लावण्याकांता
लावण्याकांता
नार नखर्याची ,गोल टिकलीची ,लाल गालाची, रंगलेले ।
कोण भर्तारं ,सांग गुलजारं ,साज मोत्यानं ,बहरलेले ॥धृ॥
चमक दंताची, तेज हिर्यांची ,माळ तार्यांची , माळलेली।
चाल वार्याची, नजर सार्यांची ,ऐट तोर्याची , गजरुपाली।
वस्र मखमलचं, तलम धाग्याचं, ,ताठ तागाचं, नेसलेली।
चोळी कंचूकी, गच्च दंडूकी रूतली पक्की गोड ल्याली।
फुल वेणीचा, शुभ्र चाफ्याचा,सोनचाफ्याचा,
शोभलेला केस रेशमचे कृष्णरंगाचे नाद झुलण्याचे,
पिंगलेले नथ मोत्याची दीप ज्योतीची उंच पोतीची घातलेली
नजर लाजाळू किती न्याहाळू भाव मायाळू,
बाणलेले अग मंजूषा रूप रंजीशा मन योगेशा
नम्र झाले कोण भर्तारं,सांग गुलजारं साज मोत्यानं बहरलेले
