जाईची फुले
जाईची फुले
वियदगंगा लगागागा लगागागा लगागागा लगागागा
अडकला जीव माझा...मी परत भेटायला आलो...
तुझ्या केसात जाईची फुले माळायला आलो....
कशाला गाळते अश्रू किती सुजले नयन दोन्ही ....
प्रिये डोळ्यात मी औषध अता घालायला आलो ....
चढे हातावरी लाली खुलू दे रंग मेंदीचा...
हळद अंगावरी पिवळी तुझ्या लावायला आलो...
सखे बांधून ये बाशिंग नवरी बोहल्यावरती...
तुझ्या डोक्यावरी त्या अक्षता टाकायला आलो ....
कपाळी दाटले कुंकू गळ्यामध्ये मणी काळे...
सुखाने नांद संसारी वचन हे घ्यायला आलो...
