पुस्तक आयुष्याचे
पुस्तक आयुष्याचे
जन्मरूपी पानावर ,उमटती एकएक, क्षण लिहले देवाने ,आयुष्याचेते पुस्तक ...
मुखपृष्ठ असे बाप,मलपृष्ठ असे आई, प्रस्तावना व्यक्तिमत्त्व ,लिहणारी सटवाई.....
चार विभाग सुंदर ,जीवनाची गाथा त्यात, व्यक्तिरेखा वेळोवेळी, नव्यानव्या भेटतात....
बालपण तो पहीला, विभागात आई बाप, सवंगडी खेळणारे,संस्कारांचा जळे दीप. ...
तारुण्याच्या विभागात ,ज्ञान समृद्धी लाभते, जोडीदार मिळे खरा, इथे खरे नाव होते.....
मुले,मित्र, नाती नवी,वाटे सदा हवी हवी, संसाराची कर्तृत्वाची,योजनांची नीती भावी....
विभागात त्या तिसऱ्या, आई बाप ना राहती, निवृत्तीचा घाला पडे,मुले स्वातंत्र्यात न्हाती....
दुरावती अधिकारे, दुरावती मुले नाती, आता खरी जाणवते ,चौथा विभागाची भिती....
विभागात चौथ्या भारी,सोसवतो भेदभाव, जोडीदारासंगे गाळी, अश्रू आठवतो देव....
अंतसमयाचा पान , राहे मागे कमवले, संगे गेले प्रेमशब्द,असे पुस्तक संपले.....
