पाहिजे ॥१॥
लग्नाला मुलगी पटकन हवी.. मात्र मुलगी ना मजला व्हावी जाता येता मी पोरगी शेडीन उभ्या रस्त्यात अब्रू काढीन पोरी दुसर्यांच्या वाढायाला पाहिजे विकास देशाचा व्हायाला पाहिजे॥२॥
उघड्यावर मी शौचास बसणार नको तिथं मी धार सोडणार जना मनाची कशाला लाज.. आहे त्यातच अस्सल माज संडास लोकांनीच बांधायाला पाहिजे विकास देशाचा व्हायाला पाहिजे ॥३॥
बिनधास्त वापरतो पिशव्या भर रस्त्यात घालतो शिव्या आई बापाची कदर कशाला रोज क्वाटर लागे घशाला सभ्य लोकांनीच राहायाला पाहिजे विकास देशाचा व्हायाला पाहिजे ॥४॥
माझ्या सैनिकांवरती वार.. याला जबाबदार सरकार.. सोशल मिडिया वरती हेका.. तुम्ही दुश्मनांना ठोका मी जबाबदारीने का वागायाला पाहिजे विकास देशाचा व्हायाला पाहिजे ॥५॥
असे बेअक्कल वागू नका जरा जागेवर ठेवा डोका करा स्वच्छतेचा जागर करा स्री शक्तीचा आदर सामाजिकतेचा जागवा भान समाज रखवालदार तू बन सैनिक प्रत्येकात जागाया पाहिजे कर्तव्य प्रत्येकाने करायाला पाहिजे.. विकास देशाचा व्हायाला पाहिजे ॥६॥
