Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

yogesh Chalke

Inspirational

1.6  

yogesh Chalke

Inspirational

मी बैलगाडी (मी भारत )

मी बैलगाडी (मी भारत )

1 min
750


बाई..बाई..बाई..बाई.. लई

थकुन गेली मी बाई..॥

आता फुकट पळणार नाय...

ग बाय, आता फुकट पळणार नाही. ..॥धृ॥


चालुन चालुन झिजले चाक... तरी मनात माझ्या धाक...

कळ सहन करणार नाही... आता फुकट पळणार नाय...

ग बाय, आता फुकट पळणार नाही ॥१॥


माझ्या मणक्याचा मोडला काटा.

पार तुटोनी गेला साटा...

अशा हिसक्यानं मरणार नाही... आता फुकट पळणार नाय ....

ग बाय, आता फुकट पळणार नाही ॥२॥


नाही जोकाडात माझ्या जोर... पार कुसोनी गेला दोर...

जोर बैलांचा धरणार नाही... आता फुकट पळणार नाय...

ग बाय, आता फुकट पळणार नाही ॥३॥


अशी नावान मी बैलांची गाडी... लागली सुधारपणाची गोडी... अन्याय सहन करणार नाही... आता फुकट पळणार नाय...

ग बाय, आता फुकट पळणार नाही ॥४॥


वंगण चाकात घालत नाही... चावी चाकाची झिजली बाई ... त्यानं तुम्हीच पडणार बाई... आता फुकट पळणार नाय...

ग बाय, आता फुकट पळणार नाही॥५॥


खड्याखुड्यांचा तुमचा रस्ता... खाऊ अजून किती मी खस्ता... तुम्हा पुढे मी जपणार नाही.... आता फुकट पळणार नाय...

ग बाय, आता फुकट पळणार नाही॥६॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational