अंगाई गजल
अंगाई गजल
हालतो पाळणा ऐक ना सोनुल्या
तान्हुल्या लाडक्या झोप ना सोनुल्या
आग पोटातली शांत झालीच ना गार वारा छळी वस्र नाही जरा
दार सांगे पहा यातना सोनुल्या त्या नव्हे चांगल्या भावना सोनुल्या
पाखरे बापुडे आपले संगती आपला शुक्र ना चंद्र ना सोनुल्या
दूर सोडून आई तुला लांबली
अन् तुझ्या सोबती बाप ना सोनुल्या
आज मंदावल्या चांदण्या सावल्या पापण्या तू जरा झाक ना सोनुल्या
