लग्नानंतरही अफेअर
लग्नानंतरही अफेअर
1 min
897
जशी बेइमानी दिशा पावसाची
तशी बेइमानी नशा प्रियतमाची
पहा साल झालेत लग्नास सोळा
तरी वाट पाही उगा प्रियतमाची
हवा दीप वंशास मुले आठ झाली
तरी खंत लागे सदा प्रियतमाची
नको धवल कोरू तुझी आज दाढी
बटा धवल झाली पहा प्रियतमाची
दिले सर्व वैभव तिच्या पायताळी
बटा अंतरी सजवतो प्रियतमाची
करी छान भार्या स्वयंपाक वेड्या
तरी लाळ घोटे सदा प्रियतमाची
तिचा गोड संसार चालीत आहे
तुला हासण्याची अदा प्रियतमाची
नसे भान बेभान वेडा दिवाना
अशी काय जादू तुला प्रियतमाची
वये साठ गाठून चढतील कवड्या
नको वासना तव मना प्रियतमाची
