दुष्काळआहे( गजल)
दुष्काळआहे( गजल)
भुजंगप्रयात लगागा लगागा लगागा लगागा
जिवा जाळतो फार दुष्काळआहे
कुणा मारतो ठार दुष्काळ आहे
धरा फाटली दाट नक्षी तड्यांची
जिव्हारी बसे वार दुष्काळ आहे
नदी आटली एकही थेंब नाही
म्हणे जीव बेजार दुष्काळ आहे
उन्हाच्या झळा सोसती ना जिवाला
मनी दाट अंधार दुष्काळ आहे
बसे पाखरांना भुकेचा तडाखा
रडे शेत लाचार दुष्काळ आहे
उपाशी बळी फास लावून मेले
भुकेली मुले फार दुष्काळ आहे
नभाच्या कृपेने हसे शेत सारे
नि गेला तडीपार दुष्काळ आहे